Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यातील वनक्षेत्राची मोजणी सुरू

$
0
0
देशभरातील वन्यजीवांचे वास्तव्य असलेल्या जंगलांचा ‘सातबारा’ करण्याच्या मोहिमेला गुरुवारी सुरुवात झाली. पुण्यातील सर्व टेकड्यांसह ताम्हिणी, सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य आणि बारामती, दौंड या भागातील वनक्षेत्रात पुढील आठवडाभर ‘ट्रॅन्झक्ट लाइन’ या पद्धतीने वनक्षेत्राची मोजणी होणार आहे.

अडीच लाखांचा दंड वसूल

$
0
0
तिकीट न काढता प्रवास ९०० जणावंर कारवाई करून रेल्वे प्रशासनाने डिसेंबर महिन्यामध्ये सुमारे अडीच लाख रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे.

७७ वर्षीय वडिलांचे मुलाला किडनीदान

$
0
0
बापलेकाच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची क्षमता असते, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय येईल, अशी घटना पिंपरीत घडली आहे. ७७ वर्षांच्या वडिलांनी आपल्या ५१ वर्षांच्या मुलाला किडनीदान केले आहे.

वाहतूक कोंडीबाबत तळेगावात रास्ता रोको

$
0
0
तळेगाव-चाकण रस्त्यावर तळेगाव स्टेशन चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तळेगाव दाभाडे भाजपच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

चिठ्ठ्यांतील प्रेम पोचले ‘न्यूड क्लिप’पर्यंत

$
0
0
वर्गातील एखादी मुलगी आवडते किंवा मुलगा आवडतो म्हणून नकळत होणाऱ्या अल्लड प्रेमाची व्याख्या आताच्या पिढीने बदलली आहे. चिट्ठ्यांपुरते मर्यादित असलेली ही प्रकरणे आता एकमेकांना ‘न्यूड’ एमएमएस पाठविण्यापर्यंत पोहोचली असून या ‘क्लिप’ इंटरनेटवर अपलोड होत आहेत.

संशयास्पद औषधे जप्त

$
0
0
‘ड्युफॅस्टॉन’या बनावट औषधाच्या विक्रीनंतर चिंचवडमधील तीन विक्रेत्यांकडून बीपी, डायबेटिस, फिट्सवरील संशयास्पद औषधे कारवाई करून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी जप्त केली. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच ही औषधे बनावट आहेत की नाही हे स्पष्ट होणार आहे.

सिंहगड रोडवरही वाजणार ‘तिसरी घंटा’

$
0
0
बरीच वर्षे नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत असलेल्या सिंहगड रोडवर अखेर तिसरी घंटा वाजणार आहे. वडगाव बुद्रुकजवळ माणिकबाग येथे गोयल गंगा प्रकल्पाजवळ सुमारे दीड एकरात नाट्यगृहाला मंजुरी मिळाली आहे.

डंपरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0
चांदणी चौकाजवळ खडीच्या डंपर खाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रवीण कुमार (वय ३९, रा. गणेश पार्क, चैतन्यनगर, धनकवडी) असे त्यांचे नाव आहे.

ज्वारी महाग होण्याची चिन्हे

$
0
0
ज्वारी पिकाच्या पेरणी क्षेत्रात यंदा मोठी घट झाली असून त्यामुळे खुल्या बाजारात ज्वारीचे दर तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी नगदी पिकांकडे वळल्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात घट झाल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.

सिंहगड रोड घेणार मोकळा श्वास

$
0
0
सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांची लवकरच नित्याच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वडगाव बुद्रुक आणि सिंहगड कॉलेजकडील भागांना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन पूलांचे काम प्रगतीपथावर असून, या भागात वाढलेल्या निवासीकरणामुळे वाहतुकीवर पडणारा ताण या दोन्ही पूलांमुळे कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘ग्लोबल मॅप’वर पुण्याहून आणखी उड्डाणे

$
0
0
लोहगाव विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे.

नवे वेळापत्रक काटेकोरपणे पाळा

$
0
0
लोहगाव विमानतळावर सुरू झालेल्या आधुनिकीकरणाच्या कामामुळे विमानसेवेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला असला तरी नवीन वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याची सूचना प्रवाशांनी केली आहे.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर होणार

$
0
0
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे मेकओव्हर करण्याची योजना मध्य रेल्वेने तयार केली असून, त्याचा एक प्राथमिक आराखडा तयार केला आहे.

‘पिफ’मध्ये ‘फँड्रीच्या नावाचं चांगभलं..!’

$
0
0
क्षणाक्षणाला ताणली गेलेली उत्सुकता, एकापाठोपाठ जाहीर झालेले पुरस्कार आणि त्यानंतर घुमला एकच दमदार आवाज ‘फँड्रीच्या नावानं चांगभलं’, १२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) सर्वाधिक पुरस्कार पटकावत फँड्रीने वर्चस्व गाजविले.

‘पीएफ’चे व्यवहार आता ऑनलाइन

$
0
0
कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करण्यासाठी देशभरात स्थापन करण्यात आलेल्या खासगी पीएफ ट्रस्टसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) खात्याने इलेक्ट्रॉनिक रिटर्न सिस्टिम लागू केली आहे.

महिलांना फसविणारा… ‘तो हाच’

$
0
0
सधन कुटुंबातील तसेच उच्चशिक्षित महिलांना हेरून त्यांना परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने तर चांगल्या गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

बाबा मिसाळला अखेर अटक

$
0
0
शुक्रवार पेठेतील एका व्यावसायिकाच्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपी असलेले भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस बाबा मिसाळ हा सहकारनगर पोलिसांसमोर गुरुवारी रात्री हजर झाला.

शरद कम्प्युटर योजना ‘लॉगऑफ’

$
0
0
शहरातील गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ‘शरद संगणक प्रशिक्षण’ योजनेतील तीन गाड्या सध्या धूळखात पडल्या आहे‌त.

पालिकेच्या ‘मॉडर्न’ सभागृहाचे आज उद‍्घाटन

$
0
0
विधिमंडळाच्या धर्तीवर पालिकेतील सदस्यांची बैठक व्यवस्था आणि अत्याधुनिक ध्वनीयंत्रणेसह सुसज्ज झालेल्या महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद‍्घाटन शुक्रवारी (१७ जानेवारी) केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

एलबीटी रद्दसाठी ३१ पर्यंत मुदत

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) रद्द करण्याबाबत राज्यातील व्यापारी संघटनेने राज्य सरकाराला ३१ जानेवारीची मुदत दिली आहे. सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून संघटनेचे सामर्थ्य कळू शकते, असा इशारा राज्यातील व्यापारी संघटनेने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images