Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​‘चेकवेट’.. ऑन लाइन (नॉट) क्लिअर!

$
0
0
स्कॅनिंगच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्याने अनेक राष्ट्रीय बँकांच्या चेकचे क्लिअरिंग तब्बल आठ ते पंधरा दिवसांपर्यंत खोळंबले आहे. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, चेक न वठल्याने दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. इतकेच नव्हे, तर प्रसंगी फौजदारीचीदेखील टांगती तलवार आहे.

अनुदान मिळावे एप्रिलपासून

$
0
0
व्यावसायिक नाट्यसंस्थेच्या दर्जावर नाटकांना अनुदान देण्याची पद्धत बदलून नाटकांच्या दर्जाचा अनुदानासाठी विचार करण्यात येणार आहे. अनुदानाच्या रकमेतही वाढ करतानाच सहा महसुली विभागांमध्ये प्रयोग करण्याची अट राज्य सरकारने घातली आहे.

केमिस्ट्री केवळ प्रवेशासाठी

$
0
0
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांच्या पात्रतेसाठी केमिस्ट्रीला पर्याय मिळणार असला, तरी मेरिट लिस्टसाठी बारावीच्या गुणांचे वेटेज धरताना फिजिक्स आणि गणिताच्या जोडीने केमिस्ट्रीचेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे ‘पीसीएम’ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.

​सेट विभागाला टाळे ठोकू

$
0
0
सेट परीक्षेच्या कच्च्या उत्तरतालिकेबाबतचे आक्षेप नोंदवूनही पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने त्या विषयी दखलच घेतली नसल्याचा आरोप सेटची परीक्षा दिलेल्या इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला.

​लाचखोर हवालदाराला अटक

$
0
0
चंदनाचा ट्रक पकडल्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिस स्टेशन येथील पोलिस हवालदारासह आणखी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

‘पवार पंतप्रधान होणार नाहीत’

$
0
0
शरद पवार यांच्या रूपाने मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होईल, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाळगलेली आशा आगामी लोकसभा निवडणुकीपुरती तरी भाबडीच ठरणार आहे. कारण, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच तसे स्पष्ट केले आहे.

गीतकार सुधीर मोघे यांचे निधन

$
0
0
रात्रीस खेळ चाले... फिटे अंधाराचे जाळे... सांज ये गोकुळी... एकाच या जन्मी जणू... अशी एकापेक्षा एक अजरामर गीते लिहिणारे प्रख्यात कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुधीर मोघे यांचे योगदान

$
0
0
सुधीर मोघे यांचे साहित्य, संगीत व कला क्षेत्रातील योगदान

ते मनाचा ठाव घेत…

$
0
0
सुधीर मोघे आणि माझा पहिला परिचय १९७६मधला. त्या काळात गदिमा आमच्या घरी नेहेमी येत असत. गदिमा आणि सुधीर फडके म्हणजे बाबूजी एका चित्रपटासाठी एकत्रित काम करीत होते. त्यावेळी ऐन तारुण्यातले सुधीर मोघे गदिमांबोबर असत. माझी संगीताची आवड बघून मोघे यांनी मला एक कविता दिली. त्या कवितेचे शब्द होते, ‘फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश’ त्या गीताला मी चाल लावली. पुढे ते गीत चित्रपटात घ्यावे असे एका दिग्दर्शकांना वाटले. तो मराठी चित्रपट म्हणजे ‘लक्ष्मीची पावले’. ‘फिटे अंधाराचे जाळे...’ ही कविता खूपच लोकप्रिय झाली.

मुसाफिर हरपला

$
0
0
कवी आणि गीतकार म्हणून ओळख असली, तरी सुधीर मोघे यांनी संगीत दिग्दर्शन, संवाद लेखन, ललित लेखन, रंगमंचीय सादरीकरण, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली होती.

‘झुकण्याचा प्रश्नच नाही’

$
0
0
‘शिवसेना हा आमचा पूर्वीपासूनचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यासमोर झुकण्याचा प्रश्न येत नाही. मनसेच्या मुद्द्यावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना नेतृत्वाशी केलेली चर्चा हा त्यांचे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न होता,’ असे भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी शनिवारी नमूद केले.

ऑनलाइन परीक्षेचा फेरआढावा

$
0
0
इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या सिनेटच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

आलो तर सीएम म्हणूनच

$
0
0
‘उद्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे आणि मी मुख्यमंत्री झालो, तरच येणार आहे. त्यामुळे मी परत आलो, तर मुख्यमंत्री म्हणूनच येणार. उपमुख्यमंत्री म्हणून मी परत येणार नाही,’ असा दावा भाजपच्या संसदीय दलाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी केला.

कविता विसावली पानोपानी...

$
0
0
‘रात्रीस खेळ चाले’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सांज ये गोकुळी’, ‘दिस जातील, दिस येतील’, ‘एकाच या जन्मी जणू’ यासारखी अजरामर गीते लिहिणारे प्रख्यात कवी, गीतकार सुधीर मोघे यांचे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारामतीत दरोडखोर टोळी जेरबंद

$
0
0
पुणे-सोलापूर आणि सातारा ग्रामीण पोलिसांची गेल्या दोन दिवसांपासून झोप उडवणाऱ्या बारामतीच्या तावरे दरोडेखोर टोळीला बारामती पोलिसांनी कराड तालुक्यातील शामगाव घाटात जेरबंद केले.

स्वतःच्याच घरात केली चोरी

$
0
0
घरातील दोन लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी तरुणाने स्वतःच आपल्या घरात चोरी केल्याचा बनाव डेक्कन पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खोटी तक्रार दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

माफीच्या साक्षीदाराची उर्वरित साक्ष नाही

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची उलटतपासणी घेण्यासाठी बचाव पक्षातर्फे वेळ देऊनही वकील उपस्थित न राहिल्याची कोर्टाने दखल घेऊन चौधरीची उर्वरित साक्ष होणार नसल्याचा आदेश दिला आहे.

विनयभंग : तीन महिन्यांची शिक्षा

$
0
0
एका विवाहितेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी एकाला तीन महिने साधी कैद आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

महिला कर्मचाऱ्यांना घराजवळ ड्युटी

$
0
0
निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना यंदा घरापासून दूरवर ड्युटीला जाण्याचा त्रास वाचणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी करण्यात येणाऱ्या ‘रँडमायझेशन’मधून महिला कर्मचाऱ्यांना वगळण्यात येणार आहे.

‘DMLT’ पॅथॉलॉजी तज्ज्ञांचे रिपोर्ट नाकारा

$
0
0
‘क्रॉसपॅथी’च्या प्रॅक्टिसवरून होमिओपॅथशी तू तू - मैं मैं सुरू असतानाच आता रक्त, लघवी, थुंकी तपासून रिपोर्ट देणाऱ्या डीएमएलटी, एमएलटी, सीएमएलटीसारख्या पदविकाधारकांना कोणत्याही तपासणीचे रिपोर्ट देण्याचे अधिकार नसल्याने त्यांचे रिपोर्ट डॉक्टरांनी नाकारावेत, असे फर्मान इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेने काढले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images