Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उद‍्घाटनानंतरच कलावंतांची ‘एक्झिट’

$
0
0
नाटक करणाऱ्या कलावंतांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यालाही होणाऱ्या नाट्य संमेलनाकडे ‘सेलीब्रेटी’ कलाकारांनीच पाठ फिरवली. पंढरपूरनगरीत संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा झाल्यावर आणि रात्रीचा ठरलेला संगीत कार्यक्रम करुन बहुतांशी कलाकारांनी घरची वाट धरणे पसंत केले.

नाटकांसाठी तरी हवी टोलमुक्ती

$
0
0
मराठी नाटकांच्या बसगाड्यांना महामार्गावरील टोल माफ करावेत, नाट्य अकादमीच्या उभारणीसाठी पाच एकरांचा भूखंड दिला जावा, सांस्कृतिक धोरणांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, आदी मागण्या आणि सूचना मांडत ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावर रविवारी पडदा पडला.

नाट्य विद्यापीठ लालफितीत अडकू नये

$
0
0
‘राज्य शासनाने देशातील पहिले नाट्य विद्यापीठ उभारण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, सहकारी लालफितीच्या कारभारात हे विद्यापीठ अडकू नये आणि नाट्यचळवळ पुढे जाईल असा दर्जा या विद्यापीठाने निर्माण करावा,’ अशी अपेक्षा संमेलनालाला आलेल्या राज्यभरातील हौशी रंगकर्मींनी रविवारी व्यक्त केली.

‘अहंकाराची टोके सांधावीत’

$
0
0
‘नाटकात टोकेरी अहंकार असलेली माणसे असतात. घड्याळाच्या काट्याच्या चक्रांप्रमाणे या माणसांची टोके एकमेकांमध्ये सांधली की, काळ पटकन पुढे सरकतो. अहंकाराचे हे काटे बोचरे असतात. मात्र, या काटेरी माणसांनीही कधीतरी आनंद दिलेला असतो.

पोलिस असल्याचा रुबाब करणाऱ्याला अटक

$
0
0
येरवडा पोलिस ठाण्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मित्राला भेटण्यासाठी आपण पोलिस अधिकारी असल्याचा बहाणा करत रुबाब करणाऱ्या वाशी येथील एका ठगाला अटक करण्यात आली आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या ​विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
पुण्याच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये कम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या किरण अंबुजे (१९) या विद्यार्थ्याने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली.

‘कामचुकार’ नगरसेवकांना अजित पवारांचा दम

$
0
0
नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे खडकवासला विधानसभा मतदार संघात मागील दोन निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नगरसेवक मतदारांना भेटण्यासाठी घरोघरी जातात की नाही, याची माहिती प्रत्येक प्रभागातील ‘ओळखी’च्या लोकांकडून घेतली जाईल.

आंबेगाव येथे तरुणाचा खून

$
0
0
आंबेगाव बुद्रुक येथे रविवारी सकाळी गणेश विठ्ठल डेंगळे (वय २१) या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. पूर्वीच्या भांडणातून हा खून झाला असल्याचा अंदाज भारती विद्यापीठ पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हुकुमशाहीला मीडियामुळे उठाव

$
0
0
मीडियामुळे सध्या हुकूमशाही प्रवृत्तीला अधिकाधिक उठाव मिळत आहे, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी रविवारी केली. समीरण वाळवेकर यांच्या ‘चॅनेल फोर लाइव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी साधू बोलत होते.

८ महिन्यांत ६५ लाख खर्च

$
0
0
महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणाऱ्या नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर गेल्या वर्षभरात २९४ जणांवर ६४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तर या वर्षी (२०१३-१४) फक्त आठ महिन्यात ‘माननीयां’सह कुटुंबीयांच्या ३९२ जणांच्या उपचाराचा खर्च ६५ लाख झाल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप यंदाही होणार ‘हिट विकेट’?

$
0
0
देशातील आणि पुण्यातील कथित काँग्रेसविरोधी वातावरणाचा फायदा घेतल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून संसदेत जाण्याची आशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटते आहे.

