Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पोलिसांना हवा तपासासाठी वेळ’

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास व्यापक असल्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ द्यायला हवा. महाराष्ट्र पोलिसांसाठी या गुन्ह्याचा तपास प्रतिष्ठेचा झाला असून, पोलिसांवर टीका होत असली तरी मनोधैर्य कमी न होऊ देता काम करावे लागणार आहे, असे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले.

उर्वरित टर्मही हडपसरकडेच

$
0
0
महापौर वैशाली बनकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या महापौरपदाची संधी पुन्हा हडपसरकडेच ठेवून ‘राष्ट्रवादी’ने मुंढव्यातील नगरसेविका चंचला कोद्रे यांना शनिवारी उमेदवारी दिली.

मंडळांचा कल देखावा भाड्याने घेण्याकडे

$
0
0
उत्तराखंडच्या आपत्तीत प्राणांची बाजी लावून जवानांनी केलेली मदत, अंधश्रद्धा निर्मूलन या अलिकडच्या घडामोडींसह बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत गाजवलेला पराक्रम गणेशोत्सवातील आकर्षण ठरणार आहे.

प्रशासनामुळेच यार्डातील वाहतुकीची कोंडी

$
0
0
मार्केट यार्डमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात आतापर्यंत अनेकदा बाजारसमितीच्या बैठकीत निर्णय झाले असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे समोर आले आहे.

भाजीपाला आवाक्यात

$
0
0
पावसाच्या विश्रांतीमुळे भाजीपाल्याचे दर ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. बाजारपेठेत कांदा, काकडी, कोबी, तोंडली, गाजर आणि मटारच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अनुसूचित जाती आयोग @ एक 'क्लिक'

$
0
0
अनुसूचित जातींना मिळालेले घटनात्मक अधिकार, त्यांना मिळालेल्या सवलती, विविध कल्याणकारी योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कार्य याची मराठीतून माहिती नागरिकांना एका वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे.

मंदी हटविण्यासाठी उपाय राबवा

$
0
0
औद्योगिक आणि आर्थिक मंदी हटविण्यासाठी रिझर्व्ह बँक तसेच केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅन्ड अॅग्रीकल्चरने केली आहे.

‘पीएमपी’च्या धडकेने एकाचा मृत्यू

$
0
0
पीएमपी बसने मागून जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाला. अर्जुन भीमराव सुतार (वय ४०, रा. डांगे चौक, ताथवडे) असे मृताचे नाव आहे.

आरोग्य विमाधारकांनो सावधान

$
0
0
सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्यांनी एकत्र येऊन ‘कॅशलेस’ विमा पॉलिसीच्या संदर्भात नवे धोरण लागू केले आहे. या नव्या धोरणामुळे सामान्य विमेदार मात्र भरडला जाणार आहे.

अनाथालयात अभ्यासकांना सशुल्क प्रवेश

$
0
0
विविध आजाराने जर्जर अथवा मानवीवस्तीत अपघातात सापडलेल्या वन्यप्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या अनाथालयात अभ्यासकांनाही आता प्रवेश मिळणार आहे.

मूर्तींच्या नूतनीकरणाला जोरदार मागणी

$
0
0
गणेशमूर्तींच्या कारखान्यात नव्या मूर्ती घडवण्याची धावपळ सुरू असतानाच आता मूर्तींच्या नूतनीकरणाची मागणीही वाढू लागली आहे.

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

$
0
0
घरफोड्या करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ३५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ५४ तोळे सोने, दोन किलो चांदी असे मिळून एकूण १६ लाख ८७,९०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

अधीक्षकाला १ वर्षाची सक्तमजुरी

$
0
0
सेवाशुल्काचे नऊ लाख रूपये परत देण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी उत्पादनशुल्क विभागाच्या अधीक्षकाला एक वर्षे सक्तमजुरी आणि ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पतीला ठार मारणा-या पत्नीला जन्मठेप

$
0
0
चारित्र्यांच्या संशयावरुन सतत त्रास देणाऱ्या दारूड्या पतीच्या छळाला कंटाळून त्याच्या डोक्यात लाकडी दांडका घालून खून केल्याप्रकरणी पत्नीला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पत्नीला मारण्याचा प्रयत्न : पतीला सक्तमजुरी

$
0
0
घरगुती भांडणातून शिक्षिका असलेल्या पत्नीवर पिस्तुलातून गोळी झाडून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला आठ वर्षे सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

स्टेशनवरील भुरट्यांवर पाळत

$
0
0
खिसे कापणारे, बॅग पळविणारे आणि मोबाईल लांबविणा-या पुणे रेल्वे स्टेशनवरील भुरट्या चोरांवर पोलिस आता रात्री पाळत ठेवणार आहेत.

‘न्याहारी निवास’ची कोटींची उड्डाणे

$
0
0
पर्यटनस्थळांवर सिमेंटचे जंगल उभारण्याऐवजी गावकऱ्यांनाच पर्यटकांच्या पाहुणाचाराची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन मंडळाने सुरू केलेल्या न्याहारी निवास योजनेची सध्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे.

‘मातंग’ आरक्षणास हरकत नाही

$
0
0
‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आपली काहीही हरकत नाही,’ अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी घेतली आहे.

एफसी रोडवरील ‘नो पार्किंग’ कायम

$
0
0
कर्मचाऱ्यांअभावी दुर्लक्ष झालेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एकेरी पार्किंगच्या चोख अमंलबजावणीसाठी वाहतूक पोलिस रविवारी पुन्हा सरसावले.

कामाची वेळ सहा तास करा

$
0
0
कामगारांची संख्या वाढत असताना सर्वांच्या हाताला काम मिळण्यासाठी कारखान्यांमधील कामाची वेळ आठ तासांऐवजी सहा तास करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images