Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बहुजन, कष्टकऱ्यांसाठी दलित पँथर रस्त्यावर उतरणार’

$
0
0
‘काही कार्यकर्त्यांनी दलित पँथरच्या नावावर सौदेबाजी सुरू केल्याने संघटनेला धंदेवार्इक स्वरूप आले होते. अशा कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात आले असून संघटना पुन्हा बहुजनांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहे,’ असे पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले.

वाहनांच्या वेगाला ‘स्पीड गव्हर्नर’चा ब्रेक

$
0
0
परिवहन गटातील सर्व वाहनांच्या वेगाला येत्या एक एप्रिलपासून ‘ब्रेक’ लावण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला. एक एप्रिल २०१४ नंतर उत्पादित केल्या जाणाऱ्या किंवा विक्री करण्यात येणाऱ्या वाहनांना ८० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित केलेला ‘स्पीड गव्हर्नर’ बसविणे बंधनकारक आहे. पूर्वीच्या नियमाप्रमाणे वेग मर्यादा ६५ किमी प्रतितास निश्चित केली होती.

जातप्रमाणपत्र दस्ताऐवज न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

$
0
0
शासकीय सेवेत मागासवर्गीय जागेवर नियुक्त झालेल्या आणि जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी वारंवार आवाहन करूनही सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) केले आहे.

माहितीपट सांगणार ‘मसाप’ची वाटचाल

$
0
0
मराठी वाङ्मयविश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आजवरच्या वाटचालीचा मागोवा माहितीपटातून नव्या पिढीपुढे येणार आहे. साहित्य परिषदेची इमारत, ग्रंथालय, वाङ्मयविश्वातील ज्येष्ठांचे परिषदेशी असणारे नाते या माहितीपटातून उलगणार आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

$
0
0
बँकांमध्ये नियमानुसार अनुत्पादक कर्जासाठी अर्थातच एनपीएची तरतूद केलेली असते, या वर्षी गारपिटीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन एनपीएचा वापर करून शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, अशी मागणी कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी केली.

पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींमध्ये वडील आणि चार मुलांचा समावेश आहे. सत्र न्यायाधीश डी. एम. सरदेशपांडे यांच्या कोर्टाने हा​ निकाल दिला.

रम्य ती ‘बालनगरी…’

$
0
0
बालकांच्या वयाला अनुसरून त्यांना सहजसोपे वाटेल असे अनुभव देणे म्हणजे बालशिक्षण. हे अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून कसे देता येऊ शकतात… याची प्रचिती पालकांना महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेने भरविलेल्या बालनगरीत आली.

सात उमेदवारी अर्ज बाद

$
0
0
पुण्यासह चार लोकसभा मतदारसंघातील सात उमेदवारांचे अर्ज गुरुवारी छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता १०५ उमेदवार उरले आहेत. निवडणुकीतून माघार घेण्याच्या दिवशी या चारही मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रचारात लहान मुले नको!

$
0
0
राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात मुलांचा वापर करणे हा बालकामगार कायद्याचा भंग असून ‘चाइल्डलाइन’च्या शहर सल्लागार समितीने राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान मुलांचा वापर न करण्याबाबतचे आदेश देण्याचे निवेदन निवडणूक आयोगाला दिले आहे. मात्र, त्या संदर्भात निवडणूक आयोगाचा प्रतिसाद अद्याप आलेला नाही.

भाजपचा मोदींवर ‘कॉपीराइट’

$
0
0
मनसेनेकडून केल्या जाणाऱ्या मोदीजपामुळे मतदारांची दिशाभूल होऊ नये, यासाठी ‘ब्रँड नमो’वर भापजने अखेर ‘कॉपीराइट’ सांगितला आहे! मोदी यांच्या नावाचा वापर करण्यासाठी मनसेला प्रतिबंध करावा आणि मोदींचे नाव आणि प्रतिमेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली.

एक वॉक वारसासंपन्न रस्त्यावरचा!

