Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टी-स्कूलची नावनोंदणी प्रचंड प्रतिसादात सुरू

$
0
0
अभिनयाच्या क्षेत्रात ज्यांना कारकीर्द घडवायची आहे, अशांना योग्य आणि सखोल मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेल्या टी-स्कूलच्या आगामी बॅचच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

जग वळतंय मराठीकडे!

$
0
0
मराठी वाचकांची मोठी संख्या आणि त्यांची आवड लक्षात घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रकाशन संस्था मराठी भाषेकडे वळल्या आहेत. प्रकाशन संस्थांच्या दृष्टीनं व्यवहाराचं प्रमुख केंद्र असलेला महाराष्ट्र, इंग्रजीसह इतर परदेशी भाषांनाही वाटणारं मराठीचं आकर्षण याविषयी...

अभिताभ बच्चन यांना पुरस्कार

$
0
0
‘आर्ट अँड म्युझिक फाउंडेशन’तर्फे देण्यात येणारा पुणे पंडित पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. सोमवारी (३ मार्च) दुपारी तीन वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

‘PMPL’ची बस खरेदी रद्द करा

$
0
0
पीएमपीएमएलच्या बसखरेदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडर मध्ये केवळ मर्यादित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने टेंडर प्रक्रियेत कुठलीही स्पर्धा झालेली नाही. याबाबतचा आक्षेप महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षांना कळविला होता.

मुंबई वगळता अन्य शहरे ‘अंधारात’

$
0
0
महावितरणच्या वीजदर सुधारणांच्या प्रस्तावांवर सुनावण्या घेताना मुंबई वगळता राज्याच्या इतर भागांना अंधारात ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. राज्य वीज आयोगाच्या या धोरणाविरूद्ध राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे स्वयंसेवी संस्थांकडून तक्रार करण्यात आली आहे.

चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर चौघांची सुटका

$
0
0
किरकोळ कारणावरून भांडण व मारहाण केल्याच्या प्रकरणात सातजणांची कोर्टाने चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सुटका केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

गर्भपात कायद्याला काही हॉस्पिटलकडून कात्री

$
0
0
शहरातील काही हॉस्पिटल गर्भपात कायदा पायदळी तुडवून सर्रास बेकायदा गर्भपा‌त करत असले, तरी महापालिका मात्र या हॉस्पिटलना केवळ नोटीस बजावित आहे. कारवाई करण्यास आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांची भूमिका संशयास्पद आहे.

मतदार ओळखपत्राचे फोटो स्वीकारण्याची विशेष सुविधा

$
0
0
शहर आणि परिसरातील अकराशे स्वस्त धान्य दुकानांमध्ये मतदार ओळखपत्रासाठी फोटो स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील साडेसात लाख मतदार अद्यापही ओळखपत्राविना असल्याचे आढळून आल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या वतीने संबंधित दुकानदारांना आदेश देण्यात आले आहेत.

शत्रुराष्ट्र नागरिकांची देशात १ लाख कोटींची प्रॉपर्टी

$
0
0
भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या नागरिकांच्या देशभरात एक लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बेनामी प्रॉपर्टी असल्याचा अंदाज आहे. पाकिस्तानस्थित नागरिक, व्यापारी व राजे-महाराजांच्या या प्रॉपर्टी असून, त्या ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत.

न्याय मिळत नसल्याने ‘तो’ चढला टॉवरवर

$
0
0
न्याय मिळत नाही या भावनेतून एका ढाब्यावर काम करणारा कर्मचारी दौंड शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर चढून बसला. तासाभराच्या विनंतीनंतरही तो खाली उतरत नव्हता व बघ्यांची गर्दी वाढतच होती.

‘KDL’ बरखास्तीसाठी शेतकरी आक्रमक

$
0
0
खेड डेव्हलपर्स लि कंपनी ( केडीएल) बरखास्त करावी यासाठी सेझ, विमानतळ, व केडीएल विरोधी शेतकरी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी खेड तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणाला बसले आहेत.

दौंड नगरपरिषदेत गदारोळ सुरूच

$
0
0
दौंड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा गोंधळ झाला. त्यामुळे कालचा गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ आली. सत्ताधारी गटातील जेष्ठ नगरसेवक गुरुमुख नारंग यांनी मुस्कटदाबी होत असल्याचे कारण देत अर्ध्यातून सभात्याग केला.

आघाडी सरकारकडून फक्त भुलभुलय्या

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील भुलभुलय्या करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

राजहंस, डहाके यांना राज्य सरकारचे पुरस्कार

$
0
0
राज्य सरकारच्या वतीने दर वर्षी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेला देण्यात येणारा श्री. पु. भागवत पुरस्कार यंदा ‘राजहंस प्रकाशना’स जाहीर झाला आहे, तर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कवी वसंत आबाजी डहाके यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

परदेशातही रुजली साहित्यिक चळवळ

$
0
0
एकेकाळी महाराष्ट्रात असलेली नियतकालिकांची समृद्ध चळवळ आता परदेशातही चांगलीच रुळली आहे. मातृभूमीपासून दूर राहून मराठी भाषा आणि संस्कृतीविषयीचे प्रेम जपण्यासाठी इस्रायल, सिंगापूर, अमेरिका अशा देशांमधून नियमितपणे प्रकाशित करण्यात येतात.

बोलणारा नोटीसबोर्ड देतोय माहितीची ‘दृष्टी’

$
0
0
विज्ञान-संशोधनाला पुस्तके-प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित न ठेवता फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक उपयुक्ततेची ‘दृष्टी’ दिली आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज-शाळेतील नोटिसा ऐकण्यासाठीच्या या नोटीस बोर्डाला सार्वजनिक सुविधांचाही भाग होण्याची क्षमता आहे.

‘COEP’ची वाटचाल अभिमत विद्यापीठाच्या दिशेने

$
0
0
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे अर्थात ‘सीओईपी’ने अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुणे विद्यापीठाकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कॉलेजने अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव याआधीच दिला आहे.

डॉक्टरचा निष्काळजीपणा : सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू

$
0
0
मुतखड्याचे ऑपरेशन करताना ‘प्राइम’ हॉस्पिटलच्या डॉक्टरकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे ३२ वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

कचरा न उचलण्याचा कामगार युनियनचा इशारा

$
0
0
शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येने पालिकेला ग्रासले असतानाच; ओला-सुका आणि इतर सर्व प्रकारचा एकत्र केलेला कचरा पालिकेचे कामगार उचलणार नाहीत, असा इशारा कामगार युनियनतर्फे देण्यात आला आहे.

‘डीपी’ नियोजन समितीतील सदस्यांच्या नावाला आक्षेप

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामधील (डीपी) हरकती आणि सुचनांवरील सुनावणीसाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीमधील काही सदस्यांच्या नावाला पुणे बचाव समितीने आक्षेप घेतला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images