Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फी वाढी विरोधात ‘ABVP’चे आंदोलन

$
0
0
उत्तरपत्रिकांच्या फेरमूल्यांकनाची फी वाढविल्याच्या निषेधार्थ ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने (अभाविप) शुक्रवारी विद्यापीठात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कुलगुरूंच्या कार्यालयात घुसण्याचाही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

‘JEE-मेन’चे अर्ज भरण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

$
0
0
‘जेईई-मेन’साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सहा जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातून एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रिक्षा कॅलिब्रेशनला ४ दिवस

$
0
0
मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओने रिक्षाचालकांना दिलेली ३१ डिसेंबरची मुदत संपण्यास चार दिवसाचा अवधी बाकी आहे. या कालावधीत रिक्षाचालकांनी मीटरचे कॅलिब्रेशन करून न घेतल्यास नवीन वर्षात आरटीओकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

१ राज्य... किमान ३ सीईटी!

$
0
0
विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश परीक्षा द्याव्या लागू नयेत, यासाठी ज्याचा विचार झाला, तो ‘एक देश-एक सीईटी’ फंडा मागे पडून ‘एक राज्य- किमान तीन सीईटी’ असा या वर्षी फंडा दिसतो आहे.

दारूभट्ट्या पाहून दादा संतापले

$
0
0
फुरसुंगी येथे शुक्रवारी सकाळी कचरा प्रकल्पाची पाहणी करताना त्या शेजारीच धगधगणाऱ्या दारूच्या भट्ट्या पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा अनावर झाला.

भाजप रस्त्यावर

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्याच्या महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने शनिवारच्या दौऱ्यात त्यांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे शहरात पाच ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे.

शिंदे-मोदी फैजलच्या टार्गेटवर

$
0
0
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा दहशतवादी अबू फैजल आणि त्याच्या साथीदारांचा कट मध्य प्रदेश पोलिसांनी उधळला. शिंदे सोलापूरमध्ये फारशी सुरक्षाव्यवस्था बाळगत नसल्याने तिथेच त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी दहशतवादी करत होते.

डॉ. लहानेंना पालिकेचे मानपत्र

$
0
0
उत्कृष्ट नेत्रशल्यचिकित्सक, सुमारे सव्वा लाखांहून अधिक पेशंटवर नेत्रशस्त्रक्रिया, मोफत नेत्रशिबिराच्या आयोजनाचे व्रत याद्वारे गोरगरीब पेशंटांवर नेत्रोपचार करणारे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा पुणे महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.

९ लाख रुपयांचा ऐवज चोरला

$
0
0
रामवाडी गावात फ्लॅट फोडून एक लाख रुपयांची रोकड; तसेच सोन्या-चांदीचे दानिगे असा आठ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुरंदरची तोफ बारामतीच्या दिशेने

$
0
0
शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे लोकसभा अथवा विधानसभेसाठीची निवडणूक बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः लढविणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

ओढ्यात पडून एक जखमी

$
0
0
रामटेकडी-ससाणेनगर रेल्वेलाइनच्याकडेने मंगळवारी सकाळी चाललेला रोहिदास माणिकराव लासुर्णे (वय ३५ रा. ससाणेनगर, हडपसर) हा तोल गेल्याने ३० फूट खोल ओड्यात पडला. तो जखमी झाला असून, त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

डीपी रस्त्याला तुरुंगाचा खोडा

$
0
0
संगमवाडी रस्त्याने थेट विमानतळापर्यंत जाण्यासाठी पालिकेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या डीपी रस्त्याला तुरुंग प्रशासनाने खोडा घातला आहे. या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यातील कामाला हरकत घेण्यात आल्याने आता त्याचा अंतिम निर्णय मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

पदाधिका-यांचा मुक्काम सासवडकरांच्या घरी

$
0
0
साहित्यिकांनी स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला यावे, अशी भूमिका जोर धरत असतानाच पुण्यातील साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला भार साहित्य महामंडळावर न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय दबाव अन् सहकार्याचा अभाव

$
0
0
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना एकीकडे राजकीय दबाव आणि दुसरीकडे बंदोबस्तासाठी पोलिसबळ वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. याही परिस्थितीत कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई निरंतर चालू असल्याचा आव प्रशासन आणत आहे.

वुमेन्स कौन्सिलला जागा नाही

$
0
0
पूना वुमेन्स कौन्सिल या संस्थेला ‘मनोविकास’ ही शाळा चालविण्यासाठी डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनातील जागा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने फेटाळला आहे. त्याऐवजी वीर सावरकर भवनामध्ये जागा देण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

विजेच्या धक्क्याने भोसरीत २ मजूर भाजले

$
0
0
भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीच्या भिंतीचे काम करताना उच्चदाब विद्युतवाहक तारांच्या संपर्कात आल्याने दोन बांधकाम मजूर गंभीर भाजले आहेत. मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी हा प्रकार घडला. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नव्या वर्षात ग्रामपंचायती होणार हायटेक

$
0
0
नववर्षाचा आरंभ पुणे जिल्ह्यातील गावांना ‘हायटेक’ करणारा ठरणार आहे. कारण शहरी भागात आजपर्यंत​ मिळणाऱ्या ई-बँकिंग, ई-हेल्थ, ई-एज्युकेशन या अत्याधुनिक सेवा जिल्ह्यातील एक हजार ३९९ ग्रामपंचायतींना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आखला असून, पहिल्या टप्प्यात शिरूर, दौंड, खेड आणि हवेली या चार तालुक्यांतील ३३२ गामपंचायतींची निवड केली आहे.

सोनसाखळी चोरांना पिंपरीत अटक

$
0
0
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या पाच चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून शहरातील ४२ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ६० तोळे दागिन्यांसह सुमारे २० लाख रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सुलभ ‘एफ फॉर्म’ नव्या वर्षात

$
0
0
सोनोग्राफी करण्यापूर्वी भरावा लागणाऱ्या ‘एफ फॉर्म’मधील काही आक्षेपार्ह गोष्टींवर दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्राच्या सेंट्रल सुपरवायझरी बोर्डाकडे करण्यात आली आहे.

चौधरी, साळवींवर कोर्टात केस दाखल होणार

$
0
0
गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे (पीसीपीएनडीटी) उल्लंघन करणारे प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ धनसिंग चौधरी यांच्यासह ब्रह्मलिखित मासिकाचे संपादक आदिनाथ साळवी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, त्यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल करण्याचा निर्णय पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images