Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीशी सलगी नको!: राज ठाकरे

$
0
0
‘नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांसह शहरातील विकासकामांसाठी इतर पक्षांना जरूर मदत करा; पण राष्ट्रवादी काँग्रेसशी अधिक सलगी खपवून घेणार नाही,’ असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सर्व नगरसेवकांना दिला.

नऊ तारखेला ‘खाऊ’ देणार!: राज

$
0
0
टोल’फोड’ आंदोलनावरून चहूकडून टीकेचा मारा झेलत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एका जाहीर कार्यक्रमात आले खरे; मात्र, त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. ‘येत्या ९ तारखेला पत्रकारांना मी नक्कीच ‘खाऊ’ देईन, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे ९ तारखेला ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.

संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानानेही नको

$
0
0
पुण्यात बहुजन विकास साहित्य परिषदेतर्फे प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने प्राचार्य बोराडे यांच्याशी सुज‌ित तांबडे यांनी केलेली बातचीत.

खेडमधील कडूसमध्ये पेशंटचे हाल

$
0
0
आपत्कालीन स्थिती वगळता पेशंटना लागणारी विविध प्रकारची औषधे हॉस्पिटलमध्येच उपलब्ध करून द्यायची, असा शासकीय दंडक असला तरी कडूस (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र पेशंटना सर्रास बाहेरून औषधे आणावी लागत आहेत.

‘महानंद’ची दूध उत्पादकांना साद

$
0
0
‘शुद्धतेचा मानदंड महानंद’, ‘शुद्ध दुधाचा आनंद महानंद’ अशी जाहिरात करणाऱ्या महानंद दूध कंपनीला मुंबईमध्ये ग्राहकांना पुरेसा पुरवठा अपुऱ्या पुरवठ्यामुळे शक्य होत नाही. त्यातच दौंड तालुक्यातील वरवंड येथील ६५ कोटी रुपये खर्चाचा दूध पावडर प्रकल्प कसा सुरू करावा हा यक्ष प्रश्न उभा आहे.

राज्यात कुठूनही निवडून दाखवा

$
0
0
‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे डिपॉझीट जप्त करण्याची भाषा करण्यापूर्वी आपण कुणाला हे आव्हान देत आहोत? याचा विचार करण्याची गरज आहे. एवढीच खुमखुमी असेल तर उद्धव यांनी महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊन दाखवावे,’ असे खुले आव्हान राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहे.

शिवनेरी विकास प्रकल्पात ३९ कोटींची कामे

$
0
0
शिवनेरी विकास प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३९ कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. त्याअंतर्गत जुन्नरच्या प्रवेशमार्गावर ऐतिहासिक धाटणीची नगरवेस बांधण्यात आली आहे.

बस व डंपरच्या धडकेत महिला जखमी

$
0
0
भरधाव वेगात असलेल्या पीएमपीएलच्या बसला बाजूने येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने बस दुभाजकावर चढून झालेल्या अपघातात रस्त्यावर झाडू मारणारी महिला जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजता येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात घडली.

रस्त्याच्या कामांमुळे घोरपडीत वाहतूक कोंडी

$
0
0
घोरपडीत अनंत चित्रपट गृहाच्या शेजारील रस्त्यावर महापालिकेतर्फे सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येत आहे; परंतु या रस्त्यावर वाहनचालकांसाठी कुठलेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसल्याने एकाच बाजूने दोन्हीकडच्या वाहनांची जा -ये सुरू आहे.

दोन वर्षांचे काम तीन महिन्यांत

$
0
0
सिटी सर्व्हे आणि सविस्तर मोजणी पूर्ण होऊन संपूर्ण तुळापूर गावाला पंधरवड्यात प्रॉपर्टी कार्डे मिळणार आहेत. सर्वसाधारणपणे दोन वर्षे लागणारे हे काम अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना ठरणार आहे.

प्रलंबित वेतनामुळे ‘HA’मध्ये अस्वस्थता

$
0
0
प्रलंबित वेतनामुळे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगार अस्वस्थ झाले आहेत. या मुद्यावर युनियनच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (तीन फेब्रुवारी) सकाळी साडेआठ वाजता कामगारांशी चर्चा करणार आहेत.

हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा

$
0
0
पिंपळे सौदागर परिसरातील हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी रविवारी (दोन फेब्रुवारी) पहाटे छापा टाकला. यामध्ये नऊ मुलींसह १५ जणांना ताब्यात घेण्यात आले.

PMP च्या धडकेने भोसरीत पोलिसाचा मृत्यू

$
0
0
भरधाव वेगाने जाणाऱ्या पीएमपी बसने मोटारसायकलीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (३१ जानेवारी) रात्री पावणेबाराच्या सुमारास भोसरीच्या लांडेवाडी चौकात हा अपघात झाला. प्रदीप विठ्ठल जाधव (५१, रा. कर्वेनगर) असे मृताचे नाव आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
कात्रज-कोंढवा रोडवर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोबी, फ्लॉवर, मटार, गवारच्या दरात वाढ

$
0
0
मार्केट यार्डात कमी झालेली आवक आणि मालाला कमी असलेली मागणी यामुळे काही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, गवार व मटारच्या दरात वाढ झाली आहे. तर, गणेश जयंतीनिमित्त फुलांच्या दरात वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी- काँग्रेसमध्ये झेडपीतही भडका

$
0
0
जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये वादाचा भडका उडाला असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी धरणे धरण्याचा इशारा दिला आहे.

पालिकेनेच घातला झाडे तोडण्याचा घाट

$
0
0
‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ असा संदेश देणाऱ्या महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी बाणेर येथील एका सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सोसायटीतील चांगली झाडे तोडण्याचा घाट घातला आहे.

पुण्यातील खासगी वनांबद्दल प्रश्नचिन्ह

$
0
0
खासगी क्षेत्राला वन जमिनींचा दर्जा देण्याचा निर्णयच सुप्रीम कोर्टाने गुरूवारी रद्द केल्याने पुण्यासह इतर जिल्ह्यातील खासगी वनांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यात १५ हजार हेक्टर खासगी वनजमीन असून यात मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, जुन्नर भागातील जमिनींचे सर्वाधिक प्रमाण आहे.

जन्मदाखल्याच्या पहिल्या प्रतीसाठी पालिकेची लुबाडणूक

$
0
0
नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्रांची पहिली प्रत मोफत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश महापौर चंचला कोद्रे यांनी दिलेले आहेत. मात्र याकडे गेले महिनाभर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत प्रशासनाने महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे.

वारजे जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण

$
0
0
वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील विस्तारीत दोनशे एमएलडीच्या जलकेंद्राचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून जुलैपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images