Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गाडी जळाली : भरपार्इ देण्याचे आदेश

$
0
0
घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कोडा गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे गाडी जळाल्याप्रकरणी उत्पादनात त्रुटी (मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट) असल्याच्या कारणावरून नुकसानभरपाई मिळावी म्हणून ग्राहक कोर्टात दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये नुकसानभरपाईची जबाबदारी कंपनीवर आणि डीलरवर ढकलणाऱ्या इन्श्युरन्स कंपनीने ग्राहकाला १५ लाख ६२,४८० रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

वीजबिलातील वाढ म्हणजे सुरक्षा ठेव

$
0
0
शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ग्राहकांच्या यंदाच्या वीजबिलात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमइआरसी) नियमांनुसार सुरक्षा ठेवीतील (सिक्युरिटी डिपॉझिट) यंदाच्या बिलांमध्ये समाविष्ट झाल्याने ही वाढ दिसून येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

ऑनलाइन बुकिंगचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

$
0
0
राज्य सरकारच्या आदेशानुसार ऑनलाइन तिकीट विक्रीची यंत्रणा उभी करणे परवडत नसल्याची अडचण सिंगल स्क्रीन थिएटर चालकांनी मांडली आहे. हा विषय राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, आता सरकारच यावर पुढील निर्णय घेणार आहे.

पथारी परवान्यासाठी बनावट पावत्या

$
0
0
रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरात राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत पथारी परवाना मिळवून देण्यासाठी चक्क बनावट पावत्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

‘बिल्डर्स असोसिएशन’ करणार काळी यादी

$
0
0
चुकीच्या किंवा बेकायदेशीर पद्धतीने काम करणाऱ्या बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचा निर्णय ‘असोसिएशन ऑफ बिल्डर्स अँड रिअल्टर्स इंडिया’तर्फे (एबीआरआय) घेण्यात आला आहे.

रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

$
0
0
‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’ यांच्यातर्फे साहित्य परिषदेच्या सहकार्याने दोन दिवसांचे ‘रोटरी मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १० आणि ११ मे रोजी सहकारनगरच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये संमेलन होणार असून, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद यांची पर्वणी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

‘पोलिस व्हेरिफिकेशन’मुळे‌ विलंब

$
0
0
पासपोर्ट प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने पासपोर्ट मिळण्याचा कालवधी कमी होईल, असा नागरिकांचा समज पोलिसांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. पासपोर्ट सेवाकेंद्रातील अर्ज भरण्याची आणि पासपोर्ट प्रिटिंगची प्रक्रिया वेगाने होत असली तरीही, पोलिसांच्या उदासीनतेमुळे ‘पोलिस व्हेरिफेकशन’ला मात्र दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो आहे.

नागरिकांशी संवाद साधण्यावर भर

$
0
0
कॅम्प परिसरातील दुचाकी चोरीचे आव्हान, जातीय तणाव निर्माण होणार नाही यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांपासून शाळा कॉलेजमधील टपोरी पोरांना धडा शिकवणारे लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बरकत मुजावर यांच्याशी साधलेला संवाद

लष्कर पोलिस ठाण्यासमोर दुचाकीचोरांचे आव्हान

$
0
0
संमिश्र लोकवस्तीचा कॅम्प परिसर समग्र भारताचे दर्शन घडवतो. व्यापारी आणि व्यावसायिकांची गर्दी असलेल्या या परिसरात सर्वाधिक गुन्हे घडतात ते दुचाकीचोरीचे! ज्या रस्त्यांवर ‘सीसीटीव्ही’ नाहीत, अशा ठिकाणांहून दुचाकी चोरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘हॉकर्स पॉलिसी’चे अडथळे संपेनात

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डातील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी बोर्डाने ‘हॉकर्स पॉलिसी’ला मान्यता ​दिली असली, तरीही व्यावसायिकांच्या नोंदणीला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीची करण्यात आली माहे. मात्र, बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आला आहे.

संचालक आणि प्राचार्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

$
0
0
एका शाळेतील विद्यार्थिनीवर बसच्या सहायकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात कसूर केल्याप्रकरणी शाळेचे संचालक आणि प्राचार्य या दोघांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टात अपील करणार असल्याचे पालक संघटनेचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले.

मुलाचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी एकावर गुन्हा

$
0
0
लोहगाव येथील शुभम हेल्थ आणि फुड क्लब येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रमेश बबन मोझे (रा. मोझे आळी, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासेवाडीत तडीपाराकडून लूटमार

$
0
0
कासेवाडीतील तडीपार गुन्हेगाराने दुकानदाराचे पैसे न दिल्याच्या रागातून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार सुरू असताना खडक पोलिसांच्या बीट मार्शलने तडीपार गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले असून त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली आहे.

खून करणारा अल्पवयीन अटकेत

$
0
0
मुळा नदीच्या पात्रात दगडाने ठेचून खून करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटली असून त्याचा खून एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तीन दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले.

महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या फौजदारावर गुन्हा

$
0
0
नशेच्या भरात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या फौजदाराविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार आणि महिला पोलिस कर्मचारी दोघेही पोलिस मुख्यालयात नोकरी करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ धोक्यात?

$
0
0
भारतीय चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या वाटचालीतील अनमोल ठेवा असलेल्या चित्रपटांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेली ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ अद्यापही योजनेच्याच स्वरूपात आहे. तिला मूर्त स्वरूप आलेले नाही.

टपाल खात्याचे ATM महिन्याभरात

$
0
0
टपाल खात्याचे पुण्यातील पहिले ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, चालू महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना ही सुविधा मिळू शकणार आहे. ‘मुख्य टपाल कार्यालयाच्या (जीपीओ) प्रवेशद्वाराजवळ हे सेंटर उभारण्यात येत आहे.

‘UPSC’च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात सवलत हवी

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुलाखतीसाठी नवी दिल्ली येथे आलेल्या राज्यातील उमेदवारांना महाराष्ट्र सदनात पूर्वीप्रमाणेच आठ दिवस सवलतीच्या दरात राहण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रेल्वे फाटक उघडण्यासाठी गेटमनवर दबावाच्या तक्रारी

$
0
0
रेल्वेच्या फाटकावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फाटक उघडण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार गावातल्या काही लोकांकडून होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे अपघातांना निमंत्रण देणारे हे प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

पोलिस आयुक्तालयाचे फायर ऑडिट

$
0
0
पोलिस आयुक्तालयाच्या तळमजल्यावरील सर्व्हर रूमला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व इमारतीचे फायर तसेच पॉवर ऑडिट करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर आयुक्तालयातील सर्व वायरिंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images