Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

७ दिवसांच्या पासचे दर वाढले

$
0
0
एसटीकडून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत देण्यात येणा-या चार आणि सात दिवसांच्या पासच्या दरामध्ये येत्या ११ ऑगस्टपासून बदल करण्यात आला आहे.

आदिवासी वसतिगृहाबाहेर विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

$
0
0
जागतिक आदिवासी दिन उद्या, गुरुवारी पाळला जात असताना मांजरीच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्याचा रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची शोकांतिका बुधवारी उघडकीस आली. मांजरीतील वसतिगृह रस्त्यावर असल्याने त्याची जागा बदलण्याची मागणी जोर धरू लागली असून विद्यार्थ्याच्या मृत्युबद्दल संताप व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या सेविकांना खराब साड्या

$
0
0
महापालिकेच्या सेविकांना पुरविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या ऑर्डरनंतर प्रत्यक्षात कंत्राटदाराने खराब दर्जाच्या साड्या पुरविल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या कंत्राटदाराने पुरविलेल्या साड्या परत करून त्याचे बिल थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यावसायिक इमारतीत CCTV ला भाजपचा विरोध

$
0
0
शहरातील व्यावसायिक इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या आदेशास भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. शहराध्यक्ष विकास मठकरी आणि महापालिकेचे गटनेते अशोक येनपुरे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहिले आहे.

स्वाइन फ्लूचे आणखी ३ नवीन पेशंट

$
0
0
पिंपरी - चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूची लागण झालेले आणखी तीन नवीन संशयित पेशंट बुधवारी विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये एक व निरामयी हॉस्पिटलमध्ये दोन पेशंट दाखल झाले आहेत. यापैकी एका पेशंटला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.

माथाडी कायदा सक्षमपणे राबवावा

$
0
0
उद्योग क्षेत्रात माथाडी कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.

अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दिघी येथे संतप्त नागरिकांनी बुधवारी दगडफेक केली. त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

स्थगिती आदेश उठविण्यासाठी प्रयत्न

$
0
0
पवना थेट जलवाहिनीसंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाठविलेल्या अहवालाबाबत उच्चस्तरीय बैठक व्हावी. तसेच या योजनेबाबत स्थगिती उठवून कार्यवाहीला परवानगी द्यावी, अशी विनंती पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारला केली आहे.

१०.५ तोळे सोने मारहाण करून पळविले

$
0
0
बारामती तालुक्यातील मुरुम येथील दाम्पत्याला कु-हाडीचा धाक दाखवून करून घरातील सुमारे रोकड आणि साडेदहा तोळे असा दोन ते सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजता ही घटना घडली.

‘आरटीओ’ची आता टू व्हीलरवर नजर!

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ‘आरटीओ’ आता शहरातील टू व्हीलरवर नजर ठेवणार आहे. केवळ संशयित नव्हे तर, रस्त्यावर दिसणा-या प्रत्येक टू व्हीलरच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या कारवाईला सुरुवात होईल.

‘पुरुषोत्तम’ महागले

$
0
0
कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा महागली आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या तिकीट आणि सिझन पासेसच्या दरांत वाढ झाली असून, २०१४ मध्ये होत असलेल्या सुवर्णमहोत्सवाच्या आर्थिक उभारणीसाठी आणि भरत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणानंतर झालेली दरवाढ, घटलेल्या प्रेक्षक क्षमतेमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

पोलिस खात्याचे झाले ‘फायर ब्रिगेड’

$
0
0
‘पुण्यासह संपूर्ण देशात निर्माण झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्याची विश्वासार्हताच धोक्यात आली आहे. पोलिस खाते आज फायर ब्रिगेडसारखे काम करत आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला, तरी केवळ जागोजागी ‘सीसीटीव्ही’ बसवून दहशतवादी हल्ल्याचा प्रश्न सुटणार नाही,’ अशा शब्दांत माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी टीका केली आहे.

आदिवासींसाठी प्रगतीचा ‘कल्पवृक्ष’

$
0
0
विकासापासून दूर राहिलेल्या आणि जंगल हेच विश्व असलेले आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विकासाच्या मोहात पडून त्यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेली नाळ कमकूवत होत आहे. हे होऊ नये यासाठी कल्पवृक्ष संस्था भीमाशंकर अभयारण्यात एक अनोखी योजना राबविते आहे. विशेष म्हणजे यातील वनभोजन या उपक्रमाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘मॉक ड्रिल’ करून सुरक्षेची तपासणी

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटाची घटना ताजी असताना विमानगरमधील सिंबायोसिस कॉलेज स्फोटांनी उडवून देऊ, अशा धमकीचा फोन मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता खणखणला. या धमकीने कॉलेज हादरले. काही मिनिटातच पोलिस यंत्रणा कॉलेजमध्ये दाखल झाली. बॅगचा कसून तपास झाला.

गगनच्या अॅकॅडमीशी नवा करार

$
0
0
‘नेमबाज गगन नारंगच्या गन फॉर ग्लोरी अॅकॅडमीशी पाच वर्षांचा करार केला जाईल आणि तरतुदीप्रमाणे दहा टक्के भाडेवाढही केली जाणार नाही, अशी घोषणा क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी केली.

मुठा नदी वाहिली...!

$
0
0
खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीत बुधवारी ७४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुठा नदी प्रथमच दुथडी भरून वाहिली. दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणार्या चारही धरणांत आता १८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.

प्रगती एक्सप्रेसचा 'गोंधळ'

$
0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी प्रगती एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्याचे पाऊल रेल्वे प्रशासनाने उचलले असले, तरी दुसर्या बाजूला गाडीचे वेळापत्रक पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.

दहीहंडीला सनी लिऑन नकोच

$
0
0
‘जिस्म-टू’ या चित्रपटामुळे गाजत असलेली सनी लिऑन पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे फलक शहरात झळकत आहेत. लिऑनच्या पुणे भेटीला मात्र भारतीय जनता युवा मोर्चाने आक्षेप घेतला असून या भेटीदरम्यान आंदोलनचा पवित्रा घेतला आहे.

दहीहंडीला हायटेक सुरक्षा

$
0
0
शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी पाहण्यासाठी येणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दहीहंडी मंडळांनी पुढाकार घेतला आहे. मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही यासह खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची तयारी मंडळांनी केली आहे. काही मंडळांनी दहीहंडी पाहण्यासाठी येणार्या नागरिकांचा विमा उतरविण्याचीही सोय केली आहे.

रस्त्यावर दहीहंडीला परवानगी

$
0
0
दहीहंडीच्या परवानगीबाबत पोलिसांनी दोन पावले मागे घेतली असून, सुरक्षिततेसाठी शक्य असेल त्या मंडळांनी रस्त्यांऐवजी पर्यायी जागांचा वापर करावा, अशी भूमिका बुधवारी घेतली. या संदर्भात प्रमुख मंडळांशी चर्चा करून पर्यायी जागा निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images