Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विवाहितेच्या आत्महत्या : कुटुंबीयांवर गुन्हा

$
0
0
माहेरून सोन्याचे दागिने, तसेच नणंदेच्या लग्नासाठी ५० हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार नाना पेठेत घडला आहे.

सायकलीच्या घोषणेला पालिकेची ‘टांग’?

$
0
0
महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सायकल देण्याची घोषणा हवेतच विरली असून, पालिकेच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना थेट वार्षिक परीक्षेलाच सायकली मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाषाणमधील उद्यान उद् घाटनाअभावी पडून

$
0
0
पाषाणमध्ये पुणे महापालिकेने तयार केलेले उद्यान उद‍्घाटनाअभावी पडूनच आहे. हे उद्यान नागरिकांसाठी खुले न केल्यामुळे भर दुपारी आणि रात्रीच्या वेळी उद्यानामध्ये तळीरामांचा अड्डा भरताना दिसत आहे.

पीएमपीच्या धडकेत ६ जण जखमी

$
0
0
पीएमपी बसचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाले. त्यामध्ये मायलेकीसह दोघांचा समावेश आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास लक्ष्मी रोडवरील उंबऱ्या गणपती चौकामध्ये हा अपघात घडला.

बेकायदा बांधकामांबाबत महापौरांची बैठक

$
0
0
बेकायदा बांधकामावर महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत चर्चा करून शहरातील बेकायदा बांधकामाबाबत धोरण ठरविण्यासाठी महापौर चंचला कोद्रे यांनी पुढाकार घेतला आहे.

बाबा-दादांच्या विसंवादाने वाहतूक सुधारणेला ब्रेक

$
0
0
राज्य नेतृत्वाकडून ठोस निर्णय घेण्यात चालढकल केली जात असल्याने पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्याची प्रक्रिया रखडली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावर अद्यापही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमत न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही.

दोन कोटींपर्यंत पुस्तकविक्रींची उलाढाल

$
0
0
साहित्य संमेलनानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे ग्रंथनगरीत आयोजित ग्रंथप्रदर्शनाला विविध स्तरांमधील वाचकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत या प्रदर्शनात सुमारे एक ते दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

मराठीची वस्त्रे उतरवू नकाः उद्धव

$
0
0
'आम्ही वेगळ्या पक्षांचे राजकारणीही पक्षभेद विसरून मराठीच्या मुद्द्यावर वाद टाळून एकत्र येण्याचे तारतम्य दाखवत असू, तर हेच तारतम्य साहित्यिकांनी का दाखवू नये', अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संमेलनातील वादांवरून साहित्यिकांना रविवारी सुनावले.

हशा, टाळ्यांत हरवली साहित्यिक चर्चा

$
0
0
उद्घाटनाच्या सत्रात साहित्य संमेलनाध्यक्ष साहित्य आणि मराठीच्या अस्तित्वासंदर्भात निर्माण झालेले प्रश्न, नव्याने लिहिणाऱ्या साहित्यिकांचा धांडोळा घेतात. तसेच साहित्याच्या भविष्यातील संक्रमणांचे पट समोर ठेवतात. मात्र, यंदाच्या संमेलनात तसे काही झाल्याचे दिसून आले नाही.

‘बालभारती’चे निर्णय पक्षपाती?

$
0
0
राष्ट्रवादी पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती, कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी येत्या १३ जानेवारीपासून ‘बालभारती’ प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘TDR’वरही ६ टक्के स्टॅम्प ड्युटी!

$
0
0
हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापरण्याची क्षमता असलेल्या भूखंडाचे मूल्यांकन करताना जमीन दरामध्ये ४० टक्के वाढ देऊन येणारा दर मूल्यांकनासाठी विचारात घ्यावा, असे नोंदणी आणि मुद्रांक विभागाने स्पष्ट केले आहे.

थंडी ओसरल्याने भाज्यांचे दर उतरले

$
0
0
थंडीचा कडाका कमी झाल्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे, त्यामुळे दर आवाक्यात आले आहेत. काकडी, कारली, दोडका आणि घेवड्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून अन्य भाज्यांचे दर उतरले आहेत. पालेभाज्यांचे दर कायम आहेत.

दाभोलकर हत्येचा सावध निषेध

$
0
0
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर साहित्यिकांनी धाडसाने सामोरे जाण्याचा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सल्ला साहित्य महामंडळाने अखेर मानला; पण तोही अंशतःच. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधाचा ठराव साहित्य संमेलनाच्या समारोपात झाला.

'कोटी'बाज भाषणात साहित्य हरवले

$
0
0
सासवड येथे झालेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे यांनी कोणतीही साहित्यिक चर्चा केली नाही. ही पोकळी समारोपाच्या कार्यक्रमात भरून निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, फमुंनी पुन्हा साहित्य रसिकांना निराश केलं.

सुविधा चांगली; पण अंमलबजावणीचे आव्हान

$
0
0
‘सर्वांसाठी आरोग्य सुविधा’ ही केंद्र सरकारची योजना कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून ही योजना चांगली आहे. मात्र, याची अंमलबजावणी तसेच त्याच्यासाठी आर्थिक तरतूद कशी होणार यासारखी आव्हाने उभी आहेत.

अॅम्ब्युलन्स चालकांकडून पेशंटची आर्थिक पिळवणूक

$
0
0
सरकारी अथवा खासगी हॉस्पिटल असो की डेड हाउसमधून पेशंट घरी नेण्यासाठी अथवा परगावी नेण्यासाठी खासगी अॅम्ब्युलन्स चालकांकडून आर्थिक पिळवणूक होऊ लागली आहे.

१ लाख १० हजार रुपयांचा गुटखा जप्त

$
0
0
राज्यात गुटखा बंदी असतानाही चोरी छुपे गुटखा विक्री सुरू असल्याचे आढळून आले आहे. नाना पेठेसह लोणीकंद येथे झालेल्या कारवाईतून दोन व्यापाऱ्यांकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचा गुटखा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी जप्त केला.

विश्रांतवाडी येथे फ्लॅट फोडला

$
0
0
विश्रांतवाडी येथे एकतानगरमधील फ्लॅट फोडून रोख सव्वा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव बुद्रुकच्या रहिवाशांना दिलासा

$
0
0
वाहतूक कोंडी हा नित्याचा प्रश्न झालेल्या सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुकमधील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गंगा भाग्योदयनगर ते सिंहगड कॉलेजला जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे तेथील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.

वारज्यात भुयारी मार्गांची मागणी

$
0
0
कात्रज- देहूरोड महामार्गावर वारजे येथे डुक्करखिंड ते उड्डाणपूलदरम्यान आणखी दोन प्रशस्त भुयारी मार्ग करण्याची मागणी पुढे येत आहे. या परिसरातील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या शिफारशींमध्येही ही गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images