Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हडपसरवर उमटणार ‘पंजा’च

$
0
0
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला असून, हा संघ पक्षातर्फे कदापि सोडला जाणार नाही, असा इशाराच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

राष्ट्रवादीने दहा मतदारसंघांसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले

$
0
0
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले आहेत. येत्या २० ऑगस्टपर्यंत इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज करावेत, असे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी स्पष्ट केले आहे.

पीएमपीसाठी राखीपौर्णिमा विक्रमी उत्पन्नाची

$
0
0
अपुरी बससंख्या, घटते प्रवासी आणि वर्षागणिक तोट्यात होणारी वाढ या त्रुटींमुळे ‘खिळखिळी’ अवस्था झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाने राखीपौर्णिमेच्या रविवारी मात्र तब्बल दीड कोटी रुपये उत्पन्नाचा विक्रमी टप्पा पार केला.

प्रोजेक्ट फॅक्टरी बसवेल ‘कॉपी-पेस्ट’ला आळा

$
0
0
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) ‘प्रोजेक्ट फॅक्टरी’ या संकल्पनेमुळे इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रोजेक्टचा दर्जा वाढण्याबरोबरच ‘कॉपी-पेस्ट’ प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

निष्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना आळा

$
0
0
पावसामुळे पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर बोर्डाने यापुढे रस्ते आणि अन्य विकासकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना आळा बसेल.

सलग सुट्ट्यांमुळे पायवाटा जाग्या झाल्या...

$
0
0
डोंगरदऱ्यांमध्ये खळाळणारे धबधबे, घाट रस्त्यांवरून गाडी चालवताना मिळणारा आल्हाददायक सुखद अनुभव अन् चिमुरडी फुले, हिरव्यागार गवताने पुसल्या गेलेल्या किल्ल्यांच्या पायवाटा तुडवड भटकंती करण्याची हौस…

भाव तेथे देव...

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ओढवलेल्या आपत्तीमुळे यंदा गणेशोत्सव मंडळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार करीत आहेत. तसेच देखावे, सेलिब्रेटींचा भपका कमी करून तो निधी माळीण गावाच्या पुनर्उभारणीसाठी देण्याबाबत मंडळे विचाराधीन आहेत.

‘इबोला’ रोखण्यासाठी कोअर कमिटी

$
0
0
‘इबोला’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांची जिल्हानिहाय स्वतंत्र कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. तर पुणे महापालिकेने नायडू संसर्ग हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्डच तयार केला आहे.

लोकनेते बाणखेले यांचे निधन

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील लोकनेते म्हणून लौकिक असलेले माजी खासदार किसनराव बाबुराव बाणखेले (वय ७८) यांचे दीर्घ आजाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.

सिंहगडावर आता ‘लिमिटेड पर्यटन’

$
0
0
पुणेकरांसाठी लाडके ठिकाण असलेल्या या गडावर अधिकाधिक पर्यटकांना जाण्याची संधी मिळावी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या उद्देशाने गडावर आता ‘लिमिटेड पर्यटन’ करण्याचा प्रस्तावावर सिंहगड घेरा समिती आणि वन विभागाचा विचार सुरू आहे.

...म्हणून फुगला मेट्रोचा खर्च

$
0
0
शहरातील मेट्रो प्रकल्पावरून सर्वच प्रमुख पक्षांच्या राजकीय भूमिका गेल्या काही वर्षांत सातत्याने बदलत्या राहिल्या असून, ठोस भूमिकेअभावी प्रकल्पाच्या संभाव्य खर्चाचे आकडे मात्र फुगतच चालले आहेत.

सचिन निष्क्रीय खासदार

$
0
0
क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी बॉलरच्या चिंधड्या उडविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदार म्हणून निष्क्रीय ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत सचिनने राज्यसभा सदस्य म्हणून मिळालेल्या १५ कोटी रुपयांच्या खासदार निधीतील एक दमडीही खर्च केलेली नाही.

पुणे मनपा आयुक्तांच्या प्रतीक्षेत

$
0
0
शहरात गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असूनही पुणे महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्यातही सरकारकडून चालढकल केली जात आहे. ‘बाबां’च्या मर्जीतला, की ‘कारभाऱ्यां’च्या जवळचा अधिकारी येणार, यावरून खल सुरू असल्याने पुण्यासारख्या मोठ्या महापालिकेचे आयुक्तपद अद्यापही रिक्त राहिले आहे.

साहित्य संमेलन थंडी ओसरल्यानंतर

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेले ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता थंडी ओसरल्यानंतर ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पंजाबमध्ये कडाक्याची थंडी असते ही बाब ध्यानात घेऊनच संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.

पालिकेच्या परवानगीविना छापल्या प्रवेशिका

$
0
0
महापालिकेच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवासाठी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता चक्क प्रवेशिका (पास) छापण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खराडीतील हॉस्पिटलचा खासगीकरणाचा मार्ग मोकळा

$
0
0
महापालिकेच्या मालकीचे आणि गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या खराडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. मात्र बोपोडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीत अमान्य करण्यात आला.

लाचखोर मुख्याध्यापिकेला अटक

$
0
0
चिंचवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी अटक केली.

गाडी चालवताना मोबाइलचा सर्रास वापर

$
0
0
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सकाळची वेळ सर्वात रहदारीची.... गाडी चालवताना मोबाइलचा वापर करत नियम मोडण्यात अग्रेसर... ट्रॅफिक जॅमने सर्वाधिक त्रस्त...तर दंडाची रक्कम वाढवली तरच शिस्त लागेल...

‘सिम्बायोसिस’चा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बंद

$
0
0
दिल्ली विद्यापीठातील चार वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम बंद करण्यापाठोपाठ विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीलाही त्यांचा लिबरल आर्ट्‍‍सचा चार वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पीएफ बुडविणाऱ्या संस्था, कंपन्या रडारवर

$
0
0
कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) बुडविणाऱ्या संस्था किंवा कंपनी चालकांविरुद्ध एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (इपीएफओ) विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत धनकवडी येथील लिटल रॉक शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images