Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

केंद्र सरकार अहवालाचा नक्कीच पुनर्विचार करेल

$
0
0
पश्चिम घाट जैविविधता तज्ज्ञ समितीचा अहवाल हा तळागाळातील प्रत्येक समाजाला पुढे घेऊन जाणारा आणि पर्यावरणाच्या संवर्धनाला पूरक आहे. त्यामुळे मोदी सरकार माझ्या अहवालाचा नक्कीच पुनर्विचार करेल, असे मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

संरक्षण करारनामा रोखतो वृक्षतोड

$
0
0
खासगी वनक्षेत्रात होत असलेली बेसुमार वृक्षतोड थांबविण्यासाठी अॅप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशनने (एइआरएफ)अनोखा उपक्रम राबविला आहे. खासगी जमीनधारकांबरोबर ‘जंगल संरक्षण करारनामा’ करून फाउंडेशनने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २५०० एकर खासगी वनक्षेत्र संरक्षित केले आहे.

खेळाच्या मैदानामुळे मुलांना फायदा

$
0
0
पुण्यातील लक्ष्मी रोड आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्ता हे पुणेकरांचे खरेदीच्यादृष्टीने महत्त्वाचे रस्ते. महात्मा गांधी रस्ता हा वॉर्ड क्रमांक आठमध्ये असून, या वॉर्डातील इंच-इंच जमिनीला लाखोंचे मोल आहे. अशा मोक्याच्या परिसरात मुलांसाठी खेळाचे मैदान करणे हे आव्हान होते.

आपल्या पुण्याच्या पर्यावरणाचं ‘स्टेटस’ काय?

$
0
0
संपूर्ण जगामध्ये ५ जून हा ‘पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पुणे शहर आणि परिसरातील निसर्गसंपदा आणि गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची कारणे याचा घेतलेला हा धावता आढावा...

पुणे विद्यापीठाचा साक्षीदार ‘गोरख चिंच’ कोसळला

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार असलेले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील गोरख चिंचेचा वृक्ष मंगळवारी उन्मळून पडला. किमान दीडशे वर्षे वयाचे आणि पस्तीस फुट घेर असणारे अवाढव्य खोड असणारे हा वृक्ष शहरातील सर्वांत जुन्या वृक्षांपैकी एक असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात येत आहे.

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

$
0
0
‘शादी डॉट कॉम’वरून ओळख झालेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवूनही लग्न न केल्याने कॅम्पमधील एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी नागपूर येथील एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
सातारा रोडवर वाळवेकरनगरजवळ मंगळवारी सकाळी पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दुचाकीवरील दोघाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

जिन्यावरून पडल्याने बालकाचा मृत्यू

$
0
0
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या पाच वर्षांच्या बालकाचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना दापोडी येथील महात्मा फुलेनगरमध्ये बुधवारी (चार जून) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.

तरुणाच्या खूनप्रकरणी सातजणांना अटक

$
0
0
तरुणाचा खून केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. त्यांना नऊ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी विशाल गोविंद सुत्रावे (वय २१, रा. तुकाई दर्शन), अतुल राजेंद्र आगम (२१, रा. गोंधळेनगर), रणजित शंकर यादव (२४, रा. काळेपडळ), सागर चंद्र्रकांत सुतार (१९, रा. भेकराईनगर), शुभम दत्तात्रय बरडे (१९, काळेपडळ), दादा मोडक उर्फ शेखर अनिल मोडक (१९, र. वडकी गाव), आकाश रमेश लष्करे (१९, रा. वडकी गाव) यांना अटक करण्यात आली आहे.

माथाडी कामगारांवर खंडणीप्रकरणी गुन्हा

$
0
0
येरवडा येथील पंचशील टेकपार्क येथे दोघा माथाडी कामगारांकडून टेम्पोमधून फर्निचर खाली करण्याच्या नावाखाली सात हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालखीसाठी पिंपरी महापालिकेकडून मदत

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पाण्याचे टँकर, अग्निशमनचे बंब, वैद्यकीय पथक यांसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी (चार जून) दिली.

बैठक फिस्कटल्याने बाजार राहणार बंद

$
0
0
राज्य सरकारने हमालीचे काम करण्यासाठी लागू केलेल्या टोळी पद्धतीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कामगार आयुक्तांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक फिस्कटली. त्यामुळे मार्केट यार्डमधील फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजार बंद राहाणार आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप स्थगित

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांपैकी काही मागण्यांची येत्या दहा दिवसांत अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन राज्य सरकारकडून मिळाल्यानंतर संपावर गेलेल्या राज्यातील बारा हजार डॉक्टरांनी बुधवारी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

वीजवाहिन्यांमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले

$
0
0
पद्मावती चौकात वीजवाहिन्यांचे काम करण्यासाठी खांबावर चढलेला कामगार विजेचा धक्का बसून तारांच्या जाळ्यात अडकून राहिल्याचा प्रकार बुधवारी घडला. महापालिकेच्या वतीने हे काम सुरू होते. अखेर नागरिकांनी त्याला वाचविले.

विद्यार्थ्यांच्या पैशांवर ‘JSPM’चा डल्ला

$
0
0
पुण्यातील जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या कॉलेजने गेल्या तीन वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांच्या ‘ईबीसी’चे व डिपॉझिटचे पैसे परत दिले नसून त्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे सरचिटणीस विठ्ठलराव पवार यांनी पत्रकार परिषदेत नुकताच केला.

कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतील ‘एलीबीटी’वर आज निर्णय

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याबाबत दिल्लीमध्ये ५ जून रोजी संरक्षण मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत ‘एलबीटी’बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुणे कँटोन्मेंटची कार्यकारिणी बरखास्त

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यकारिणीची मुदत संपली असल्याने कार्यकारिणी बरखास्त करण्याचा आदेश केंद्र सरकारकडून प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ डिफेन्स इस्टेटकडे (पीडीडीई) आला आहे. गुरुवारी आदेशाची प्रत बोर्डाकडे आल्यानंतर नगरसेवक हे सहा वर्षांच्या कालावधीनंतर या पदावरून पायउतार होतील. बोर्डाचा कारभार आता त्रिसदस्यीय समितीकडून पाहिला जाणार असून, पुढील निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

‘एलबीटी’च्या बैठकीला मुहूर्त केव्हा मिळणार?

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था करात (एलबीटी) सुधारणा करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि व्यापारी संघटनांमध्ये होणाऱ्या बैठकीला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे एलबीटीचा तिढा अद्याप सुटण्याच्या मार्गावर नाही.

डीपी रोडचे क्राँकिटीकरण काही दिवसांसाठी स्थगित

$
0
0
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान असलेल्या डीपी रोडवर क्राँक्रिटीकरणाचा निर्णय पुढील काही दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या रस्त्याची आवश्यक ती सर्व पाहणी करून या भागातील रहदारीचा योग्य तो अभ्यास करून त्यानंतरच हा रस्ता सिमेंट क्राँक्रिटचा करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

खूनप्रकरणी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0
एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सहा जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने​ दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images