Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डिफर्ड पेमेंटवरून वादंग

$
0
0
शहरातील साठ रस्ते डिफर्ड पेमेंटने देण्याची यादी असताना बिल्डरांच्या हितासाठी आठ रस्ते डिफर्ड पेमेंटने देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. याची चौकशी करून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी पालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे केली आहे.

मूल पळवणारी महिला वानवडीत

$
0
0
हडपसर परिसरातून दहा दिवसांचे लहान मूल पळवणारी महिला वानवडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका दाम्पत्याला दिसली. या महिलेचे स्केच तयार करण्यात येत असून, ‘सीटीसीव्ही’ फूटेजमध्ये तिची ‘इमेज’ही पोलिसांना मिळाली आहे. बंडगार्डन आणि हडपसर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

गोव्यातील संशयित ‘बोगस’

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासासाठी गोव्यातून आणलेल्या दोन संशयितांनीच हत्या केल्याचा गजहब पुणे पोलिस दलांतील काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री केला. या अधिकाऱ्यांचा आनंद काही तासच टिकला.

सुरेश कलमाडी पुन्हा ‘खिलाडी’?

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याची धडपड करीत असलेले खासदार सुरेश कलमाडी यांनी चार जानेवारीला पुण्यात झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा आयोजित केला आहे. कलमाडी यांची ही धडपड त्यांना उमेदवारीची शाश्वती मिळाल्यामुळे आहे, की ते सांगतील त्याला उमेदवारी मिळणार याची खात्री असल्यामुळे आहे, या चर्चेला उधाण आले आहे.

मूल पळवणारी महिला ‘लोकेट’

$
0
0
हडपसर परिसरातून दहा दिवसांचे लहान मूल पळवणारी महिला वानवडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका दाम्पत्याला दिसली. या महिलेचे स्केच तयार करण्यात येत असून, ‘सीटीसीव्ही’ फूटेजमध्ये तिची ‘इमेज’ही पोलिसांना मिळाली आहे. बंडगार्डन आणि हडपसर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

‘आप’ राज्यात यश मिळवणार

$
0
0
हातात झाडू घेऊन ‘आम आदमी झिंदाबाद,’ ‘जय जवान, जय किसान, आम आदमी है महान,‘भ्रष्टाचार का एकही काल, केजरीवाल- केजरीवाल’ अशा घोषणा देत पदयात्रा काढून साखर वाटत आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी रविवारी पुण्यात जल्लोष केला.

शासकीय कार्यालयांमध्येही ‘लाइट्स.. कॅमेरा...’

$
0
0
पुणे शहर आणि परिसरातील शासकीय कार्यालयांमध्येही आता ‘लाइट्स.. कॅमेरा.. अँड अॅक्शन’च्या सूचना घुमणार आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी पुणे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण करण्यास परवानगी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

मटार, गाजर स्वस्त; अन्य पालेभाज्या स्थिर

$
0
0
मार्केट यार्डात गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक वाढल्यामुळे मटार, गाजराचे दर उतरले आहेत. तर अन्य पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आता फारसा भुर्दंड पडणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कार चोरणारा अटकेत

$
0
0
चाकूचा धाक दाखवून इनोव्हा कार चोरल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला १२ ​डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विजय भास्कर शिंदे (वय २८, रा. मु. पो. डिगोळ, ता. जामखेड, जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे.

प्राथमिक शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी नवा ‘धडा’

$
0
0
‘पाचवीतील विद्यार्थ्यांना दुसरीचे गणित सोडविता येत नाही’... किंवा ‘चौथीतील विद्यार्थ्याला पहिलीतील धडा वाचता येत नाही...’ प्राथमिक शिक्षणातील यासारख्या गंभीर त्रुटी कमी करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) आयोजित ‘वाचन, लेखन आणि गणित विकास कार्यक्रम’ शनिवारी सुरू झाला.

एम. कॉम परीक्षेचा सावळा गोंधळ

$
0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटन्ट्सच्या (आयसीडब्ल्यूए) परीक्षेसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे विद्यापीठाच्या एम. कॉमच्या परीक्षांमुळे आता सीएस (कंपनी सेक्रेटरी) ची तयारी करणारे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0
कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रविवारी पहाटे लागलेल्या आगीमुळे फॅशन स्ट्रीटच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्केटमध्ये बोर्डाने कोणत्याही सुविधा दिलेल्या नसताना, बेकायदा स्टॉल आणि ‘पे अॅण्ड पार्क’ने मार्केटला घेरलेले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

फॅशन स्ट्रीटमध्ये पंधरा स्टॉलला आग

$
0
0
लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रविवारी पहाटे लागलेल्या आगीत कपडे, चपलांचे सुमारे पंधरा स्टॉल आगीत जळून भस्मसात झाले. त्या आगीत ४० ते ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

ई-लर्निंग, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अहवाल सादर

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी आवश्यक असलेली र्इ-लर्निंग शिक्षणपद्धती आणि झोपडपट्टी पुनर्वसन संजीवनी योजनेचे प्रकल्प अहवाल काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे सादर केले. बागुल यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली. र्इ-लर्निंग शिक्षणपद्धती अत्यंत महत्त्वाची असून देशाच्या भविष्याच्या दृष्टीने त्याची गरज आहे.

बांधकाम नियमावलीत बदल करणे भाग

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाला महापालिकेकडून हवे तेवढे पाणी ​दिले जाते; पण त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा बोर्ड विचारही करीत नाही आणि पावसाळी पाण्याची साठवण करण्याचा मार्गही पत्करत नाही.

हॉस्पिटल खासगीकरणाचा पालिकेचा घाट

$
0
0
शहरातील तीन हॉस्पिटल खासगी डॉक्टरांना चालविण्यासाठी दिल्यानंतरही समाधान न झालेल्या महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या मालकीची दापोडी आणि खराडी येथील आणखी दोन हॉस्पिटल खासगीकरणाद्वारे चालविण्यास देण्याचा घाट घातला आहे.

स्वाभिमानी संघटनाही आक्रमक

$
0
0
‘आम आदमी पार्टी’सारख्या नवख्या पक्षाने दिल्लीमध्ये प्रस्थापितांना धूळ चारल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही राज्यातील निवडणुका अधिक प्रबळपणे लढण्याचे संकेत दिले आहेत.

पुणेकरांच्या पदरी काय पडणार?

$
0
0
प्रश्न तेच, ते उपस्थित करणारे आमदारही तेच; आणि उत्तरे देणारे सत्ताधारीही तेच...राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुणेकरांचे प्रश्न राज्यकर्त्यांच्या दरबारी मांडण्यासाठी शहरातील आमदार सज्ज झाले आहेत.

फुले स्मारकाबाबत राजकारण नको

$
0
0
‘पुण्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाबाबत राजकारण न करता सर्व राजकीय पक्ष एकत्र आले, तर प्रश्न लवकर सुटेल,’ अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केली.

चोरलेले बाळ अखेर सापडले

$
0
0
सामाजिक कार्यकर्ती असल्याचा बनाव करून महिलेने हडपसर येथून पळविलेले दहा दिवसांचे बाळ रविवारी अखेर थेरगावमध्ये सापडले. याप्रकरणी स्वाती गायकवाड (वय ३०, रा. कैलासनगर, थेरगाव) हिला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलिसांनी तिला ताब्यात घेवून बंडगार्डन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images