Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेसबुकमधून साकारले ग्रंथालय

0
0
अण्णा हजारेंचे आंदोलन असो किंवा मतदान जागृती.. फेसबुकच्या माध्यमातून सामाजिक चळवळी आकार घेत असताना ‘शिवाजी ट्रेल’ ही संस्था फेसबुकचा वापर करून ग्रंथालये साकारते आहे.

मार्केट यार्ड निवडणुकीत भुजबळ-भोसले लढत

0
0
मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची निवडणूक मंगळवारी होणार आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलतर्फे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि जय शारदा गजानन पॅनेलतर्फे नगरसेवक शिवलाल भोसले यांच्यामध्ये लढत होणार आहे.

हापूस, पायरी-लालबागने बाजारपेठ दरवळली

0
0
फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची आवक बाजारपेठेत वाढू लागली आहे. रविवारी मार्केट यार्डमधील बाजारपेठेत रत्नागिरी हापूस, कर्नाटक पायरी-लालबाग आणि केरळचा पायरी-हापूस अशा एकूण एक हजार पेटी आंब्याची आवक झाली.

काँग्रेस-भाजपकडे पात्र उमेदवार नाहीत

0
0
पुण्यामध्ये प्रतिस्पर्धी देण्यासाठी लागणारा उशीर उमेदवारांच्या प्रतिमेमुळे होत आहे. आम आदमी पार्टी (आप) च्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमुळे काँग्रेस-भाजप या प्रमुख पक्षांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून उमेदवार निवडतानाही चांगला पात्र उमेदवार त्यांना मिळत नाही, असा दावा आपचे उमेदवार सुभाष वारे यांनी केला.

मुळशी पंसत रंगले सभासदांचे नाराजीनाट्य

0
0
मुळशी पंचायत समितीच्या मासिक सभेत गटविकास अधिकारी आणि विविध खात्यातील अधिकारी अनुपस्थित राहिल्याने लोकप्रतिनीधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सात विभागाचे प्रमुखच सभेला नसल्याने त्या विषयांचा आढावा न घेता सदस्यांना सभा अर्धवट सोडावी लागली. विशेष म्हणजे तीन सदस्यांना मासिक सभेचा अजेंडाच मिळाला नाही.

संतप्त प्रवाशांनी दौंडला रेल्वे रोखली

0
0
दौंड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल न मिळाल्यामुळे थांबलेल्या भावनगर काकिनाडा एक्स्प्रेसमध्ये तीन ते चार चोरट्यांनी चोरी केली. या प्रकारामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच तब्बल चार तास रेल्वे रोखून धरली.

बारामतीतील दरोडखोरांच्या मुसक्या आवळल्या

0
0
पुणे- सोलापूर आणि सातारा ग्रामीण पोलिसांची गेल्या दोन दिवसांपासून झोप उडवणाऱ्या बारामतीच्या तावरे दरोडेखोर टोळीला बारामती पोलिसांनी कराड तालुक्यातील शामगाव घाटात जेरबंद केले.

७३ हजारांच्या दागिन्यांची चोरी

0
0
दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने अडीच तोळ्याचे गंठण, तीन ग्रॅमची कर्णफुले असे एकूण ७३ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. शहराच्या जवळ असलेल्या भोलावडे येथील गणेशनगरमधील अनुसया गणेश थोपटे यांच्या घरी हा प्रकार घडला.

ATM चा पासवर्ड विचारून शेतकऱ्याचे ११ हजार लांबवले

0
0
बँकेतून बोलत असल्याचे सांगत शेतकऱ्याच्या खात्यातले ११ हजार रुपये लांबविणाऱ्याच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारात किसन आबाजी भोर (वय ५७, रा.नारायणगाव) या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

ऊसउत्पादन २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

0
0
जुलै-ऑगस्टच्या आडसाली हंगामात लागवड झालेल्या उसाचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गारपीटग्रस्त भागातील उसाचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

बोर्डाच्या हद्दीत अतिक्रमणे

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या धोबीघाट येथील कामगार वसाहतीमध्ये बेकायदा बांधकामे करून दुकाने सुरू करण्यात आली आहेत. या अतिक्रमणांवर बोर्डाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

पिंपरीतील अतिक्रमण कारवाईसाठी प्रशिक्षण

0
0
स्टिकर्स, बॅनर्स आणि अनधिकृत फलक यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येऊ नये म्हणून अतिक्रमणविरोधी विभागाला सातत्याने कारवाई करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक क्षेत्रासाठीही जादा FSI

0
0
टाउनशिप व मंजूर प्रादेशिक योजनांतील बांधकामांना जादा चटईक्षेत्र (एफएसआय) देण्यापाठोपाठ आता औद्योगिक क्षेत्रासाठीही प्रीमियम आकारणी करून दीड एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील उद्योगांसाठी यापूर्वी एक एफएसआय दिला जात होता.

जगतापांचे बंड अन् राष्ट्रवादी थंडच

0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापच्या पाठिंब्यावर निवडणूक लढण्याची घोषणा करून आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस थंड झाली आहे. आता तर शिवसेनेचे माजी नेते राहुल नार्वेकर यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले आहे.

वीजपुरवठ्यासाठी इमारतीमध्ये जागा हवीच

0
0
वेगाने वाढणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या इमारतींमध्ये वीजपुरवठा यंत्रणेला जागा उपलब्ध होत नसल्याने नव्या ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात महावितरणला अडचणी येत आहेत.

फुरसुंगी उड्डाणपुलावर दुचाकीस्वार ठार

0
0
फुरसुंगी कचरा डेपो उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट संग्रहालयाच्या ‘फेज २’साठी २.२५ कोटी

0
0
दूरदर्शनच्या आवारात बांधण्यात आलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे सभागृह पांढरा हत्ती न होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या दोन कोटी वीस लाख रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

२६ हजार नागरिकांची वीज तोडली

0
0
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि मुळशी, मंचर व राजगुरूनगर तालुक्यातील २६ हजार जणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

‘माननीयां’च्या मनमानीला चाप

0
0
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहून त्यानंतर आपल्या सोयीनुसार हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करणाऱ्या पालिकेतील नगरसेवकांच्या मनमानी कारभारला लवकरच आळा बसणार आहे.

‘प्रिस्क्रिप्शन’ सहजसोपे; प्रत्यक्षात लिहिणे अवघड

0
0
औषधांचा सर्रासपणे होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नव्याने तयार केलेल्या ‘प्रिस्क्रिप्शन’चा नमुना हा वैद्यकीय कायद्यानुसार योग्य आहे. हे ‘प्रिस्क्रिप्शन’ पाहता सहजसोपे असले तरी प्रत्यक्षात लिहिण्यास अवघड आणि वेळखाऊ असल्याची टीका वैद्यकविश्वातून होऊ लागली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images