Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पासपोर्ट मेळावा २३ ऑगस्टला

$
0
0
पासपोर्टच्या अपॉइंटमेट मिळण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पासपोर्ट कार्यालयाने येत्या २३ ऑगस्टला घोरपडी येथील पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

उत्साह, उर्मी आणि उद्घोष...

$
0
0
प्रचंड उत्साह... करंडक मिळवण्याची उर्मी... आपल्या संघाविषयीचा आत्मविश्वास... नाट्यगृह दणाणून सोडणाऱ्या आरोळ्यांची असलेली साथ... अशा वातावरणात पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू झाली.

स्थायी समितीच्या निर्णयांना केराची टोपली

$
0
0
स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करून नगरसेविका आशा शेंडगे यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) झालेल्या समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. मात्र आयुक्त राजीव जाधव सभेला उपस्थित नसल्याने आगामी सभेत खुलासा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

हद्दीबाहेरील शिक्षणसंस्थांचे विद्यार्थीही शिष्यवृत्तीस पात्र

$
0
0
पुणे महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अनुक्रमे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती महापालिका हद्दीबाहेरील शिक्षणसंस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही देण्यात याव्यात, असा ठराव मंजूर करण्यात आला.

खडकवासलातील मगर वनखात्याच्या तावडीत

$
0
0
खडकवासला धरण परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून मुक्काम ठोकलेल्या मगरीला पकडण्यास वन विभागाला अखेर मंगळवारी पहाटे यश आले. धरणाजवळील मुठा नदीच्या डबक्यामधून या मगरीला पकडण्यात आले आहे.

आजी-माजी संमेलनाध्यक्षांचे प्रकाशक ‘बहिष्कारा’वर मौन

$
0
0
मराठी माणसाचा स्वभाव कलहशील असल्याने साहित्य संमेलनापूर्वी वाद झालेच पाहिजेत, घुमानचे संमेलन यशस्वी केलेच पाहिजे, अशी मते आजी-माजी संमेलनाध्यक्षांकडून व्यक्त होत आहेत.

फरारी गुन्हेगाराने ठोकला येरवडा तुरुंगातच मुक्काम

$
0
0
खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यांसारखे १५ गंभीर गुन्हे करणाऱ्या लख्या उर्फ लक्ष्मण अण्णा जाधव (वय ३०, रा. हॅपी कॉलनी, कर्वेनगर) याला अखेर दोन वर्षांनतर अटक करण्यात यश आले आहे. दोन वर्षांपूर्वी लख्याला शिरूर पोलिसांनी अटक केली आणि येरवडा जेलमध्ये त्याची रवानगी केली.

सरकारच्या दिरंगाईमुळेच मेट्रोची कंपनी कागदावरच

$
0
0
मेट्रोच्या मान्यतेमागे ‘राजकीय भूमिका’ असल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असले, तरी पुण्याच्या मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यात राज्य सरकारची ढिलाईच कारणीभूत ठरली आहे.

‘मुख्यमंत्र्यांना कराडमध्येच रोखणार’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदार संघामध्येच रोखून धरणार आहे, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी दिले.

‘कचराबंद’ आंदोलन मागे

$
0
0
पुण्यातील कचरा टाकण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर गेले सहा दिवस सुरू असलेले ‘कचराबंद’ आंदोलन मागे घेण्यात आले.

साहित्य संमेलन थंडी ओसरल्यावरच

$
0
0
पंजाबमध्ये फेब्रुवारीदरम्यान असलेल्या थंडीचा अंदाज घेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन थंडी ओसरल्यानंतरच घेण्याचे निश्चित केले.

वीकेंडच्या ‘सर्च’मध्ये लोणावळ्याला पसंती

$
0
0
धुक्याच्या दुलईत लपलेल्या डोंगरदऱ्या अन् कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणाला भुलणाऱ्या पर्यटकांनी ‘लोणावळ्या’ला अव्वल पर्यटनस्थळाचा मान दिला आहे.

माळीणच्या पुनर्वसनातही स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग

$
0
0
माळीण दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यापासून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार, मृत व्यक्तींचे अंत्यविधी, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यापर्यंत विविध कामे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रमच्या टीमने माळीण येथे गेल्या दहा दिवसात केली आहेत.

समाविष्ट गावांमधील बांधकामांना आळा

$
0
0
महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांमध्ये सध्या बांधकाम परवानगी देण्याचा सपाटा पालिकेलाचा डोकेदुखी ठरणार आहे, म्हणूनच समाविष्ट गावांमधील संभाव्य बांधकाम रोखण्यासाठी ‘अॅमेनिटी स्पेस’वरील सर्व बांधकाम परवानगी रद्द करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी एकमताने मंजूर केला.

रिक्षावाल्यांचे ‘नो वेटिंग’ धोरण

$
0
0
एकीकडे ‘वेटिंग’च्या अतिरिक्त भाड्याबाबत जोरदार चर्चा झडत असताना, रिक्षाचालक मात्र सध्या वैयक्तिक पातळीवर ‘नो वेटिंग’चे धोरण अवलंबत आहेत. यामागे ‘प्रवाशांशी वाद नको,’ असा पवित्रा नसून, सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा समोर येतो आहे.

चार एफएसआयच्या भुताने पुणेकरांमध्ये अस्वस्थता

$
0
0
शहरातील प्रस्तावित मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस चार एफएसआय देण्यावरून या परिसरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

बीआरटीप्रमाणे मेट्रोही फसवणार का?

$
0
0
सातारा रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पाप्रमाणे मेट्रोही फसवणार का, असा सवाल आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भूमिपूजनाला लवकर परवानगी द्यावी, असे पत्र केंद्रीय नगरविकासमंत्र्यांना पाठविल्याचे विधान काल मुख्यमंत्र्यांनी केले.

आधी ‘लगीन’...‘लिव्हर’दानाचे!

$
0
0
विवाहबंधनात अडकण्यापूर्वी आईला ‘लिव्हरदान’ करून पुण्यातील एका तरुणीने अवयवदानाचा आदर्शच प्रस्थापित केला आहे. इतकेच नव्हे, तर या ऑपरेशनसाठी तिच्या भावी वराने एका महिन्याहून अधिक काळ चेन्नईत तिची सुश्रुषा करण्यासाठी देऊन लग्नापूर्वीपासूनच तिची साथ निभावली.

‘माळीण’साठी ३.५ कोटींचा निधी

$
0
0
माळीण गावच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या तरतुदीस आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच, या प्रक्रियेसाठी टेंडर किंवा अन्य प्रशासकीय बाबींमध्ये वेळ न दवडता तातडीचा विषय म्हणून प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदार नोंदणी ७० लाखांवर

$
0
0
विविध स्तरांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदारनोंदणी केल्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंख्या ७० लाखांच्या वर गेली आहे. दरम्यान, शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा मतदारनोंदणीचे काम सुरू झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images