Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

९२ वर्षांच्या पेशंटवर गुडघे प्रत्यारोपण ऑपरेशन

$
0
0
वयाच्या ९२ व्या वर्षी गुडघे प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी करण्याची किमया दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी करून दाखविली.

पालख्यांचे स्वागत यंदा पाटील इस्टेटजवळ

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे महापालिकेकडून करण्यात येणा-या स्वागताच्या ठिकाणात यंदा बदल झाला असून, वाकडेवाडीतील कमलनयन बजाज चौकाऐवजी इंजिनियरिंग कॉलेजलगत असलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीजवळ स्वागत केले जाणार आहे.

कलमाडी समर्थकांनो काँग्रेस समजावून घ्या!

$
0
0
काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना लक्ष्य करणाऱ्या आमदार विनायक निम्हण यांनी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर बुधवारी हल्ला चढविला आहे. 'देशाची आणि काँग्रेसची बदनामी झाल्यामुळे सोनिया गांधी यांनी निलंबित केलेल्या कलमाडी यांच्या स्वागताला जाणा-या कलमाडी समर्थकांनाच काँग्रेस समजावून घेण्याची गरज आहे,' अशी टीका निम्हण यांनी केली आहे.

हॉस्पिटलला आरोग्य परवान्याची गरज नाही

$
0
0
महापालिकेने खासगी संस्थेला हॉस्पिटल चालविण्यास दिले असल्यास अशा हॉस्पिटलना आरोग्य परवाना घेण्याची आवश्यकता नसल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, संबंधित हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

अजय मेमाणेवर कारवाई नाही

$
0
0
बंडगार्डन पोलिसांनी अजय रमेश मेमाणे या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई; तसेच गुन्हा दाखल केलेला नाही. बंडगार्डन पोलिसांनी नुकतेच मेहेत्रे टोळीतील चौघांवर 'मोक्का'अंतर्गत कारवाई केली आहे.

राबणा-या हातांना उज्ज्वल यश...

$
0
0
...अजिंक्य खडके या आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेच्या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या निकालानंतर केलेल्या फोनवरही तो त्याच्या ड्रायव्हिंगच्या पेशाशी प्रामाणिक असल्याचेच दिसले, दहावीला अगदी ७० टक्के मिळवूनही!

दहावीचा आज ऑनलाइन निकाल

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. मार्कलिस्ट मात्र २२ जूनला मिळणार आहे.

अपंग विद्यार्थ्यांसाठी साकारले संवेदना उद्यान

$
0
0
अपंग विद्यार्थ्यांना सुलभतेने वावरता येईल, त्यांच्या क्षमता विकसित होतील अशा सुविधा असलेले वैशिष्ट्यपूर्ण 'सेन्सरी गार्डन' (संवेदना उद्यान) बाल कल्याण संस्थेमध्ये विकसित करण्यात आले आहे. तब्बल सहा हजार फुटांमध्ये विकसित केलेल्या या उद्यानातील सर्व रचना विशेष क्षमता असलेल्या मुलांच्या दृष्टीकोनातूनच तयार केल्या आहेत.

आळंदी देवस्थानविरोधात घंटानाद

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने यंदा खडकीतील पारंपरिक मार्ग बदलून, संगमवाडीच्या नविन पुलावरून पुण्यनगरीमध्ये प्रवेश केला.

धसक्याचे 'गणित' उलगडता उलगडेना

$
0
0
मुलांच्या मनातून गणिताचा बागुलबुवा कमी करण्यासाठी बोर्डातर्फे प्रयत्न सुरू असले, तरी निकालात 'दांडी गुल' करण्यात गणितच आघाडीवर असल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता गणित विषयाकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोनच बदलण्याचे नियोजन बोर्डातर्फे सुरू आहे.

माउलींच्या पालखीचा गांधीवाड्यात मुक्काम

$
0
0
या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून अवघी अलंकापुरी वारकऱ्यांच्या उपस्थितीत न्हाऊन निघाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सोमवारी (११ जून) सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाड्यात असून बुधवारी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

दहावीत राज्याला डिस्टिंक्शन

$
0
0
राज्यभरातून १७ लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदा ७४.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल तीन टक्क्यांनी वाढला आहे. केवळ नियमित विद्यार्थ्यांचा (फ्रेशर्स) निकाल ८१.३२ टक्के आहे.

अंधशाळेच्या मुलांचे नेत्रदीपक यश

$
0
0
ब्रेल लिपीतील पुस्तके, सीडीज तसेच नेहमीची पुस्तके, गाईडस् वाचून देणा-यांच्या मदतीने पुण्यातील ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

'आयटी दिंडी'त १३८ जण सहभागी

$
0
0
वारीत सहभागी होण्याची परंपरा सलग सातव्या वर्षी कायम ठेवून पुण्यातील विविध आयटी कंपन्यांतील १३८ अधिकारी, कर्मचा-यांनी बुधवारी आळंदी ते पुणे असा ३१ किलोमीटरचा प्रवास संत ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर वारकरी बनून पायी केला.

निकाल पाहण्यासाठी मोफत सुविधा

$
0
0
दहावीचा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेचालक वा संबंधित यंत्रणांकडून लूट केली जात असल्याच्या विद्यार्थी-पालकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर काही संस्था-संघटनांकडून निकाल मोफत उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

इचलकरंजीत काविळीने ८ दगावले

$
0
0
काविळीच्या भयंकर साथीमुळे इचलकरंजी येथील आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या उपमुख्य अधिका-यांचाही समावेश आहे. इचलकरंजीमधील सुमारे ३२०० जणांना काविळीची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

भक्तिवर्षावात पुण्यनगरी चिंब

$
0
0
'माउली माउली', 'ज्ञानोबा-तुकाराम' असा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर अन् भक्तिभावाने भिजलेल्या लोचनांच्या पायघड्यांवरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी पुण्यनगरीत प्रवेश केला.

नाल्यांपाठोपाठ गटारेही कच-याने तुडुंब

$
0
0
पावसाळा तोंडावर येऊनदेखील वारजे परिसरातील नाल्यांची अद्याप स्वच्छता झालेली नाही. त्यातच, नाल्यांमध्ये पाणी वाहून आणणारी गटारे कचऱ्याने भरली असून यंदाही पहिल्याच पावसानंतर रस्त्यांसह सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

फॅशन स्ट्रीटवरील बेकायदा स्टॉलवर हातोडा?

$
0
0
बेकायदा स्टॉलमुळे चर्चेत आलेल्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमधील समस्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी उद्या (बुधवारी) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन आणि सर्वपक्षीय सदस्यांची बैठक होणार आहे.

बेकायदा स्टॉलना कॅन्टोन्मेंटचे अभय

$
0
0
कॅम्पमधील फॅशन स्ट्रीट परिसरातील बेकायदा स्टॉलसंदर्भात पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या प्रशासनाने बोलविलेली बुधवारची बैठक निष्फळ ठरली. तीन तासांच्या बैठकीत अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत प्रशासनाने 'ब्र'ही न काढला नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>