अमेरिकेत शिकायला जाणा-या विद्यार्थ्यांना अमेरिकेविषयीची सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘अमेरिकन स्टडीज’ हा ऑटोनॉमस डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिकन संस्कृती, राहणीमान, शिक्षणपद्धती आदीबाबत संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
अमेरिका जाणून घ्या डिप्लोमातून
↧
↧
बावधनमध्ये लॅपटॉप हिसकावला
विद्यार्थ्याला मारहाण करून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्याचा लॅपटॉप पळवून नेल्याची घटना नुकतीच बावधन येथील एनडीए रोडवर घडली. हा विद्यार्थी एमआयटी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या दुस-या वर्षात शिकत आहे.
↧
कोथरूडमध्ये महिलांची दहीहंडी
दहीहंडीच्या उत्सवात महिला वर्गालाही सहभागी होता यावे यासाठी कोथरूड भागात यंदाच्या वर्षी महिला दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिला गोविंदांचे पथक ही दहीहंडी फोडणार आहे.
↧
बचतगटांतून मिळेल भावी नेतृत्त्व
‘बचतगटांचे पुण्यातील काम उल्लेखनीय सुरू असून, या उद्योजिकाच भविष्यात लोकप्रतिनिधी आणि महापौरांच्या जागेवर पहायला मिळतील,’ अशी अपेक्षा म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी व्यक्त केली. ईश्वर परमार ग्रुप, स्फूर्ती महिला मंडळ आणि महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील आदर्श बचत गटांचा सत्कार नुकताच बालगंधर्व रंगमंदिरमध्ये आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात झाला.
↧
पालिका शाळेतील गरीब विद्यार्थ्यांवर मोफत उपचार
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीने बुधवारी घेतला. एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-या कुटुंबातील मुलांनाच याचा लाभ घेता येणार असून, आता हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
↧
↧
सकाळ ढगाळ, तर दुपार तेजाळ
शहर आणि परिसरात मधूनच जोरदार सर आणि अवघ्या काही क्षणांमध्ये लख्ख ऊन असे वातावरण बुधवारी होते. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली असली, तरी सायंकाळी पावसाचा हलका शिडकावा झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत १.८ मिलिमीटर पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढील दोन दिवसांत शहरांत अधूनमधून तुरळक सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
↧
प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर बंदी
पालिकेने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणा-या व्यावसायिकांवर बुधवारी कारवाई केली. या कारवाईत १७४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, एका व्यावसायिकाविरुद्ध खटलाही दाखल केला जाणार आहे.
↧
बजेट सहभागाविषयी नागरिकांना करा सजग
प्रभागांतर्गत कोणती कामे सुचवायची..., कामे सुचविण्यासाठीची मर्यादा नेमकी किती... कोणत्या प्रकारची कामे पात्र ठरू शकतात..., अधिकाधिक कामांना प्राधान्य मिळण्यासाठी काय करायचे..., कामे पात्र-अपात्र ठरण्याबाबतचे निकष काय याची माहिती नागरिकांना व्हावी, अशा विविध प्रकारच्या सूचना विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे बुधवारी पालिकेला करण्यात आल्या.
↧
‘आयपीसीसी’ परीक्षेत पुणेकरांची बाजी
अवघड मानल्या जाणा-या चार्टर्ड अकाउंन्टन्सीच्या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘आयपीसीसी’ परीक्षेत पुणेकर विद्यार्थ्यांनी सुपरफास्ट आघाडी घेतली आहे. आयपीसीसीच्या पन्नास विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत पुण्याच्या तब्बल बारा विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे.
↧
↧
अपराजित योद्धयाचा इतिहास स्पर्धात्मक उपक्रमातून
पेशवाई कालखंडाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे..? तत्त्कालीन घडामोडींचा अभ्यास तुम्ही केलाय..? नाही तर मग स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होवून या गोष्टी जाणण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अपराजित योद्धा म्हणून इतिहासाने गौरविलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १८ ऑगस्टला ‘पेशवा दौलत खजिना शोध स्पर्धा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
↧
‘वखार महामंडळाचे निर्णय शेतक-यांच्या हिताचे’
उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्याची गरज असून त्यात राज्य वखार महामंमडळाची भूमिका महत्त्वाची आहे. शेतीमालाचे क्लिनिंग, गिड्रिंग, शीतगृहांची साखळी यासारखे निर्णय हे शेतकर्यांच्या हिताचेच आहेत, असे मत राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी बुधवारी व्यक्त केले.