$
0
0
काउट ग्राउंड ते खुन्या मुरलीधर हा सदाशिव पेठेतील रस्ता मोठा वारसासंपन्न आहे. या रविवारचा (दि. ३०) हेरिटेज वॉक याच रस्त्यावर होणार आहे. दुपारी चार वाजता स्काउट ग्राउंडपासून सुरू होणाऱ्या या वॉकला प्रसिद्ध वक्ते आणि लेखक प्रा. सु.ह. जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

दहा गाण्यांनी रंगणार 'भूप'

$
0
0
दिवंगत कवी-गीतकार सुधीर मोघे यांच्या अलौकिक काव्यप्रतिभेचा प्रत्यय पुन्हा एकदा मराठी संगीतप्रेमींना घेता येणार आहे. बऱ्याच काळानंतर मोघे यांनी संगीत नाटकासाठी गीतलेखन केले असून, लवकरच ते नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे.

यासीन भटकळला न्यायालयीन कोठडी

$
0
0
जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेला इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ पोलिस तपासात कोणतेही सहकार्य करत नाही; तसेच ठाणे मध्यवर्ती तुरुंगात ओळख परेड घेण्यासाठी त्याला १४​ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी दहशतवादविरोधी पथकाची मागणी कोर्टाने शुक्रवारी मान्य केली.

ग्रंथालय अनुदानाला आचारसंहितेचे बंधन नाही

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारी योजना, अनुदानांवरही बंधन आले आहे. मात्र, राज्य सरकारकडून सार्वजनिक ग्रंथालयांना दिले जाणारे अनुदान आचारसंहितेच्या बंधनात अडकणार नाही.

पोलिस चौक्या असंवेदनशील

$
0
0
बाललैंगिक शोषण, बलात्कारासारख्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात असमर्थता पोलिस चौक्या असंवेदनशील असल्याचा आरोप ‘ज्ञानदेवी चाइल्डलाइन’ या संस्थेने केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापुढे प्रकरणे गेल्यानंतरच त्यावर कारवाई होत असल्याचे निरीक्षण या संस्थेने नोंदविले.

६५ लाखांचे अमली पदार्थ नष्ट

$
0
0
पुणे, सांगली, सोलापूर आणि पंढरपूर येथील वेगवेगळ्या गुन्ह्यांत जप्त केलेले सुमारे ६५ लाख रुपयांचे अमली पदार्थ शुक्रवारी मरकळ येथे जाळून नष्ट करण्यात आले. एक्साइज विभागाने कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई केली.

रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करा

$
0
0
‘योग शिबिरांमधून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणाऱ्या बाबा रामदेव यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी शुक्रवारी केली.

‘हंजर’चा वीजपुरवठा तोडला

$
0
0
फुरसुंगी येथील हंजर प्रकल्पाने विजेचे ३५ लाख रुपयांचे बील थकविल्याने या प्रकल्पाचा वीजपुरवठा पुन्हा एकदा ‘महावितरण’ने तोडून टाकला. यामुळे कचऱ्यावर होणारी प्रक्रिया बंद पडल्याने ऐन निवडणुकीच्या काळात शहरात कचराकोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

उमेदवारांचे जाहीरनामे अजूनही गुलदस्त्यात!

$
0
0
मतांचा जोगवा मागण्यासाठी पुणेकरांसमोर हात जोडणाऱ्या उमेदवारांचे जाहीरनामे अजूनही गुलदस्त्यातच आहेत. निव्वळ तोंडदेखली आश्वासने, जुजबी भाषणबाजी आणि मोदी-राहुल, केजरीवाल-राज ठाकरे यांसारख्या नेतेमंडळींच्या नावांचा जयघोष, अशाच वातावरणात ‘हाउस टू हाउस’ दौरे काढले जात आहेत.

ब्राह्मण संघटनांचे भाजपविरोधास्त्र म्यान

$
0
0
पुण्यातून ब्राह्मण उमेदवार न दिल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका अखेर मवाळ करण्यात आली. तसेच, नकाराधिकार वापरण्याचा निर्णयदेखील शुक्रवारी मावळला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images