Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिस व्हेरिफिकेशन ऑनलाइन

$
0
0
पासपोर्टसाठी आवश्यक असलेल्या पोलिस ‘व्हेरिफिकेशन’साठी करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा आता थांबणार आहे. पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर लगेचच पोलिस व्हेरिफिकेशनची माहिती शहरातील पोलिस ठाण्यांना ऑनलाइन कळविण्यात येणार आहे.

NDA प्रवेशासाठी वयोमर्यादा शिथिल

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) प्रवेशासाठीची वयोमर्यादा सहा महिन्यांनी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे साडेसोळा ते साडेएकोणीस वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांना एनडीए प्रवेशासाठी प्रयत्न करता येणार आहेत.

मेडिकलसाठी ‘MH-CET’

$
0
0
मेडिकल प्रवेशांसाठी राज्य सरकारचीच प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) होणार आहे. राज्याची मेडिकल ‘सीईटी’ होणार का, याबाबतचा संभ्रम यामुळे दूर झाला आहे.मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्याची मेडिकल सीईटी अर्थात एमएच-सीईटी होणार, असे ऑगस्टमध्येच जाहीर करण्यात आले होते.

संजय दत्तची अखेर पॅरोलवर सुटका

$
0
0
३० दिवसांच्या पॅरोलची रजा मंजूर झालेल्या अभिनेता संजय दत्त याची अखेर आज पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटका झाली. संजयला वारंवर मिळणाऱ्या रजेवरून वादंग माजल्याने तसेच कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने ६ डिसेंबरला पॅरोल मिळाल्यानंतरही संजय गेले १५ दिवस कारागृहातच होता.

पुणे होणार मुंबईपेक्षा मोठे शहर

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेची हद्द दुप्पट झाली आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीच राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पेक्षा पुणे अव्वल ठरले असून शहराचे क्षेत्रफळ सर्वसाधारण ५६० चौरस किलोमीटरवर पोहचले आहे.

डॉक्टर, केमिस्टबाबत सरकारचे नियम जाचक

$
0
0
सरकारच्या जाचक नियमांमुळे डॉक्टर व केमिस्टनी सावध राहणे गरजेचे असल्याचा सूर वारजे येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर-केमिस्ट मेळाव्यात काढण्यात आला. दोघांनी एकत्र काम केल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील, असेही मत यावेळी मांडण्यात आले.

‘वारजे उड्डाणपुलाला गती द्या’

$
0
0
वारजे परिसरात मेट्रो आणि बीआरटी मार्ग प्रस्तावित असल्याने कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या खांबाची रचना बदलली आहे. त्यामुळे या पुलाचे काम रखडले असून या कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले.

आदिवासी संशोधन संस्थेला स्वायत्तता

$
0
0
आदिवासी समाजाच्या विकासासाठी संशोधन करणाऱ्या पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला राज्य सरकारने स्वायत्तता दर्जा बहाल केला आहे. स्वायत्तता मिळालेली ही देशातील पहिलीच सरकारी संस्था ठरली आहे.

मोदींच्या मुंबईतील सभेला पुण्यातून १० हजार जण

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत येत्या रविवारी (२२ डिसेंबर) होणाऱ्या सभेला शहरातून तब्बल १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये युवक आणि महिलांचीही मोठी उपस्थिती असेल, असा दावा शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी केला.

जप्त केलेले २३ लाखांचे अंमली पदार्थ जाळून नष्ट

$
0
0
पुणे शहर पुणे ग्रामीण पोलिस आणि लोहमार्ग जिल्हा पोलिसांनी जप्त केलेले २३ लाख १४ हजार १०८ रुपये किमतीचे अंमली पदार्थ मुंढवा येथील भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आले आहेत.

दोन सोनसाखळीचोरांना अटक

$
0
0
पुणे शहरात विठ्ठलनगर, आनंदनगर आणि धायरी या परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तुषार रोहिदास म्हसकर (२५, रा. अहिरेगाव वारजे माळवाडी), अभिजित बाळासाहेब गाडे (२६, रा. शिवराय कॉलनी, काळेपडळ) यांना अटक करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामांना आणखी चाप

$
0
0
महापालिकेच्या नोटिशीला स्थगिती घेऊन अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. पालिकेने ४३३(अ)नुसार बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या नोटिसांना अभय देता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा पालिका कोर्टाने दिला आहे.

पुण्याचे कारभारी घेणार हजेरी

$
0
0
शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत, सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासह प्रस्तावित नव्या विकासकामांविषयी आणि येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे ‘कारभारी’ रविवारी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांची ‘हजेरी’ घेणार आहेत.

१० वी विज्ञानाच्या पुस्तकात चुकीच्या आकृत्या?

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये अनेक आकृत्यांमध्ये तांत्रिक चुका राहिल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

संजय दत्त पुन्हा महिन्याभरासाठी तुरुंगाबाहेर

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याला शनिवारी सकाळी येरवडा जेलमधून तीस दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले. फर्लो रजेनंतर त्याला लगेचच पॅरोल मंजूर करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

नंबर ‘वन’साठी हौशी पुणेकराने मोजले १२ लाख!

$
0
0
हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. एका हौशी पुणेकराने आपल्या चारचाकी गाडीला ‘एक’ हा क्रमांक मिळावा यासाठी शनिवारी तब्बल बारा लाख रुपये मोजले. आरटीओकडून हा चॉईस नंबर घेण्यासाठी या पुणेकराने लाखांत बोली लावून नंबरची हौस पूर्ण केली.

मंगळसूत्र चोरीचे पुन्हा सत्र

$
0
0
कोथरूडमधील एकलव्य कॉलेज येथून पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून चोरून नेले. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कल्पना अमिताभ होरे (४८, रा. सारथी शिल्प, एकलव्य कॉलेज, कोथरूड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पवारांनी शिकवला आघाडीचा धर्म

$
0
0
‘आघाडीचे राजकारण कसे करावे आणि विविध पक्षांशी आघाडी कशी करावी याबाबत राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच राजकारण्यांना कानमंत्र दिला आहे. हाच धर्म आता सर्व राजकारण्यांना पाळावा लागत आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

स्वतंत्र पालिकेला अजित पवार अनुकूल

$
0
0
शहराच्या पूर्व भागातील गावांसाठी स्वतंत्र महापालिका करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी अनुकूल मत व्यक्त केले. ‘या भागासाठी वेगळी महापालिका होणे शक्य असेल, तर त्यात अडचण काय,’ अशी टिपण्णी करून त्यांनी स्वतंत्र पालिकेच्या पारड्यात मत टाकले.

काय ठरणार पुण्याचे मानचिन्ह?

$
0
0
परागीभवन करणाऱ्या मधमाश्यांच्या कार्याची दखल घेत त्यांनाच पुण्याचे मानचिन्ह जाहीर करा, इथपासून ते माळरानांचे प्रतिनिधित्व करणारा चिंकारा, लांडगा, प्रदूषणाचे नियंत्रण करणारी दगडफुले, सुंदर दिसणारे शिंदळमोकडीची फुले....
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images