Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

२.२५ कोटींचे रक्तचंदन पकडले

0
0
रात्रीच्या वेळी कंटेनरमधून बेकायदेशीररीत्या नेण्यात येत असलेले सव्वादोन कोटी रुपयांचे, ११ हजार किलो चोरीचे रक्तचंदन नारायणगाव पोलिसांनी जप्त केले आहे. नगर-कल्याण महामार्गावर बेल्हे गावच्या हद्दीत चेकनाका बंदी तपासणीदरम्यान शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

सरसकट ४ FSI नको

0
0
शहराच्या मेट्रोसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतला असताना, पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी मात्र या प्रस्तावाला थेट विरोध करण्याचा इरादा शनिवारी स्पष्ट केला.

अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या

0
0
माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता सलील अंकोला याची पत्नी परिणीती अंकोला (वय ४६) हिने पुण्यातील राहत्या घरात रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

PMP ची रंगसंगती गेली कुठे?

0
0
सार्वजनिक टप्पा प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या रंगसंगतीच्या नियमांचे उल्लंघन करूनही पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसना परिवहन प्राधिकरणातर्फे परवाना दिला जात असल्याचा आरोप नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी केला आहे.

‘२५ टक्के प्रवेशां’चे अनुदान शाळांनाच नकोसे?

0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) माध्यमातून २५ टक्के आरक्षित जागांवर होणाऱ्या प्रवेशांच्या बदल्यात शाळांना अनुदान देण्यासाठी (प्रतिपूर्ती) राज्यात यंदा कोट्यावधींचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जप्रक्रियेबाबत शाळाच उदासीन आहेत. त्यामुळे ही प्रतिपूर्ती करायची कशी, असा पेच आता प्राथमिक शिक्षण संचालनालयासमोर उभा राहिला आहे.

‘आरटीर्इ’ आरक्षणावर करडी नजर

0
0
शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीर्इ)२५ टक्के आरक्षणाच्या तरतुदीची अंमलबजावणी आणि त्याबाबतची आकडेवारी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनासाठी मोठी त्रासदायक बाब ठरत आहे. ही त्रासदायक बाब सुलभ करत, ही अंमलबजावणी अधिक काटेकोर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विशेष सॉफ्टवेअरच तयार केले आहे.

मतदारांना भुलवण्यासाठी ‘तिजोरीवर धोंडा’

0
0
कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांची टांगती तलवार असल्याने पुणे कँटोन्मेंट बोर्डातील नगरसेवकांनी प्रशासनाच्या साथीने मतदारांना भुलविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करणारा निर्णय घेतला आहे. हाती घेतलेली कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण व्हावीत, यासाठी कंत्राटदारांना बक्षिसी म्हणून टेंडरच्या रकमेपेक्षा २५ टक्क्यांपासून ते ५० टक्क्यांपर्यंत दर वाढवून दिले जाणार आहेत.

अनधिकृत बांधकामांबाबतचा अध्यादेश महिनाभरात

0
0
‘पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांचा संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी येत्या महिन्याभरात अध्यादेश काढला जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा दिले आहे.

सुरक्षित ‘ATM’साठी बँका सरसावल्या

0
0
ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) केंद्रावरील काचांवर असणाऱ्या जाहिराती काढण्यास बँकांनी सुरुवात केली असून, यात सरकारी बँक आघाडीवर आहेत; बंदूकधारी सुरक्षा रक्षक नेमण्यामुळे खर्चात वाढ होणार असली, तरी यासंदर्भातील प्रक्रिया काही बँकांनी सुरू केली आहे.

शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला शिक्षकाची बेदम मारहाण

0
0
खेड येथील ‘शिक्षणविकास मंडळ संचलित’ रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष गजानन धायबर यांना याच संस्थेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या किसन दामोदर ढमाले, त्यांचा भाऊ, मुलगा व अन्य दोघांनी बेदम मारहाण केली.

दौंडमधील गोदामाला अखेर मुहूर्त

0
0
राज्यात ‘अन्नसुरक्षा विधेयका’नुसार धान्याच्या वाटपासाठी, साठविण्यासाठी गोदामे बांधण्यात येत आहेत. त्यानुसार दौंड तालुक्यातील सोनवडी गावच्या हद्दीत बांधण्यात येणाऱ्या गोदामाच्या पायाभरणी कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

टॅँकरखाली सापडून पत्नी ठार; पती जखमी

0
0
टॅँकरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. नंदा बाळू काळे (वय ३५, रा.रोहकल, ता. खेड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती बाळू काळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिक्षण मंडळाचे बजेट १२वी पास व्यक्तीकडून

0
0
विद्येच्या माहेरघरात‌ गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या शिक्षणमंडळाचे बजेट चक्क बारावी पास व्यक्ती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी ३ मोटार लाँच विकत घेणार

0
0
खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होडीतून चास कमान जलाशय पार पाडावा लागत असल्याने एक कोटी रुपये किमतीच्या तीन मोटार लॉँच विकत घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. येत्या जून अखेरपर्यंत लाँच विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे ग्राम विकासमंत्री जयंत पाटील यांनी आश्वासन दिले.

....अन् बिगारी तरुणाला मिळाला न्याय

0
0
बिगारी काम करणारा एक तरुण रस्ता अपघातात जखमी झाला होता. त्यानंतर त्याने नुकसानभरपाईसाठी संबंधित कारचालकावर ऑगस्ट महिन्यामध्ये कोर्टात दावा दाखल केला.

जादूटोणाविरोधी गुन्हा; आरोपीला पोलीस कोठडी

0
0
‘महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ अंतर्गत दाखल झालेल्या राज्यातील पहिल्या गुन्ह्यातील आरोपीला खडकी कोर्टाने २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजीपाला आवाक्यात

0
0
थंडीची तीव्रता कमी झाल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली असून दर उतरले आहेत. लसूण, टोमॅटो, मटार यांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली असून बाकी सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत तर, पालेभाज्यांचे दर कायम आहेत.

बुधवार पेठेत लुटले; एकाला अटक

0
0
‘तुझ्या खिशात गांजा असून तू पोलिस चौकीत चल’, असा एका व्यक्तीला दम देऊन त्याच्या खिशातील आठ हजार रुपये काढून घेणाऱ्या एका तरुणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. बुधवार पेठेतील भोई गल्ली येथे हा प्रकार घडला.

नोकरीचे आमिष : १३ लाखांची फसवणूक

0
0
महापालिकेचे ठेकेदाराचे परवाना, तसेच नोकरी मिळवून देण्याच्या आमिषापोटी पावणे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अनधिकृत प्रवेशाचा गोंधळ विद्यार्थ्यांच्या पथ्यावर

0
0
‘एसपी’ कॉलेजमध्ये झालेल्या गदारोळाचा या प्रक्रियेमधून ‘एसपी’त अनधिकृतपणे प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना फायदाच झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नव्याने आयोजित प्रवेश प्रक्रियेतून अनेकांना यापूर्वी मिळालेल्या कॉलेजपेक्षाही कित्येक पट चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images