Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सीएसचा पेपर पुढे ढकलला

0
0
कंपनी सेक्रेटरी (सीएस) अभ्यासक्रमासाठीच्या फाउंडेशन परीक्षेतील 'एलिमेंट्स ऑफ बिझनेस लॉ अँड मॅनेजमेंट' हा मंगळवारी होणारा पेपर काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकला नाही. हा पेपर पुढे ढकलण्यात आला असून हा पेपर १६ जून रोजी होणार आहे.

शहरातील रस्त्यांची 'अधूरी एक कहाणी'

0
0
पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीची चाळीस टक्के कामे अद्याप अपूर्ण आहेत. दरम्यान, डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याने ही कामे थांबली असून, डांबराचा साठा उपलब्ध होताच आठ दिवसांत उर्वरित कामे पूर्ण होतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी करण्यात आला. नालेसफाईची मात्र, जवळपास नव्वद टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

पुण्यातही पावसाची वर्दी

0
0
पूर्वमोसमी पावसाने शहर आणि परिसरात हजेरी लावून मान्सूनच्या आगमनाची वर्दी पुणेकरांना दिली. शहरासह राज्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. पुढच्या दोन दिवसांतही शहराच्या काही भागांत हलका पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

अंध हक्कांची सनद सरकारला द्या

0
0
अंधजनांना सन्मानाने रोजगार आणि सामाजिक संधी मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाने तयार केलेली अंध हक्क सनद केंद आणि राज्य सरकारला देणार असून, तिच्या अंमलबजावणीला यश मिळाल्याशिवाय समाजाने स्वस्थ बसू नये, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांनी केले.

'वी कलेक्ट क्लोथ' मोहीम सुरू

0
0
विविध कारणांमुळे वापरात नसलेल्या चांगल्या कपड्यांचे करायचे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा मंडळींसाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत (केकेपीकेपी) आणि स्वच्छ संस्थतर्फे 'वी कलेक्ट क्लोथ' ही मोहीम राबविण्यात येते आहे.

कच-यात आढळले स्त्री अर्भक

0
0
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे गटारात टाकून दिलेले स्त्रीअर्भक सापडल्याची घटना मंगळवारीच उघडकीस आलेली असताना, बुधवारी येथील गजबजलेल्या सदर बाजार परिसरातील कचराकुंडीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले एक स्त्री अर्भक सापडले.

अकरावीचा फॉर्म कसा भरायचा?

0
0
अकरावी केंदीय प्रवेश प्रक्रियेत अकरावीचा प्रवेश अर्ज कसा भरायचा, या विषयावर एडनेक्सा संस्थेतफेर् येत्या शुक्रवारी (१५ जून) विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यक्रम पालक व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले आहेत.

जादाचे लाख रुपये परत केले

0
0
'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या टिळक रोड शाखेतून तब्बल एक लाख रुपयांची जादा मिळालेली रक्कम प्रा. शिवाजी भोसले यांनी बँकेला परत आणून देत प्रामाणिकपणाचा प्रत्यय घडविला.

'सीबीएसई'च्या प्रवेशाबाबत संभ्रम कायम

0
0
सीबीएसई आणि अकरावी केंदीय प्रवेश समिती यांच्यातील विसंवादात यंदाही खंड पडलेला नाही. परिणामी, गोंधळाची परंपरा यंदाही कायम राहण्याची परंपरा शालेय स्तरावरील परीक्षा दिलेल्या सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी केंदीय प्रवेश प्रक्रियेत प्रवेश दिला जाणार नाही.

कृषी क्षेत्रातील बालमजुरी थांबविण्याची मागणी

0
0
इतर सर्वच क्षेत्रांसह कृषी क्षेत्रामधून चालणारी बालमजुरीही पूर्णपणे थांबविण्यात यावी, यासाठी 'सेव्ह द चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेतर्फे रविवारी राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन यांना विशेष निवेदन देण्यात आले.

