Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बारामतीत ‘मनसे’चा उमेदवार नाही

$
0
0
बारामती लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने) कोणत्याही उमेदवाराला जाहीरपणे पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल कंपन्यांना दणका

$
0
0
मोबाइल टॉवरच्या थकबाकी वसुलीसाठी नोटिसा काढणाऱ्या पालिकेच्या विरोधात कोर्टात धाव घेणाऱ्या कंपन्यांना हायकोर्टाने शुक्रवारी दणका दिला. रिलायन्स आणि आयडिया या कंपन्यांना ३१ मार्चच्या आत थकित रक्कम भरण्याचे आदेश कोर्टाने दिले.

बँकेतून मोठ्या रकमा काढताय?

$
0
0
लोकसभा निवडणूक काळात व्यवसाय वा अन्य कोणत्याही कारणास्तव बँकेतून मोठ्या रकमा काढणार असाल तर सावधान! अशा रकमा कशासाठी काढल्या जात आहेत, याची माहिती आता निवडणूक यंत्रणेकडून घेतली जाणार आहे. त्यात काही गैरप्रकार आढळल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पवारांच्या विरोधात तक्रार

$
0
0
बारामती लोकसभा मतदार संघात माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने, त्यांना प्रभावित करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मतदारांना शाई पुसून दोनदा मतदान करून घड्याळावर शिक्का मारण्याचे आवाहन केले.

शाई वाळेपर्यंत मतदार ‘स्थानबद्ध’!

$
0
0
मतदानावेळी बोटावर लावण्यात येणारी शाई पूर्णपणे वाळेपर्यंत मतदारांना मतदान केंद्रामध्येच थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ‘शाई पुसून दोनदा मतदान करा,’ या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वादग्रस्त विधानाची पार्श्वभूमी या निर्णयाला असल्याचे बोलले जात आहे.

ब्राह्मण समाजाचा कोणालाही पाठिंबा नाही

$
0
0
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांबद्दल ब्राह्मण समाजाची नाराजी कायम असून, पुण्यातील एकाही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला ब्राह्मण संघटनेने पाठिंबा दिलेला नाही, असा खुलासा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने शनिवारी केला आहे.

कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरीवर काँग्रेसची भिस्त

$
0
0
विरोधी पक्षांच्या बालेकिल्ल्यात त्यांना मिळणारी ‘आघाडी’ मर्यादित ठेवायची आणि स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघांमध्ये आक्रमक प्रचार करून सर्वाधिक ‘लीड’ मिळवायचे... या रणनीतीच्या नियोजनानुसार काँग्रेसने प्रचाराची आखणी केली असून, आगामी काळातही त्या दृष्टीने पदयात्रा, मेळावे, बैठका आणि सभा घेण्यात येणार आहेत.

बायोटेकच्या विद्यार्थ्यांना जुनेच पेपर

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या टी. वाय. बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीच्या परीक्षेदरम्यान जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचा प्रकार शनिवारी घडला. काही ठिकाणी जुन्या, तर काही ठिकाणी नव्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकांच्या मदतीने विद्यापीठाने पेपर घेतल्याने गोंधळाचे वातावरण पसरले.

राज ठाकरेंच्या पुण्यात ३ सभा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दीपक पायगुडे व शिरूरचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे तीन जाहीर सभा घेणार आहेत.

पुणे आणि मावळात २ मतदानयंत्रे

$
0
0
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत समाप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुण्यात २९ जण रिंगणात असून, बारामतीत नऊ उमेदवार आहेत. शिरूरमध्ये १४ उमेदवार असून, मावळमध्ये १९ जणांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

उरल्या फक्त आठवणी…

$
0
0
हवाई दलाच्या मालवाहू विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विंग कमांडर प्रशांत जोशी यांना लवकरच पदोन्नती मिळणार होती. सुटीनिमित्त पुण्यात आलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुले पाडव्याच्या दिवशीच शाळेसाठी पुन्हा पुण्यातून हिंडनला रवानाही होणार होत्या.

