Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमानतळावर मोफत वाय-फाय

$
0
0
तुम्ही जर विमानप्रवासाच्या निमित्ताने लोहगाव विमानतळावर जाणार असाल, तर तुम्हाला इंटरनेटचा वापर करण्यासाठी या ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध होणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून विमानतळावरील कर्मचारी आणि प्रवासी यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

शिक्षकांनाही ‘केआरए’

$
0
0
कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरदारांच्या मूल्यमापनासाठी आवश्यक मानली जाणारी ‘केआरए’ची पद्धत आता या पुढे राज्यातील शालेय शिक्षकांसाठीही लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्या विषयीचा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे विचाराधीन आहे.

राज्यभरात पावसाचा जोर वाढणार

$
0
0
दिवसभर असलेले ढगाळ वातावरण आणि संततधार पावसामुळे सोमवारी पुणेकरांना श्रावणात आषाढसरींचा अनुभव आला. दिवसभराच्या संततधारेत काही मध्यम स्वरूपाच्या सरीही कोसळल्या. दरम्यान राज्यात मान्सून सक्रिय असून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुण्यात सूर्यकिरणही प्रदूषित!

$
0
0
शहरातील हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाचे परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत असतानाच, सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांमधील (अल्ट्रा-व्हायलेट) हानीकारक घटकांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

धनगर समाजाचं उपोषण मागे

$
0
0
अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज कृती समितीने सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे. महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे तब्बल ९ दिवसांनंतर धनगर समाज कृती समितीने एक पाऊल मागे घेतले.

जुलैमध्ये सरासरीच्या ८१ टक्के पाऊस

$
0
0
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात विलंबाने सुरू झालेल्या पावसाने महिन्याची सरासरीच्या ८१ टक्क्यांपर्यंत पातळी गाठली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी २९७.७९ मिलीमीटर पाऊस पडतो. सोमवारी सकाळपर्यंत एकूण २४०.९० मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. जून महिन्यात सरासरीच्या २४ टक्केच पाऊस झाला होता.

कळमोडी धरण शंभर टक्के भरले

$
0
0
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आरला नदीवर बांधण्यात आलेले कळमोडी धरण शंभर टक्के भरले असल्याची माहिती प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता बाळासाहेब इंगळे यांनी दिली आहे. धरण भरल्याने सांडव्यातून पाण्याचा सातशे क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात फक्त आठ टक्के पेरण्या

$
0
0
जुलैच्या पंधरवड्यानंतर सक्रीय झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्यांना झालेल्या विलंबामुळे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी जुलैच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

उपोषण संपले; आंदोलन सुरूच

$
0
0
धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मागे घेण्यात आले. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी चक्री उपोषणाद्वारे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार धनगर समाजाच्या बांधवांनी केला आहे.

‘वल्कल’वर दुर्मिळ वृक्षांचे उद्यान

$
0
0
विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम घाटातील घनदाट जंगलांपासून ते किनारपट्टीवर आढळणाऱ्या काही खारफुटी जंगलातील दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आता सिंहगडाच्या पायथ्याला एकाच उद्यानात पाहायला मिळणार आहे.

अस्वच्छ आणि गलिच्छ सिंहगड रोड

$
0
0
‘स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे’ अशी टिमकी वाजवित स्वच्छतेचे अनेक पुरस्कार घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचे आता शहरातील अनेक भागात स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. कचराकुंड्या भरून वाहत असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही याकडे लक्ष देण्यास पालिकेच्या घनकचरा विभागाला वेळच मिळत नाही.

पुण्याचा प्रवीण ‘वर्ल्ड अॅट स्कूल’चा अॅम्बेसेडर

$
0
0
युनायटेड नेशन्शतर्फे (युनो) ‘वर्ल्ड अॅट स्कूल’ या उपक्रमासाठी ‘ग्लोबल यूथ अॅम्बेसेडर’मध्ये भारतातून पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रवीण निकम या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.

नव्या नाट्यगृहांची सुरक्षा वाऱ्यावरच

$
0
0
पुणे महापालिकेने बांधलेल्या नव्या नाट्यगृहांचे उद‍्घाटनानंतर बराच काळ होऊनही सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर अशी सुरक्षा यंत्रणा अद्याप कार्यान्वित झाली नसल्याचे समोर आले आहे. या नाट्यगृहांमध्ये सुरक्षेसंदर्भात कोणतीही साहित्य उपलब्ध नसून, ते साहित्य तातडीने मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

‘दहशतवादी घुसवणे ही पाकची रणनीती’

$
0
0
भारताविरुद्धच्या युद्धात हाती काहीही लागत नसल्यानेच पाकिस्तानकडून रणनीतीचा एक भाग म्हणून सातत्याने दहशतवादी घुसविण्याचे प्रकार सुरू झाल्याचे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. एम. पाटील यांनी व्यक्त केले.

गोष्ट रंगभूमीवरील एका ‘एक्झिट’ची

$
0
0
विंगेतून रंगमंचावर एन्ट्री घेतली, की ‘अरे हाय काय अन् नाय काय’ म्हणत प्रेक्षकांना सलग तीन दशके खुर्चीशी खिळवून ठेवणाऱ्या अभिनेत्याने अखेरच्या प्रयोगातही हाच वसा जपला...!

शरद पवारांचे कृष‌िविचार पुस्तकातून

$
0
0
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळात आपल्या भाषणातून मांडलेले कृषीविषयक विचार लवकरच पुस्तकरूपात येणार आहेत. पवार यांच्या कृषीविषयक ५१ भाषणांचे संकलन असलेल्या ‘दुसरी हरितक्रांती’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी होणार आहे.

वन विभाग आता फेसबुकवर

$
0
0
पंतप्रधान कार्यालयापासून ते छोट्यामोठ्या स्वयंसेवी संस्थांपर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात, मग आपण ‘आउटडेटेड’ का राहायचे, असा विचार करून वन विभागही आता ‘गुगल ग्रुप’ आणि ‘फेसबुक’ मार्फत पर्यावरणप्रेमींपर्यंत पोचणार आहे.

पुणे ते बोरिवली शिवनेरी जाणार व्हाया विमानतळ

$
0
0
पुण्याहून विदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते बोरिवली दरम्यान चालवण्यात येणारी शिवनेरी बससेवा व्हाया विमानतळ चालवण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने तयार केला आहे. या अगोदर दोन वेळा मुंबई विमानतळ ते पुणे हा बससेवेचा प्रयोग राबवण्यात आला होता.

दमदाटी केल्याप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
दारू प्यायला आणि जेवायला पैसे दिले नाही म्हणून एकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल आणि गाडी जबरदस्तीने नेल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

‘संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोका लावा’

$
0
0
पुणे शहर आणि खडकी परिसरामध्ये संघटित गुन्हेगारी करणारे, तसेच हत्यारांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी खडकीतील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष संजय खडसे यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images