‘टॉप रँकर्स’ना मिळणार दुय्यम पदे

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये खडतर परिश्रमाने ‘टॉप रँक’ मिळविणाऱ्या उमेदवारांना दुय्यम पदांवरच समाधान मानावे लागत आहे.

बीड सोडून कुठेही लढून दाखवा

$
0
0
‘भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपणास लोकसभेसाठी बीडमधून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले, तेव्हा मी त्यांना बारामतीत उभे राहून दाखवा, असे प्रतिआव्हान दिले होते.

वर्षाला एक लाख मोबाइल कचऱ्यात

$
0
0
इलेक्ट्रॉनिक वस्तू, कम्प्युटर यापुरता मर्यादित असलेल्या ‘ई-कचऱ्या’मध्ये आता मोबाइलची भर पडली आहे. स्पर्धेमुळे हँडसेटच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने आणि क्रयशक्ती वाढल्याने नवा मोबाइल घेण्याची क्रेझच सुरू आहे. याचा परिणाम म्हणजे शहरात वर्षाला एक लाख मोबाइलचा कचरा तयार होत आहे. प्रत्यक्षात, घरात पडून राहिलेल्या मोबाइल कचऱ्याचे प्रमाणही काही लाखांमध्ये आहे.

रविवारी रंगणार ‘रुहानियत’

$
0
0
बल्गेरियातील संगीत क्षेत्रातील काही कलाकार असं मानतात, की त्यांचे पूर्वज मूळचे राजस्थानतील जिप्सी होते. ‘मिस्टीक पाथवेज’मधून याच प्रवासाचा मागोवा घेतला जाणार आहे. यात काल्बेलियातील स्त्रियांची गीतं आणि बल्गेरियातील व्हाया ग्रुपमधील गायकांचं सादरीकरण होणार आहे.

संत रचनांचा भावार्थांसह स्वरसंवाद

$
0
0
गायिका राधा मंगेशकर हिच्या संकल्पना-संहिता आणि सादरीकरणातून साकारलेला ‘कहे मीरासूर कबीरा’ हा कार्यक्रम आज (दि. ४) आयोजिण्यात आला आहे. ‘स्वरभारती’ प्रस्तुत या कार्यक्रमात संत साहित्यावरील निवडक रचना भावार्थासह सादर होणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

बोला आणि जिंका!

$
0
0
खूप बोलणं आणि नेमकं बोलणं यात फरक आहे. अर्थात, आपण जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत तो फरक समजतही नाही. मुळात बोलायची आवड असली, की पुढे त्याला दिशा देता येते.

आजपासून इव्हेंटची ‘जिग्यासा’

$
0
0
सी प्रोग्रॅमिंग, सी प्लस प्लस या संदर्भातील प्रश्न आणि लोगो ओळखा यांसारख्या इव्हेंटमधून टेक्निकल क्विझ रंगत जाईल, तर प्रोजेक्ट तयार करून ‘रन’ करून दाखवणारी सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कॉम्पिटिशनही ‘जिग्यासा’त धमाल आणणार आहे.

महाम्बरेंच्या बंदिशींनी दिग्गजांच्या सुरांची जोड

$
0
0
ज्येष्ठ कवी गंगाधर महाम्बरे यांच्या बंदिशी, दिग्गज गायकांचा स्वर, रागभाव आणि शब्दभाव जपून दिलेलं संगीत यांच्या सुंदर मिलाफामुळे पुणेकरांची संध्याकाळ सूरमय झाली. निमित्त होतं ‘गा मना’ या सीडीच्या प्रकाशन सोहळ्याचं. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं.

ज्योत्स्ना नावाचं ‘गुलाबाचं गाणं’

$
0
0
‘नाट्यनिकेतन संस्थेच्या ११ नाटकांतून ज्योत्स्ना भोळे यांनी भूमिका केल्या. मात्र, त्यांच्या प्रत्येक भूमिकेची तुलना नंतर ‘कुलवधू’ याच नाटकातील भूमिकेशी होऊ लागली. मात्र, ‘भूमिकन्या सीता’मधील एक गाणं खरोखरंच सुंदर होतं.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images