Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उपनगरांच्या पदरी केवळ आश्वासनेच

$
0
0
गेल्या दशकात पुण्याचा मोठा विस्तार झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार या उपनगरांमध्ये जाऊन तेथील मतदारांची भेट घेत आहेत. शहरात‌ी‌ल उपनगरांमधील पायाभूत सुविधांची नक्की स्थिती काय आहे? तेथील नागरिकांच्या महापालिका प्रशासन तसेच लोकसभेच्या उमेदवाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत? उपनगरांचा वेध घेणाऱ्या प्रभागफेरी या सदराचा हा खास ‘इलेक्शन स्पेशल’ आढावा

शहराभोवतीचे हायवे बनले मृत्यूचे सापळे

$
0
0
नॅशनल हायवे तयार करताना योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागते. चांदणी चौक, वारजे भागातून कात्रजपर्यंत जाणाऱ्या हायवेवर मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून त्यामध्ये अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहे.

लोणावळ्याची लोकलसेवा ‘जैसे थे’च

$
0
0
शिवाजीनगर स्टेशनवरून चालवण्यात येणाऱ्या लोणावळा लोकलसेवेत वाढ करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय तूर्तास बारगळला आहे. दरम्यान, लोकलसेवेमध्ये वाढ करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासानाकडे विचारणा केली असता, तूर्तात सेवेत वाढ करणे शक्य नसल्याचे उत्तर देण्यात आले.

बाजी पासलकर स्मारक सप्टेंबरमध्ये खुले होणार

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात बलिदान देणाऱ्या बाजी पासलकर यांच्या नावाने महापालिका उभारत असलेले स्मारक नागरिकांसाठी खुले होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडणार आहे.

पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

$
0
0
वारजे पोलिसांनी कात्रज-देहूरोड बायपासवर एका गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

अपंगांच्या मोफत पासला ब्रेक

$
0
0
अपंगांसाठी मोफत पीएमपी पासच्या नूतनीकरणाला पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिरवा कंदिल दाखविला असला, तरी पुणे महापालिका मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करीत आहे. अपंगांच्या मोफत पास नूतनीकरणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी करीत अनेक अपंगांनी मंगळवारी स्वारगेट येथील ‘पीएमपी’च्या कार्यालयात गर्दी केली होती.

निवडणूक पद्धतीत हवा अमूलाग्र बदल

$
0
0
‘राजकीय पक्षांची संख्या नियंत्रित करणे, निवडून येण्यासाठी किमान मतदानाची विशिष्ट टक्केवारी ठरविणे आणि राजकीय पक्षांना कठोर कायद्याच्या चौकटीत आणण्यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून निवडणुकांदरम्यान होणारा भ्रष्टाचार रोखणे शक्य आहे. त्यासाठी निवडणूक पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल होण्याची गरज आहे,’ असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले.

‘थर्ड एसी’च्या डब्यातील पडदे काढणार

$
0
0
बेंगळुरु-नांदेड रेल्वेमध्ये आगीची घटना घडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे बोर्डाने थर्ड एसीच्या डब्यातील पडदे काढण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून या कामाला सुरुवात झाली असून आठवडाभरात ते काम पूर्ण करण्यात येणार आहे.

तरुणाला ‘फायर ब्रिगेड’ने वाचविले

$
0
0
भवानी पेठेतील ४० फूट खोल विहिरीत आत्महत्या करण्यासाठी एका तरुणाने उडी मारल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. फायर ​ब्रिगेडच्या जवानांनी वेळीच धावपळ करत विहिरीत उतरून मोठ्या कष्टाने या तरुणाला बाहेर काढून जीवदान दिले.

प्लास्टिक, थर्मोकोल बंदीबाबत खुलासा करा

$
0
0
शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने प्लास्टिक ग्लास आणि थर्मोकोलच्या ग्लास व थाळ्यांवर बंदी घातली असली, तरी त्याबाबत सविस्तर खुलासा पालिकेने सादर करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने केल्या आहेत.

