Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बारावीचे अर्ज भरताना ज्यु. कॉलेजची ‘शाळा’

$
0
0
बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरून घेण्याच्या प्रक्रियेची तांत्रिक आणि प्रशासकीय समस्यांनी ‘शाळा’ केली असून अनेक ज्युनिअर कॉलेजांमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर अर्ज भरण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.

‘एटीएम’मध्ये फसविणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांना अटक

$
0
0
‘एटीएम’ मशिनमधून पैसे काढताना चलाखीने फसवणूक करणाऱ्या दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या विद्यार्थ्यांनी अकरा व्यक्तींना गंडविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत हे दोघे शिक्षण घेतात.

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंध विभागाने बाजीराव रोडवर दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांकडून दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशिपपासून वंचित

$
0
0
पालिकेच्या शिक्षण मंडळातील शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतूद असतानाही पहिले शैक्षणिक सत्र उलटल्यानंतरही उद्याप विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिल‌ी गेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन खरेदीही ‘एलबीटी’च्या लायनीत

$
0
0
इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करुन विविध वस्तूंची शॉपिंग करून ग्राहकांना या वस्तूंचे वितरण करणाऱ्या वाहतुकदारांना महापालिकेने एलबीटी भरण्याच्या नोटीसा बजाविल्या आहेत.

वाहतूक पोलिसांची तळीरामांवर कारवाई

$
0
0
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये शनिवार आणि रविवारी ही मोहीम घेण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

दहा दिवसांच्या मुलाला पळविले

$
0
0
सामाजिक कार्यकर्ती असल्याचा बहाणा करत एका महिलेने दहा दिवसांच्या मुलाला पळून नेल्याचा प्रकार हडपसर येथे शुक्रवारी सकाळी घडला. बाळंतपणासाठी अॅडमिट असताना तक्रारदार महिलेशी सलगी वाढवून मुलाला पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.

संतोष मानेची होणार पुन्हा सुनावणी

$
0
0
बसचालक संतोष मानेप्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत शुक्रवारी सरकारी आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद झाला. मानेला पुन्हा एकदा शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या केसची पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

बीआरटीसीठी भुयारी मार्ग फोडला

$
0
0
नगररोडवरील चंदननगर भागात लाखो रुपये खर्च करून बांधलेला भुयारी मार्ग बीआरटीसाठी जेसीबीच्या साह्याने फोडून टाकण्यात आला. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या लहरी कारभारामुळे झालेले हे लाखो रुपयांचे नुकसान अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावे अशी मागणी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या भागात आंदोनल केले.

कैदी संजय दत्त पुन्हा सुट्टीवर

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. पत्नी मान्यता हिच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणासाठी संजयने पॅरोलसाठी अर्ज केला होता. याआधीही संजयला १४ दिवसांची रजा मिळाली होती.

दाभोलकर हत्या: गोव्यातून २ ताब्यात

$
0
0
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघा संशयित ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ला गोव्यातून गुरुवारी रात्री ताब्यात घेतेले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांशी त्यांचे वर्णन जुळत असल्याने त्यांना तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली. पुणे पोलिसांचे एक पथक बुधवारपासून गोव्यात तळ ठोकून होते.

संजूबाबाच्या 'सुट्टी'चा निषेध

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा ‘पॅरोल’ मंजूर केल्याच्या निषेधार्थ रिपाईच्या कार्यकर्त्यांनी येरवडा जेलबाहेर तीव्र निदर्शनं केली. संजय दत्तला ‘रॉयल ट्रिटमेंट’ देणा-या जेल प्रशासनाविरोधात त्यांनी काळे झेंडे फडकवले आणि घोषणाबाजी केली.

आरोपी ‘ट्रान्सफर’ होणार?

$
0
0
मुंब्रा पोलिसांनी पकडलेल्या चौर आरोपींपैकी दोघांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात ट्रान्सफर केले जाण्याची शक्यता आहे. सध्या हे आरोपी दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे.

राजेंद्र देशमुख यांच्यावर गोळीबार झाल्याचे स्पष्ट

$
0
0
बांधकाम व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र उर्फ अण्णा देशमुख यांच्यावर करण्यात आलेला हल्ला त्यांचा ठार मारण्यासाठीच करण्यात आला होता, अशी माहिती सहकारनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे.

केंद्राचे ‘नॅचरोपॅथी’चे पहिले मेडिकल कॉलेज पुण्यात

$
0
0
महात्मा गांधींजीनी निसर्गोपचारावर (नॅचरोपॅथी) अधिक भर दिल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारचे देशातील नॅचरोपॅथीचे पहिले मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर पुण्यात स्थापन करण्यात येणार आहे.

संजय दत्तविरोधात येरवडा जेलबाहेर निदर्शने

$
0
0
‘संजय दत्तला दिलेला न्याय सर्वसामान्य कैद्यांनाही लावा,’ अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी शनिवारी येरवडा जेलबाहेर निदर्शने केली. दरम्यान, संजय दत्तला दिलेली सुट्टी ही नियमानुसारच असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

३ दिवसांत आरोपी ‘ट्रान्स्फर’ होणार?

$
0
0
मुंब्रा पोलिसांनी पकडलेल्या चौर आरोपींपैकी दोघांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात ट्रान्सफर केले जाण्याची शक्यता आहे. सध्या हे आरोपी दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यांची कोठडी सोमवारी संपत असून, त्यानंतर त्यांना ‘ट्रान्स्फर’ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पायगुडेंमुळे तरी मनसेत एकवाक्यता येणार का?

$
0
0
गेल्या काही दिवसांमध्ये मनसेमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या नियुक्तीवरून जोरदार वादंग पेटले आणि पक्षाच्या शहर कार्यालयातही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘तू तू मै मै’ झाली. त्यानंतर एका गटाने राज ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या, त्यानंतर ठाकरे यांनी शहर पदाधिकाऱ्यांनी बोलावून घेऊन सर्वांचीच कानउघाडणी केली होती.

तुमच्याकडे बघू का?

$
0
0
खासदार सुरेश कलमाडी यांनी झोपडपट्टीवासीयांच्या मोर्चाची तयारी करण्यासाठी शनिवारी येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी त्यांना थेट आव्हान दिले. या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमध्ये मानकरांनी दिलेल्या आव्हानामुळे वातावरण चांगलेच गंभीर झाले.

२० लाख नागरिकांना अन्नसुरक्षा

$
0
0
राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख कुटुंबे, म्हणजेच जवळपास वीस लाख नागरिकांना अन्नसुरक्षा कायद्याचा लाभ होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images