Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गोंधळ ‘एक खिडकी’चा

$
0
0
प्रचारसभा, पदयात्रा अशा परवानगी घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी’ योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे येथे परवानगी घेण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांवर स्थानिक पोलिस स्टेशन ते एक खिडकी आणि तेथून पुन्हा पोलिस स्टेशन असे हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.

आखाड्यात उतरले आयात उमेदवार

$
0
0
उमेदवारी नाकारल्यामुळे खासदार गजानन बाबर यांनी सोडलेली शिवसेनेची साथ, राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शेतकरी कामगार पक्षाकडून घेतलेली उमेदवारी, शिवसेना सोडून आलेल्या राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या क्षणी दिलेली उमेदवारी आणि आपल्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेसाठी घातलेले लक्ष यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील लढत लक्ष वेधून घेत आहे.

राष्ट्रवादीला मताधिक्याची चिंता

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाची खात्री असली, तरी मताधिक्याची चिंता लागली आहे. बारामतीतील पाण्याविना तहानलेल्या २२ गावांमध्ये विरोधकांनी वाढविलेला संपर्क, ऐन निवडणुकीत झालेल्या गारपिटीमुळे नाराज शेतकरीवर्ग आणि या वेळी होणारी तिरंगी लढत यामुळे मताधिक्य घटले तर होणारी मानहानी राष्ट्रवादीच्या ​जिव्हारी लागणार आहे.

बायफोकल की चांगले कॉलेज?

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेशादरम्यान यंदा ‘बायफोकल’चा प्रवेश निश्चित करायचा, की चांगले कॉलेज मिळवायचे, असा संभ्रम विद्यार्थी-पालकांना पडणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत ‘बायफोकल’साठी सुरू असलेली ‘टेबल अॅडमिशन’ पद्धत यंदा बंद करण्यात येत असल्याने ही परिस्थिती ओढवणार आहे.

नवी टोलवाढ वर्षासाठी

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’च्या टोलमध्ये वाढ करण्याच्या निर्णयापाठोपाठ येत्या एक एप्रिलपासून पुणे-कोल्हापूर आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलची रक्कम वाढणार आहे. नव्याने लागू करण्यात येणारी दरवाढ वर्षभरासाठी लागू राहाणार आहे.

...पण अॅडमिट कार्ड हातात नाहीत

$
0
0
‘जेईई-मेन’ ही परीक्षा अवघ्या पाच दिवसांवर परीक्षा आलेली असताना ही परीक्षा देण्यास इच्छुक काही विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप ‘अॅडमिट कार्ड’च पडलेली नाहीत. राज्यातील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही परीक्षा देणे आवश्यक आहे.

काँग्रेसचे युवकांसाठी ‘फ्लॅशमॉब’

$
0
0
नव्या पिढीपर्यंत पक्षाचा युवा चेहरा पोहोचविण्यासाठी, त्यांच्या भाषेत संवाद साधण्यासाठी अन् त्यांना ‘कनेक्ट’ करून घेण्यासाठी, काँग्रेस आता मॉल, मल्टिप्लेक्स आणि कॉलेजमधील युवकांना सहभागी करून घेणार आहे, ते ही ‘फ्लॅशमॉब’च्या आधुनिक तंत्राने!

लगबगीची वेळ...नऊ साडेनऊची

$
0
0
रात्री उशिरापर्यंत बैठका-नियोजन सुरू राहिल्याने सकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांमध्ये काहीशा उशिराने जाग आलेली असते. कार्यकर्ते जमा होऊ लागतात आणि काही वेळातच कार्यालय लोकांनी फुलून जाते.

संस्कृतीशी नाळ जोडणार…

$
0
0
नाट्य, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र अशा विविध कलांमध्ये रंगणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. पुणेकरांच्या सांस्कृतिक संपन्नतेमध्ये भर घालण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आता सुरू करीत आहे ‘कल्चर क्लब’!

तरुणाईला मोल पहिल्या मताचं

$
0
0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीद्वारे देशात कोणाचे सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे, ती तरुणाईची आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची. यंदाच्या लोकसभेत जवळपास दहा टक्के मतदार पहिल्यांदा मतदान करणार असून, त्यांचेच मत नवा पंतप्रधान ठरवणार आहे.

मतदारयादी आज प्रसिद्ध होणार

$
0
0
मतदार नोंदणीच्या तारखेवरून झालेल्या घोळानंतर अखेर पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी आज, मंगळवारी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली.

मुंडे, उद्धव ठाकरेंची सभा

$
0
0
बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र कन्हेरी येथे जाहीरसभेने झाल्यानंतर, महायुतीतर्फे महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी या आठवड्यात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.

सोलापूर, कोल्हापूर प्रवास महाग

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’च्या टोलमध्ये वाढ करण्याच्या निर्णयापाठोपाठ येत्या एक एप्रिलपासून पुणे-कोल्हापूर आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलची रक्कम वाढणार आहे. नव्याने लागू करण्यात येणारी दरवाढ वर्षभरासाठी लागू राहाणार आहे.

औकात दाखवून देईन

$
0
0
‘देशाला खंबीर नेतृत्व द्यायचे असेल, तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाच्या योग्यतेचे आहेत. त्यामुळेच त्यांना पाठिंबा दिला. मात्र, मला त्यांच्या मुखवट्याची गरज नाही. मात्र, यावरून माझी औकात काढत असाल, तर या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो,’ असा इशारा राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला.

गावकऱ्यांनी वाचविले चिंकारांचे जीव

$
0
0
पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या चिंकारांमुळे शेतीचे नुकसान होत असतानाही कडबनवडीच्या शेतकऱ्यांनी त्यांचा कधीच तिरस्कार केला नाही, उलट त्यांच्यासाठी वनक्षेत्रात ठिकठिकाणी इकोफ्रेंडली पाणवठे बांधून पाण्याची सोय केली. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात रस्त्यावर एकाही चिंकाराचा मृत्यू झाला नाही.

‘स्वमग्न’ मुलांसाठी चौदा वर्षांची साधना

$
0
0
शारीरिक अक्षमतेचा एक भाग समजला जाणाऱ्या ‘स्वमग्न’ (ऑटिझम) मुलांसाठी संस्था स्थापन करून त्यांच्यासाठी झटणाऱ्या प्रसन्न ऑटिझम सेंटरमुळे या मुलांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘आढळ’स्थानाला धक्क्याची तयारी

$
0
0
पक्षांतर्गत नाराजांची मनधरणी, मनभेद झालेल्या आमदारांचे मनोमिलन, विरोधकांमध्ये फोडाफोडीचे राजकारण आणि वादग्रस्त नसलेला सुशिक्षित उमेदवार अशा जय्यत तयारीने शिरूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

पहिलं नाटकच!

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘कल्चर क्लब’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या, सांस्कृतिक क्षिजितं विस्तारणाऱ्या या उपक्रमाला चोखंदळ पुणेकरांनी स्वीकारलं नसतं तरच नवल. वाचकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता ‘क्लब’तर्फे पहिल्या उपक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे.

सुरेल गायकीला दाद

$
0
0
पूरियाकल्याण रागातली पारंपरिक बंदिश, कलावती आणि बसंत रागाला मिळालेली उत्स्फूर्त दाद अशा उत्साही वातावरणात प्रसिद्ध गायिका अपर्णा गुरव यांची गानमैफील रंगली. गुरव यांच्या सुरेल गायकीनं या मैफीलीला उंचीवर नेलं.

विषय समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी

$
0
0
पालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीने सहज बाजी मारली असून, शहर सुधारणा आणि महिला व बालकल्याण या समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर विधी आणि क्रीडा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images