Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कर्मचारी भरती नियमांमध्येही बदल

$
0
0
‘बालभारती कर्मचारी कृती समिती’च्या मागणीनुसार ‘डिलॉइट’ने सादर केलेला अहवाल अमान्य करण्यासोबतच बालभारती प्रशासनाने कर्मचारी भरतीसाठीच्या नियमांमध्येही बदल केले. कृती समितीच्या मागण्यांनुसार हे बदल करताना प्रत्येकवेळी त्यातील शैक्षणिक अर्हतेचे निकषांविषयीचीच तडजोड प्रशासनाने मान्य केली.

माहिती आयोगाचा विद्यापीठाला दणका

$
0
0
विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेच्या फोटो कॉपी देण्याच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या अटी लादणाऱ्या पुणे विद्यापीठाला राज्याच्या माहिती आयोगाने चांगलाच दणका दिला आहे.

आयुक्तांनी डावलले सरकारचे आदेश

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे अनधिकृत बांधकामाच्या खात्यांचा कार्यभार न देता आयुक्त महेश पाठक यांनी त्यांच्याकडे भूमी जिंदगी, भवन, भूमीप्रापण, विधी सल्लागार या खात्यांची जबाबदारी दिली असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.

जन्म-मृत्यूची पहिली प्रत मोफत द्या

$
0
0
जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची पहिली प्रत नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश शहराच्या प्रथम नागरिक महापौर चंचला कोद्रे यांनी महापालिका प्रशासनाला मंगळवारी दिले.

कॉलेजसंख्येतही पुणे पिछाडीवर

$
0
0
ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ही बिरुदावली पुण्यासाठी वापरली जात असली, तरी शिक्षणाच्या क्षेत्रात गुणात्मक आणि संख्यात्मक या दोन्ही स्तरांवर पुणे देशात अव्वल नसल्याचे चित्र आहे. देशात सर्वाधिक कॉलेज असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे पाचव्या स्थानावर आहे.

‘TDR’चा आदेश अखेर मिळाला

$
0
0
नदीपात्रालगतच्या शिवणे-खराडी रस्त्यासाठी ‘ना विकास क्षेत्रा’तील जागा ताब्यात घेण्यासाठी १०० टक्के टीडीआर देण्याचा सरकारी आदेश महापालिकेला अखेर मंगळवारी प्राप्त झाला.

नेत्यांचीच क-हेकाठी मांदियाळी

$
0
0
कऱ्हाकाठी शुक्रवारपासून जमणाऱ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत दाखल होण्यासाठी साहित्यिकांपेक्षा राजकीय माननीयांच्या दिंड्याच अधिक आहेत. साहित्य संमेलनातील कार्यक्रमांत विविध पक्षांमधील पुढाऱ्यांचा भरणा आहे आणि त्यात ‘योगायोगाने’ राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा आहे.

मजनूंना रोखण्यासाठी महिला पथक

$
0
0
महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी करणाऱ्या ‘रोडरोमिओं’सह शाळा-कॉलेजमधील ‘मजनुं’ना अद्दल घडविण्यासाठी महिला पोलिसांचे एक स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरातील विविध शाळा-कॉलेज, वसतिगृहांना या पथकाकडून दररोज भेट देण्यात येणार आहे.

नागोरीचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे

$
0
0
कोल्हापूर येथे ‘मोक्का’अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यासाठी आरोपी मनीष नागोरी याचा ताबा देण्यात यावा, असा कोल्हापूर येथील गांधीनगर ठाण्याच्या पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे.

एसटी होणार हायटेक

$
0
0
स्थानकावरून सुटल्यानंतर एसटी बसचा प्रवास कसा सुरू आहे, अधिकृत थांब्यांवर, अनधिकृत धाब्यांवर या बस थांबत आहेत का, आदी माहिती मिळवण्यासाठी एसटीच्या सर्व गाड्यांना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसवण्यात येणार आहे.

‘म्हाडा’ नियमाला कुणाचा खोडा?

$
0
0
पुण्याच्या वतनदारीवरून ‘कारभारी’ आणि मुंबईतील ‘सुभेदारां’च्या वादात पुणेकरांच्या हिताच्या योजना कुलूपबंद झाल्या आहेत. वारंवार मागण्या आणि मिनतवारी करूनही ‘म्हाडा’ची नियमावली अद्याप अंतिम होत नसून, राजदरबारी पुणेकरांची डाळ शिजणार तरी केव्हा, अशी विचारणा केली जात आहे.

विनयभंग करणाऱ्या फौजदाराला अटक

$
0
0
नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री आयोजित लहान मुलांच्या कार्यक्रमात, दत्तवाडी येथील ४३ वर्षीय महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या सहकारनगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलीस फौजदाराला अटक करण्यात आली आहे.

‘सोनोग्राफी’लाही आता यूआयडी

$
0
0
राज्यातील नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरमध्ये नेमक्या किती मशिन उपलब्ध आहेत याची माहिती संकलित करताना प्रत्येक मशिनला स्वतंत्र युनिक आयडेंटिफिकेशनचा क्रमांक (युआयडी) देण्यात येत आहे.

इंजिनीअरना धमकावून मशिन पळवले

$
0
0
खासगी मोबाइल कंपनीच्या ऑप्टिकल केबलची दुरुस्ती करणाऱ्या इंजिनीअरना धमकावत त्यांच्याकडील ‘ओएफसी प्लायसिंग मश‌िन’ जबरदस्तीने घेऊन जाणाऱ्या, तसेच मश‌िन परत देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या तिघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘माफी’ प्रकल्पादरम्यान सकाळचे विमान सुरू ठेवा

$
0
0
पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या कामादरम्यान पुणे-दिल्ली दरम्यानच्या सकाळच्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करू नये, अशी विनंती करणारे पत्र एअर इंडियाच्या पुणे कार्यालयाने हवाई दलाला दिले आहे.

आरोग्य योजना भ्रष्टाचाराची चौकशी कागदावरच

$
0
0
महापालिकेच्या आरोग्य साह्य योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने पंधरा दिवसांपूर्वी देऊनही याबाबतची कोणतीही कारवाई पालिकेने अद्याप केलेली नाही. यामुळे या योजनेतील कागदपत्रांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

राज्य सरकारचा गैरकारभार उघड

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून ‘राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे,’ अशी बतावणी करण्यात येत असलेला महाराष्ट्र शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्याचे विधेयक अद्याप राष्ट्रपती भवनात पोहोचलेच नसल्याचे उघड झाले आहे.

जनतेचे सेवक झाले जनतेचे मालक

$
0
0
निवडून आलेली माणसे जनतेचे सेवक म्हणून काम करण्याऐवजी स्वतःला मालक समजत असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केली.

व्यावसायिकाला मारहाण; गुन्हा दाखल

$
0
0
बिबवेवाडी येथे व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्या दुकानातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी येथील विश्वबंधू मिठाईवाले दुकानात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.

१८ चाकांचा ट्रक अणे घाटात पडून

$
0
0
अमेरिकी बनावटीचा लेफ्ट हँड ड्राइव्ह असलेला आणि राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाची मालकी असलेली १८ चाकांचा ट्रक अणे घाटात गीअर फेल झाल्याने आठवड्यापासून बंद पडला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images