स्वमग्न मुलांच्या पालकांनाही हवे समुपदेशन

$
0
0
वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर मुलाला ‘स्वमग्नता’ (ऑटिझम) हा आजार होत असल्याचे निदान झाल्याने आजारावर फारसे वैद्यकीय उपचार नसल्याने पालकच मुलाला हा आजार झाल्याचे लपवित आहेत. जागतिक ऑटिझम दिनाच्या पूर्वसंध्येला ऑटिझम मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसह बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी ‘मटा’कडे त्यांचे अनुभव शेअर केले.

अपंगाना मिळाला दाखल्याचा दिलासा

$
0
0
‘माझ्यावर माझ्यावर उपचार केलेल्या डॉक्टरने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. कोर्टातल्या साक्ष द्यायला डॉक्टर दहा हजार रुपये मागतात,’ अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविताना वर उल्लेखलेल्या अडचणींशी सामाना केलेले अपंग शिवाजीनगर कोर्टात अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आले होते.

कॉलेज आणि पर्यायांची सरमिसळ!

$
0
0
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या शाखांची निवड करण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र, शाखा वेगळ्या असल्या, तरी त्यासाठीच्या कॉलेजांचे पर्याय मात्र एकाच यादीमध्ये भरावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर वेगळीच समस्या उभी राहणार आहे.

कोथरूडमधून वाढले सर्वाधिक मतदार

$
0
0
निवडणूक प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेत नव्या मतदारांच्या संख्येत भरीव वाढ झाली असून त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नवी समीकरणे आकार घेणार आहेत. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात गेल्या एक जानेवारीपासून ६१ हजार मतदार वाढले असून कोथरूड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक, म्हणजे पंधरा हजार मतदार वाढले आहेत.

पर्वतीमध्येही होणार राज यांची सभा

$
0
0
नवनिर्माण घडविण्यासाठी लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पुण्यातून प्रचाराचा नारळ फोडला असला तरी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच नियोजित दोन सभानंतरही पर्वती मतदारसंघात आणखी एक सभा घेण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘आप’ला पाठिंबा

$
0
0
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा श्रीराम, लेखक अच्युत गोडबोले यांच्यासह विविध क्षेत्रातील अकरा मान्यवरांनी आम आदमी पक्षाचे पुण्यातील उमेदवार प्रा. सुभाष वारे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

शाब्दिक कोट्यांना मते मिळत नाहीत

$
0
0
‘भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे ‘नवरदेव’ शाब्दिक कोट्या आणि शब्दभ्रम करून वक्तृत्व स्पर्धेप्रमाणे भाषणबाजी करत असून, अशा भाषणांना केवळ टाळ्या मिळतात; मते मिळत नाहीत. त्यामुळे, १६ मे त्यांचा फुगा फुटेल’, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मनसेचे मोदीप्रेम म्हणजे पूतना मावशीचा पान्हा

$
0
0
निवडणुकीच्या तोंडावर मनसेला नरेंद्र मोदी यांच्याबाबत आलेले प्रेम हा पूतना मावशीचा पान्हा आहे, हे पुणेकरांना पक्के ठाऊक आहे. नरेंद्र मोदी यांचा बुरखा पांघरून प्रत्यक्षात काँग्रेस आघाडीला मदत करण्याचा हा त्यांचा डाव आहे, अशी टीका महायुतीच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.

मुलायमसिंह यांची पुण्यात सभा?

$
0
0
लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम असल्याचे समजून समाजवादी पक्षाने पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन केले आहे. वातावरण निर्मितीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची पुण्यात सभा घेण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

तरुणाई आतुर पहिल्या मतदानासाठी

$
0
0
आपल्याला मतदान करायची संधी मिळणार या कल्पनेनेच तरुण मतदार आनंदित झाले असून, हा हक्क बजावण्याचा संकल्पच जणू त्यांनी केल्याचे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवले. आपले अमूल्य मत देऊन लोकशाहीच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याची भावना बहुतेक तरुण व्यक्त करीत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images