↧
वर्षभरात ‘एफडीए’ची १३ कोटींची वसुली
केंद्र सरकारने केलेल्या अन्न व सुरक्षा कायदा २००६ नुसार व्यवसायाची नोंदणी व परवाने देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राबविलेल्या वर्षभराच्या मोहिमेतंर्गत राज्यात पुणे विभागाने सुमारे तेरा कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. परिणामी, औषधविक्रीसह वैद्यकीय क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणावर बेकायदा कारभार सुरू आहे, याची प्रचिती येत आहे.
↧
निम्म्या पुण्यात ‘घागर रिकामी’
पर्वती आणि लष्कर जलकेंद्रातील वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शहराचा पूर्व भाग आणि मध्य पुण्यातील अनेक भागांमधील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळीत झाला. त्यामुळे उद्या (गुरूवारी) जलकेंद्रातील दुरूस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले असून, शहरात नेहेमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे.
↧
↧
नेकलेस चोरणा-या तरूणीला अटक
भाडेतत्त्वावर खोलीचा घेण्याचा बहाणा करून घरातील सुमारे ४२ हजार रुपयांचे नेकलेस पळवून नेल्याच्या आरोपावरू महिलेला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. हवेली तालुक्याती केसनंद येथे रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडली होती.
↧
भूकंप, पूर नियंत्रणासाठी सरकार उचलणार पावले
राज्याच्या विविध भागांतील नद्यांना येणारा पूर, भूकंपाच्या घटना आणि दरडी कोसळण्याच्या प्रसंगात तातडीने आपत्कालीन मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून त्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी मुंबईत बैठक बोलाविली आहे.
↧
सलीम अली सरोवरावर आजपासून स्वच्छता मोहीम
दोन महिन्यानंतर येणा-या पक्ष्यांचे स्वागत करण्यासाठी महापालिका व निसर्गप्रेमींनी कंबर कसली आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने सलीम अली सरोवराच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात होत आहे. साधारणत: पंधरा दिवस चालणार्या या मोहिमेत सरोवराचा सर्व परिसर स्वच्छ केला जाणार आहे.
↧
‘भारत भवन’साठी मदतीचे आवाहन
वाराणसी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची राहण्याची सोय व्हावी, यासाठी ह्युमॅनिटी अॅक्शन एड संस्थेच्या वतीने ‘भारत भवन’ उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. हे बांधकाम लोकसहभागातून करण्यात येणार असल्याने नागरिकांनी यासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.
↧
↧
‘एनसीएल’मधील दोघांची कांस्य पदकासाठी निवड
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील (एनसीएल) डॉ. बी. एल. व्ही. प्रसाद आणि डॉ. जी. जे. संजयन या शास्त्रज्ञांची केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियातर्फे (सीआरएसआय) कांस्य पदकासाठी निवड करण्यात आली आहे. रसायनशास्त्रातील मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. प्रसाद आणि डॉ. संजयन यांना हा बहुमान लाभला आहे.
↧
दत्तक प्रकरणातील तिघांचा अर्ज फेटाळला
प्रीतमंदिर संस्थेतून परदेशात बेकायदा दत्तक देऊन देणग्या उकळणा-या तिघांचा अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. आर. महाजन यांनी हा अर्ज फेटाळला.
↧
गंडा घालणा-या सर्वेश्वर गुरुजीला अटक
केंद्र सरकारची योजना राबविणारी अधिकृत संस्था असल्याचे भासवून या संस्थेत नियुक्तीसाठी लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या प्रकरणात मध्यस्थीचे काम करणार्या सर्वेश्वर गुरुजी याला सीबीआयने अटक केली आहे. त्याला दहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. के. यावलकर यांनी हा आदेश दिला.
↧
More Pages to Explore .....