‘एक्स्प्रेस-वे’वर २ डॉक्टर ठार

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर झालेल्या अपघातात मुंबईतील दोन डॉक्टर ठार झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत. येथील कामशेत बोगद्याजवळ रात्री सव्वाआठ वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

‘एक्स्प्रेस वे’वरचा टोल महागला

$
0
0
राज्यभर टोलनाके बंद करण्यासाठी मनसेन केलेल्या आंदोलनाचा धुरळा खाली बसत नाही तोच मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वरील टोलच्या रकमेत वाढ होणार आहे. टोलची नवीन दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. हे दर २०१७पर्यंत राहणार आहेत.

विषय समिती निवडणुकीसाठी १६ नगरसेवकांचे अर्ज दाखल

$
0
0
महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यपदासाठी १६ नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीच‌ी निवडणूक येत्या मंगळवारी (१ एप्रिल) होणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पक्षीय बलाबल असल्याने या समित्यांवर आघाडीच्या उमेदवारांची वर्णी निश्चित मानली जात आहे.

सरकारी वेबसाइटवरही उभारली मराठीची गुढी

$
0
0
नागरी सेवांशी संबंधित असलेल्या सरकारी वेबसाइट हाताळताना सामान्य नागरिकांना इंग्रजी भाषेचा अडथळा होऊ नये यासाठी प्रगत संगणन केंद्राने (सी-डॅक) विशेष प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर करून सहा प्रादेशिक भाषांमध्ये या सरकारी वेबसाइट पाहता येणार आहेत.

‘टेक शो’मध्ये सॉफ्टवेअरचा आविष्कार

$
0
0
शेअर मार्केटच्या इतिहासाचा अभ्यास करून कोणता शेअर घ्यावा, कोणता नको, हे सुचवणारे सॉफ्टवेअर...., हिंदीत केलेले भाषण टाइप करणारे सॉफ्टवेअर... मूक-बधिरांसाठी लिखित मजकुराचे साइन लॅँग्वेजमध्ये भाषांतर करणारे सॉफ्टवेअर..., भूकंपाच्या धक्क्याचा एखाद्या बिल्डिंगवर कसा परिणाम होईल, हे सांगणारे सॉफ्टवेअर... इंग्रजीतून वेबसाइट प्रादेशिक भाषांमध्ये रूपांतरित करणारे टूल....

पुण्यातील नवमतदाराला ‘मनसे’ साद!

$
0
0
उमेदवाराची पदयात्रा कव्हर केलेला एक कार्यकर्ता तातडीने प्रचाराचे फोटो घेऊन पक्षाच्या आयटी ‘वॉर रूम’मध्ये येतो... पटापट त्यापैकी फोटो निवडले जातात...अन् ते फोटो उमेदवाराच्या फेसबुक पेज, मोबाइल अॅप, वेबसाइटवर अपलोड केले जातात...पाहता पाहता त्या फोटोंना ‘लाइक्स’ पडतात आणि चाहत्यांकडून प्रतिक्रियाही दिली जाते!

अरविंद केजरीवालांची पुण्याकडे पाठच?

$
0
0
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि स्टार प्रचारक अरविंद केजरीवाल यांच्या पुणे दौऱ्याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. केजरीवाल देशभरातील दौऱ्यानंतर लवकरच स्वतःच्या वाराणसी मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार असल्यामुळे केजरीवालांची मुलुखमैदान तोफ पुण्याच्या आखाड्यात धडाडणार नसल्याचीच शक्यता आहे.

आचारसंहितेचा भंग; जिल्ह्यात १३ गुन्हे दाखल

$
0
0
पुणे शहर आणि जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघात आचारसंहिता भंग केल्याच्या ५७ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘फळांच्या राजा’च्या सीझनचाही आरंभ

$
0
0
पुण्याच्या बाजारपेठेत आंब्याची आवक वाढू लागली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने रविवारी बाजारपेठेत तीन हजार पेटी आंब्याची आवक झाली. रत्नागिरी हापूस आंब्याच्या चार ते सात डझनाच्या पेटीचा भाव अडीच ते पाच हजार रुपयांपर्यंत होता; तर पायरीच्या चार ते पाच डझनाचा भाव दीड ते अडीच हजारापर्यंत होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images