Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात

$
0
0
शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशान्वये पालिकेच्या शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार शिक्षण मंडळाबाबत कोणतीही कार्यवाही यापुढे करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील गुन्हेगारी वाढली

$
0
0
खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोट उलटून कात्रजच्या बालकाचा मृत्यू

$
0
0
मोराची चिंचोली येथील खासगी कृषी पर्यटन केंद्रात सहलीला गेलेल्या कात्रजमधील लिटल एंजल्स बालवाडी शाळेतील मुलांची बोट शेततळ्यात उलटून एका मुलाचा मृत्यू झाला. या बोटीतील अन्य मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले.

‘बीडीपी’बाबत पवारांची भूमिका संभ्रम‌ित

$
0
0
शहरातील समाविष्ट गावांमध्ये जैववैविध्य उद्यानांसाठी (बीडीपी) आरक्षित जागांबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे, असा आरोप स्वयंसेवी संस्थांतर्फे बुधवारी करण्यात आला.

‘कॅस’चे त्रैमासिक आता मराठीत

$
0
0
मराठी ज्ञानभाषा आहे का, याची चर्चा अभ्यासकांमध्ये बऱ्याच काळापासून रंगली आहे. मात्र, मराठीची ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीने वाटचाल जोमाने सुरू आहे. संरक्षण आणि सामरिक विषयांच्या धोरणांबाबत कार्यरत असलेल्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीजने (कॅस) या संस्थेचे त्रैमासिक मराठीमध्येही प्रकाशित होऊ लागले आहेत.

अवैध देहविक्रय : ३ महिलांवर गुन्हा

$
0
0
पनवेलमध्ये चांगल्या पगाराचे कामाचे आमिष दाखून एका अल्पवयीन मुलीला मारहाण करून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन महिलांविरोधात अवैध देहविक्री प्रकरणी येरवडा पोलिसांनी (पेटा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .

दहावीच्या हॉलतिकिटांतही चुका

$
0
0
बारावीच्या हॉलतिकिटांमधील चुकांचा गोंधळ ताजा असतानाच आता शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटांमध्येही चुका आढळून आल्या आहेत. शाळांनी प्रि-लिस्टमधील चुका दुरुस्त करून दिल्यानंतरही या चुका आढळून आल्याने, शहरातील शाळांनी थेट बोर्डाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

युनिकोड फाँटची ‘यशोमुद्रा’ उमटेना

$
0
0
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने राज्य सरकारने हाती घेतलेल्या युनिकोड फाँटच्या निर्मिती प्रकल्पाची ‘यशोमुद्रा’ काही उमटत नसल्याचे चित्र आहे. पाच फाँटच्या निर्मितीचा हा प्रकल्प गेले वर्षभर रखडला असून, यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असलेले ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ हे पहिले दोन फाँटही अद्याप पूर्ण झालेले नाही.

डॉ. भटकर यांना लोकसभेची ऑफर?

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत खात्रीशीर ‘विजय’ मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निर्विवाद उमेदवाराचा शोध सुरूच आहे. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि ‘परम’ सुपरकम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीत उतरण्याची ऑफर देण्यात आल्याचे समजते.

उपनगरे विकसित करण्याचा प्रयत्न

$
0
0
‘आता काळ आणि गरजा झपाट्याने बदलत आहेत म्हणूनच पुण्यातून निघणारी रेल्वे आता सासवड- मोरगावमार्गे बारामती केल्यास त्या शहराचा सर्वांगीण विकास होवून चौपदरी रस्ते, पाणी आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा हेतू आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

दुरुस्तीचे काम ‘पाइप’मध्येच !

$
0
0
मागील सहा महिन्यांपासून येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील स्वयंपाकाच्या गॅसचा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला अजूनही यश आलेले दिसत नाही. सध्या पेशंटसाठी बनविण्यात येणारा स्वयंपाक दररोज पाच सिलिंडर आणून केला जातो. गॅस पाइपलाइनसाठी निधी मिळूनही वेळेत वर्कआर्डर न दिल्याने स्वयंपाकासाठी याचा अजूनही वापर सुरू करता आलेला नाही.

करवाढ नसलेला बारामतीचा अर्थसंकल्प

$
0
0
कोणतीही करवाढ न करता बारामती नगरपालिकेने सुमारे २९ लाख ८१ हजार रुपये शिलकीचा, तसेच ३०८ कोटी ९० लाख रुपयांचा अर्थसंकल्प मुख्याधिकारी रवी पवार यांनी सादर केला.

हॉस्पिटलच्या जागेवर क्षेत्रीय कार्यालय

$
0
0
वानवडी येथे हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेल्या जागेवर महापलिकेने क्षेत्रीय कार्यालय सुरू केले आहे. क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यासाठीचा कोणताही लेखी प्रस्ताव तसेच आयुक्तांनी संमती नसताना सर्व नियम धाब्यावर बसवून हे कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जुन्नर नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांवर गुन्हा

$
0
0
जुन्नर नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेवाटपाचे बोगस लिलाव दाखवून बनावट सरकारी दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी जुन्नरच्या नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

‘बीओटी’ साठी कन्सल्टंट नेमणार

$
0
0
कृषी आयुक्तालयासह विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी शिवाजीनगर येथील कृषी भवनाची साडेसहा एकर जागा ‘बीओटी’ तत्त्वावर विकसित करण्याची योजना आणखी लांबणीवर पडली आहे. या बीओटी प्रकल्पासाठी आता कन्सल्टंट नेमून त्याच्या अहवालाधारे ‘कृषी संकुल’ उभारण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे.

‘खासगी वनजमिनी’ विरोधात पुनर्विचार याचिका

$
0
0
पुण्या-मुंबईसह राज्यातील अडीच लाख हेक्टर खासगी जमिनी ‘वनां’च्या जोखडातून मुक्त करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर वन विभागाकडून लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे वन जमिनींतून सुटकेचा श्वास घेणाऱ्या राज्यातील लाखो नागरिकांवर यामुळे पुन्हा टांगती तलवार राहणार आहे.

दारुबंदीचा समाजकार्यक्रम राबवा

$
0
0
मद्यसेवन करून दुचाकी चालविल्याने ९० टक्के अपघात होत असल्याने दारुबंदी हाच समाजकार्यक्रम सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी राबवायला हवा, अशी सूचना देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी गुरुवारी केली.

महाराष्ट्र शाहीर परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर

$
0
0
महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार यंदाचा शाहीर भूषण पुरस्कार शाहीर ज्ञानेश्वर वांढरे यांना जाहीर झाला असून, अन्य पुरस्कार्थींमध्ये शाहीर बाबुराव मोरे, शाहीर कांचन जोशी (गौरव पुरस्कार), शाहीर दत्त भारती, शाहीर संजय गुरव (युवा पुरस्कार) यांचा समावेश आहे.

‘शिस्तीसाठी ठाम राहा’

$
0
0
मुलांना शिस्त लावताना पालकांनी ‘सौम्य पण ठाम’ असायला हवे, असे प्रतिपादन अक्षरनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी देशमुख यांनी केले. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळाच्या मुलांमध्ये स्वयंशिस्त रुजविण्यासाठी या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पहिली डिलिव्हरी मोफत

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात येणाऱ्या महिलांची पहिली प्रसुती मोफत करण्याचा प्रस्ताव हॉस्पिटल प्रशासनाने तयार केला आहे. मात्र, स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून​ मिळणारी सेवा सशुल्क करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images