Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विहिरीत बुडून दोन भावांचा मृत्यू

$
0
0
हांडेवाडी चौकातील विहिरीत पडून दोघा लहान भावांचा भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दोघेही खेळण्यासाठी बाहेर पडले असताना हा प्रकार झाला. यश संदीप राऊत (वय १३) आणि श्रेयस राऊत (वय १०, रा. हांडेवाडी चौक, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघा भावांची नावे आहेत.

आंदोलनामुळे प्रक्रिया स्थगित; आता मुहूर्त १९ मेचा

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) नोंदविण्यात आलेल्या हरकती-सूचनांची सुनावणी पहिल्याच दिवशी स्थगित करण्याची वेळ महापालिकेवर ओढवली.

‘नकारात्मक’ समितीची नियुक्ती रद्द करण्याची मागणी

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यावर (डीपी) आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राज्य सरकारने या समितीवर नियुक्त केलेले सदस्य नकारात्मक दृष्टीने विचार करत असल्याने त्यांची नियुक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी माजी महापौर दीपक मानकर यांनी केली आहे.

जात पडताळणी अर्ज पडून

$
0
0
जातपडताळणीचे राज्यभरात सुमारे सव्वादोन लाख अर्ज प्रलंबित असून, त्यामध्ये ९८,९२७ अर्ज विद्यार्थ्यांचे आहेत. अर्जांची छाननी करणाऱ्या राज्यभरातील पंधरापैकी बारा समित्यांवर सदस्यच नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

पुणेकर तरुणाकडून ‘बोलणारी काठी’

$
0
0
अंध व्यक्तींना येणाऱ्या अडचणींबाबत केवळ हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा आपल्याकडे असणारे ज्ञान त्यांच्यासाठी वापरण्याचा अनोखा प्रयत्न पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील रोहन वाळवेकर या विद्यार्थ्याने केला आहे.

‘पीएफ’ची तक्रार करताय? संपर्काची माहिती आठवणीने द्या!

$
0
0
कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाबाबत (पीएफ) तक्रारी केल्यानंतर त्यांचे निवारण करताना एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) विभागापुढे संपर्काच्या माहितीअभावी अडचण निर्माण होत आहे.

आईला पोटगी देण्याचा आदेश

$
0
0
पॅरलिसिसचा झटका आलेला पतीचा आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग मुलासह तीन मुलांचा सांभाळ करण्यासाठी ‘तिने’ परदेशात एका घरी स्वयंपाकाचे काम केले... आयुष्यभर कष्ट करून जमविलेल्या पैशातून पुण्यात घर घेतले...

बुद्धपौर्णिमेच्या रात्री होणार वन्य प्राण्यांची गणना

$
0
0
अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का, गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली, नवीन कोणता प्राणी दाखल झालाय का….या आणि अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते.

BSNL येरवड्यात उभारणार कॉल सेंटर

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ‘बीएसएनएल’ने पुण्यात येरवडा येथे कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बीएसएनएल’चे सध्या भोसरी येथे कॉल सेंटर आहे.

लग्नपत्रिका… नव्हे, पॉकेट डायरी!

$
0
0
लग्नपत्रिका म्हणजे गणपतीचे चित्र आणि आतमध्ये दोन पानांवर तपशील… अशी पत्रिका कितीही आकर्षक असली, तरीही लग्नानंतर त्याचा उपयोग नसल्याने ती टाकून दिली जाते; पण, पुण्यातील एका परिवाराने काढलेली लग्नपत्रिका मात्र जपून ठेवण्यासारखी आहे.

बक्षिसांचे पैसे क्षेत्रीय कार्यालयांकडे ‘जैसे थे’च

$
0
0
महापालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसाची रक्कम खर्च करण्यात क्षेत्रीय कार्यालयांना अपयश आले आहे.

जीव मुठीत धरूनच करावा लागतो प्रवास

$
0
0
रात्रीच्या वेळी एसटी बसने पुण्यात आलेल्या नागरिकांना स्वारगेटवरून इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रयत्नांची ‘सर्कस’ करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘पीएमपी’च्या बस स्टॉपवर बसच्या वेळापत्रकाचा ठावठिकाणाच नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असून, इच्छा नसताना शेअर रिक्षाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

कारवार्इ थंडावली; अतिक्रमणे पुन्हा उभारली

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची अतिक्रमणविरोधी कारवाई थंडावली असल्याने, दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमणांपासून मोकळ्या झालेल्या भागांना पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडू लागला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बोर्डाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती.

औषध खरेदीत अनियमितता

$
0
0
कीटक प्रतिबंधक औषध खरेदीच्या व्यवहारांमध्ये पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत अनियमितता असल्याचा आरोप मनसेच्या रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी केला. तसेच, या औषधांच्या खरेदीचा गेल्या दहा वर्षांचा अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली;

घरफोडी करणारे बंटी-बबली गजाआड

$
0
0
धुणी-भांड्याचे काम करत असल्याचा बनाव रचत सोसायट्यांमध्ये घुसून घरफोड्या करणाऱ्या बंटी-बबलीला चतुश्रृंगी पोलिसांनी गजाआड केले. या बंटी-बबलीने घरफोडीचे तीन तर चोरीचा एक असे चार गुन्हे केले असून त्यांच्या ताब्यातून १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

हॉटेल प्राइडवर हातोडा

$
0
0
महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा पत्राशेड आणि बांधकाम करणाऱ्या शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी कारवाई केली. हॉटेलच्या चारही बाजूंना घालण्यात आलेले बेकायदा पत्राशेड, हॉटेलच्या बेसमध्ये असलेली कार्यालये तसेच किचनमधील सुमारे १४ हजार स्क्वेअर फूटाचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले.

मुख्य मतमोजणीआधी टपाली मते मोजणार

$
0
0
पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी अर्धा तास टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार असून, १६ मे रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या मतपत्रिका मोजणीसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत.

‘घोरपडी’तील रेल्वे गेटमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर

$
0
0
खामगावच्या रेल्वे अपघाताने आम्हाला भीती वाटत आहे... आमच्या घोरपडी रेल्वेगेट शेजारी मोठी लोकवस्ती आहे, रोज वाहतूक कोंडी होत असते. चुकून रेल्वे गेटमनने फाटक उघडे ठेवले तर मोठी हानी होऊ शकते...

साबुर्डीमध्ये बलात्काराचे प्रकरण उघडकीस

$
0
0
पती व लहान बाळाला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना खेड तालुक्यातील साबुर्डी या गावात उघडकीस आली आहे. ही घटना एक महिन्यापूर्वी रात्री एकच्या सुमारास संबंधित महिलेच्या घरातच घडली.

बोगस डॉक्टरला येरवड्यात अटक

$
0
0
डॉक्टर नसतानाही एका महिलेवर उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता आठ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हरिशंकर ऊर्फ शंकर सूर्यनारायण ठाकूर (३४, रा. वडगांव शेरी ) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images