उलगडणार हॉर्नबिल आणि निशींचे नाते

0
0
अरुणाचल प्रदेशातील पाक्के व्याघ्रप्रकल्पाची विशेष ओळख असलेले हॉर्नबिल आणि निशी या जमातीचे अनोखे नाते अनुभविण्याची संधी पुणेकरांना जिविधा संस्थेने उपलब्ध केली आहे. या हॉर्नबिलचे गेल्या तीन वर्षांपासून संशोधन करणारी अमृता राणे हिचे लॉ कॉलेज रोड येथील रामचंद राठी हायस्कूल येथे बुधवार (१३ जून) सायं ६.३० वाजता व्याख्यान आयोजिण्यात आले आहे.

जमीनवाटपातही 'त्या' अधिका-याचे प्रताप!

0
0
मावळ तालुक्यातील सुदवडीमधील शेतजमिनीचा पुनर्वसनाचा शेरा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांना अंधारात ठेवणा-या 'त्या' महसूल अधिकाऱ्याचे आणखी प्रताप उजेडात आले आहेत.

कचऱ्यात आढळले स्त्री अर्भक

0
0
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये माळीनगर येथे टाकलेले स्त्रीअर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी येथील गजबजलेल्या सदर बाजार परिसरातील कचराकुंडीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले एक स्त्रीअर्भक सापडले.

गांधी टोप्यांना पुन्हा 'डिमांड'

0
0
'मी अण्णा हजारे' असे लिहिलेल्या गांधी टोप्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात अनेकांनी वापरल्याने या टोप्यांना पुन्हा लोकप्रियता मिळाली. याच ट्रेंडची प्रचिती यंदाच्या वारी सोहळ्यातही आली. अनेकांनी सोशल मेसेज देण्यासाठी पालखी सोहळ्यातही या टोप्या परिधान केल्या होत्या.

माउलीचेच त्यांना छत्र...

0
0
बालवयातच माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या त्यांचा पालखीसोहळ्यातील सहभाग भाविकांच्या काळजाला स्पर्शून गेला. कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केलेल्या राज्यभरातील शेतक-यांची ४७ मुले यंदाही पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहेत. आळंदी ते पुणे या टप्प्यात त्यांनी पालखीची सोबत केली.

'पालखी सोहळा पाहताना खूप मज्जा वाटली...'

0
0
'पालखी सोहळा प्रथमच पाहतो आहे. मात्र संत तुकाराम चित्रपटामुळे मला अनेक गोष्टी कळू लागल्या. इतक्या माणसांना टाळ-मृदंग वाजवताना पाहून खूप मज्जा वाटली,' अशी निरागस प्रतिक्रिया 'तुकाराम' या चित्रपटातील बालकलाकार प्रथमेश निकम याने व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडचा निकाल ८८.३३ टक्के

0
0
पिंपरी-चिंचवड शहाराचा दहावीचा निकाल यंदा ८८.३३ टक्के लागला आहे. शहरातील ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. चिंचवडच्या बधिर-मूक विद्यालयाचा सलग दुस-या वर्षी शंभर टक्के निकाल लागला आहे.

पनुपूरचा सुप्रभाला धक्का

0
0
पुण्याच्या अपूर्वा बराटे आणि नुपूर शिंदे यांनी सनसनाटी विजयासह रचना लाइफस्टाइल राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पधेर्तील १८ वर्षांखालील मुलींच्या गटातून उपांत्य फेरी गाठली, तर मुलांमध्ये शविर्ल नवघरे याने आपली घोडदौड कायम राखली.

सुरक्षेसाठी कठोर कायद्याची मागणी

0
0
वाळू तस्करी, गौण खनिजांची बेकायदा वाहतूक, उत्खनन थांबविण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी जिवाचे रान करतात.

कासच्या कुंपणाला वादाचे काटे

0
0
महाराष्ट्राचे 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हणून ओळखल्या जाणा-या कास पठाराला कुंपण घालायचे की नाही, याबाबत पर्यटक अनभिज्ञ असले, तरी वन विभाग आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चांगलेच युद्ध रंगले आहे. कास पठाराला कुंपण घालण्याचे काम अजिबात थांबविणार नाही, अशी भूमिका वन विभागाने घेतली आहे; तर कुंपण घालू देणार नाही, असे आव्हान पर्यावरणप्रेमींनी वन विभागाला दिले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images