Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आडते, व्यापाऱ्यांचा उद्याचा बंद मागे

$
0
0
राज्य सरकारने फळभाज्या, कांदा- बटाटा, नियंत्रणमुक्त करण्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आठ जानेवारी रोजी पुकारलेला बंद तुर्तास मागे घेतला आहे.

गुणपत्रिकेला विलंब

$
0
0
ऑनलाइन निकालाला बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही निकालाची मूळ प्रत हाती न आल्याने पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजांकडे विचारणा सुरू केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून याविषयीचे ठोस उत्तर मिळत नसल्याने कॉलेजांनीही हात वर केले आहेत.

हटवादी नेत्यांमुळे काँक्रिटीकरण नाहीच

$
0
0
गेल्या वर्षीच्या जोरदार पावसात शहरातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाल्याने प्रमुख ३३ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या मान्यतेअभावी अद्याप कागदावरच राहिला आहे.

वाहनचालकांना पार्किंग शुल्काचा भुर्दंड

$
0
0
पालिका प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे पालिकेच्या सर्वच वाहनतळांवर वाहनचालकांची लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाहनतळांचे ठेकेदार मनमानी कारभार करून पुणेकरांकडून पार्किंगच्या नावाखाली जादा पैसे घेत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला.

निधीअभावीच रखडली बंद लिफ्टची दुरुस्ती

$
0
0
रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि प्रभागातील बेंच बसविण्यासाठी वर्गीकरण करणाऱ्या माननीयांना लिफ्टच्या दुरुस्तीसाठी पुरेशी तरतूद करण्यात पूर्ण अपयश आल्याचे समोर येत आहे.

कमला नेहरूतील चारही लिफ्ट केल्या बंद

$
0
0
कमला नेहरू हॉस्पिटलमधील लिफ्ट अपघातानंतर प‌ालिकेच्या आरोग्य विभागाला आ‌‌ता जाग आली आहे. हॉस्पिटलमधील सर्व लिफ्टची पाहणी करून तपासणी केली जात नाही, तोपर्यंत एकही लिफ्ट सुरू करणार नाही, असे पत्र पालिकेच्या आरोग्य विभागाने पालिकेच्या तांत्रिक विभागाला पाठविले आहे.

चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव फसला

$
0
0
हडपसरजवळील मांजरी रोडवरील के. आर. बी. कंपनीसमोर सोमवारी दुपारी दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी सिव्हिल कॉन्ट्रक्टरच्या पाच वर्षाच्या मुलाचा अपहरणाचा डाव दोघा धाडसी तरुणांमुळे फसला.

बाबा आणि दादांच्या कचाट्यातून सुटेना डीपी

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) कोर्टबाजीच्या कचाट्यातून सुटला असला, तरी अद्याप ‘बाबा-दादां’च्या तावडीतून मात्र सुटलेला नाही! नियोजन समिती नेमण्यासाठी कायद्यामध्ये वेळेचे बंधन नसल्याचा गैरफायदा सरकार घेत असून, त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे.

घरखरेदीचे स्वप्न अधिक महागडे

$
0
0
राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी दहा टक्के वाढ केली असल्याचे सांगितले असले, तरी त्यातील काही छुप्या दरवाढीमुळे रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

वळसे, बेनके की थेट अजितदादाच?

$
0
0
सीनिअर नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली पाहिजे, असा आदेश थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे बाशिंग ‘राष्ट्रवादी’च्या कोणत्या नेत्याच्या डोक्यावर बांधले जाणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

१.७५ कोटींची विक्रमी LBT वसुली

$
0
0
हडपसर येथील ‘सिनेपोलिस थिएटर’ने स्थानिक संस्था करासह (एलबीटी) दंडापोटी तब्बल पावणेदोन कोटी रुपये पालिकेकडे जमा केले आहेत. महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. एलबीटी विभागाने सिनेपोलिस थिएटरची गेल्या महिन्यात तपासणी केली होती.

आता अडथळा आचारसंहितेचा

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीचा संभाव्य कालावधी जाहीर झाल्याने आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी पुण्यातील मेट्रोसह अन्य महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर आहे.

आता गॅसची दरवाढ

$
0
0
पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ राज्य सरकारने घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अधिभारात वाढ केली आहे. त्यामुळे अनुदान असलेल्या आणि विनाअनुदानित सिलिंडिरच्या दरात कंपन्यांनी प्रत्येकी आठ रुपयांनी वाढ लागू केली आहे.

‘रेबीज’मुळे बाळ दगावले

$
0
0
भटका कुत्रा चावल्याने चार महिन्याच्या बालकाचा ‘रेबीज’च्या आजाराने महापालिकेच्या नायडू संसर्ग हॉस्पिटलमध्ये रविवारी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) येथील पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर खाउचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या नातेवाइकानेच हा प्रकार केला असून गणेश नवले असे या तरुणाचे नाव आहे.

‘MIDC’तील बांधकामांवर १ टक्का उपकराची वसुली

$
0
0
‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा₨तील (एमआयडीसी) बांधकामांवर १ जानेवारी २००८ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने एक टक्का उपकर वसूल करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.

अपहरण; एकाला पोलिस कोठडी

$
0
0
अडीच वर्षाच्या मुलीचे एक लाख रुपयांसाठी अपहरण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले पुणेकर

$
0
0
दुबईत नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक ऑलिंपियाडमध्ये पुण्याच्या कलाकारांनी विविध विभागांमध्ये पदकं आणि पारितोषिकं मिळवली आहेत. अखिल भारतीय संघाच्या ‘ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर’तर्फे या ऑलिंपियाडचं आयोजन करण्यात आलं होतं.

इंजिनीअरिंग अभ्यासमंडळाच्या १२ जणांचे सदस्यत्व रद्द

$
0
0
विविध कारणांमुळे कार्यात झालेल्या बदलांची माहिती विद्यापीठाला न दिल्याने इंजिनीअरिंगच्या विविध अभ्यासमंडळातील बारा जणांचे सदस्यत्व विद्यापीठाने संपुष्टात आणले आहे.

नॉनसायन्स, नॉनसेन्समधील फरक लक्षात घ्या

$
0
0
विज्ञानाविषयीच्या उलट-सुलट चर्चांपेक्षा खरे विज्ञान अधिक रंजक आहे. विज्ञानाची ही रंजकताच आपल्याकडे अभ्यासली जात नाही. ‘नॉनसायन्स’ आणि ‘नॉनसेन्स’ बाबींमधील फरक आपल्याला लक्षात यायलाच हवा. विज्ञान, वैज्ञानिक संज्ञा आणि प्रयोगाअंती सिद्ध झालेले खरे ज्ञान यातील फरक ओळखायला हवा.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images