Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अडवानींनी घेतली वासवानींची भेट

$
0
0
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी मंगळवारी पुण्यात भेट दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ आध्यात्मिक नेते दादा जे. पी. वासवानी यांची भेट त्यांनी घेतली.

पवना धरणात ५० टक्के पाणीसाठा

$
0
0
गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पवना धरण ४९.४८ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात १४४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी पवना धरण जुलै अखेरीस ८७.४२ टक्के भरले होते.

मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीलाही ज्युनिअर कॉलेजची ‘नो एंट्री’

$
0
0
अकरावीच्या प्रवेशासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या शिफारशीलाही यंदा पुण्यातील एका ज्युनिअर कॉलेजने ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविला. गुणवत्तेनुसार सुरू असलेल्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी नियमाला धरूनच हे पाऊल उचलण्यात आल्याचे कॉलेजकडून स्पष्ट करण्यात आले.

तंत्रशिक्षण संचालनालयावर प्रवेश रद्द करण्याची नामुष्की

$
0
0
एम. ई.- एम. टेक.च्या प्रवेशांसाठीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या टप्प्यावर तांत्रिक अडचणी आल्याने, पहिल्या टप्प्याचे सर्व प्रवेश रद्द करण्याची नामुष्की राज्य तंत्रशिक्षण संचालनालयावर मंगळवारी ओढावली.

येळ्ळूरप्रकरणी मनसेचे शहरात आंदोलन

$
0
0
कर्नाटक सरकारने येळ्ळूरमधील मराठी जनतेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी कर्नाटक सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासण्यासह कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

विधानसभेलाही ठरणार तरुण निर्णायक

$
0
0
पुणे शहर व जिल्ह्यात नुकत्याच राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत दाखल झालेल्या अर्जांपैकी १८ ते १९ या वयोगटातील तरुण मतदारांची संख्या ७२ हजार एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नवमतदारांची ही संख्या निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

सव्वाशे मतदार केंद्रे शहरात वाढणार

$
0
0
मतदार नोंदणीच्या मोहिमेत शहर आणि जिल्ह्यात मिळून सुमारे पावणेतीन लाख मतदारांनी नव्याने नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. मतदारांच्या संख्येने वाढ झाल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शहरात सुमारे सव्वाशे, तर जिल्ह्यात पन्नास अशी पावणेदोनशे मतदार केंद्रे वाढतील, असा अंदाज आहे.

मुख्य सभा ठरवणार शिक्षण मंडळाचे अधिकार

$
0
0
राज्य सरकारने महापालिकेच्या शिक्षणमंडळाचे सर्व अधिकार काढल्याने केवळ नामधारी ठरलेल्या मंडळाला नक्की कोणते अधिकार ठेवायचे याचा निर्णय आता पालिकेची मुख्य सभा घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या मुख्य सभेसमोर ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी शिक्षणप्रमुखांना दिले आहेत.

श्रावणात ‘आषाढ’सरींची जोरदार हजेरी

$
0
0
कधी ऊन तर कधी पावसाची सर अशी ओळख असलेल्या ऐन श्रावणात पुण्यात मंगळवारी जोरदार ‘आषाढसरीं’नी हजेरी लावली. दिवसभर एकामागून एक जोरदार सरी कोसळल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. रात्री नऊपर्यंत शहरात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बांधकाम व्यावसायिकावर महापालिका मेहेरबान

$
0
0
महापालिकेची परवानगी न घेता छोटे बांधकाम केले तर त्याची परवानगी मिळावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पालिकेत जाऊन बांधकाम विभागाचे उंबरे झिजवावे लागतात.

पर्यावरण अहवालात फसवी, चुकीची माहिती

$
0
0
पालिकेचा पर्यावरण अहवाल दरवर्षीच ‘कॉपी-पेस्ट’ असल्याची टीका केली जात असताना, यंदाच्या अहवालातील आकडेवारी फसवी, चुकीची आणि जुन्याच गृहितकांवर आधारित असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आला आहे.

ट्रेकिंगला जायचंय? मग नोंदणी आवश्यकच

$
0
0
व्यावसायिक दृष्टिकोनातून काढण्यात येणाऱ्या आणि फोफावलेल्या ट्रेकिंगच्या फॅडवर काही निर्बंध आणण्यासाठी सरकारने पावले उचण्याचा निर्णय घेतला आहे.

खडकवासला भरले; प्रथमच पाणी सोडले

$
0
0
पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने मंगळवारी रात्री धरणातून पाच हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले. यंदाच्या हंगामात प्रथमच नदीत पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा जलसंपदा खात्याकडून देण्यात आला आहे.

तंत्रज्ञान विद्यापीठ अजूनही ‘एकाकी’च

$
0
0
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला (बाटू) राज्यातील सर्व इंजिनीअरिंग कॉलेज संलग्न करण्याची राज्य सरकारची घोषणा या शैक्षणिक वर्षातही कायम राहिली आहे.

महामार्ग अधीक्षक पद रिक्त

$
0
0
गेल्या चार महिन्यापासून पुणे विभागाच्या महामार्ग पोलिस अधीक्षकांचे पद रिक्त असून, प्रभारी अधिकाऱ्यांच्या साह्याने या खात्याच्या कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. पुणे महामार्ग पोलिसांचे कार्यक्षेत्र मोठे आहे, त्यामुळे राज्य सरकारने या पदावर तत्काळ अधिकाऱ्यांची नेमणूक करणे अपेक्षित होते.

आमदारांबाबत जाहीर चर्चा नको

$
0
0
पक्षाच्या आमदारांबाबत काही आक्षेप असल्यास योग्य व्यासपीठावर मते मांडावीत, मात्र त्याबाबत जाहीर चर्चा करू नये, अशा शब्दांत भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकतेच पुण्यातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

पुणे : अनेक रस्ते झाले खड्डेमय

$
0
0
गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या बहुतांश खड्ड्यांची डागडुजी पूर्ण झाल्याचे पालिकेतर्फे सांगितले जात असले, तरी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पुन्हा बरेच रस्ते खड्डेमय झाले आहेत.

चेन्नईच्या ठेकेदारावर कृपादृष्टी

$
0
0
वारजे जलशुद्धीकरण केंद्र चालविण्यास देण्यासाठी आठ कोटी रुपयांचे चेन्नई येथील कंपनीचे टेंडर स्थायी समितीत नियम डावलून मान्य करण्यात आले. हा गंभीर प्रकार समोर आल्याने याचे फेरटेंडर काढण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत संबधित ठेकेदाराला ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

निधी पळविण्याचा सपाटा

$
0
0
शहराच्या विविध भागांतील नागरिकांसाठी पालिकेतर्फे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले जात असले, तरी स्थानिक नगरसेवकांच्या हट्टापायी त्यासाठी बजेटमधील उपलब्ध निधी पळविण्याचा सपाटाच पालिकेत सुरू झाला आहे.

पुण्यात दरड कोसळली; १५० अडकले!

$
0
0
मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळच्या माळीण गावात दरड कोसळली आहे. आज (बुधवार) पहाटे ही दुर्घटना घडली. गावातील १५० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>