Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची ‘शाळा’

$
0
0
पालिकेचा कारभार पाहणारी ‘सर्वसाधारण सभा’ (जीबी) सर्वोच्च असून, पालिका आयुक्त हे सर्वसाधारण सभेचे एक सदस्य असतात. सभागृहात सदस्य चर्चा करत असतील, तर पालिका आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याची तयारी ठेवावी.

‘एनए’ परवानगी रद्द करा

$
0
0
शहरांलगतच्या भागांत मोठ्या प्रमाणावर होणारी बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी बिगरशेती परवानगीची (एनए) संकल्पना रद्द करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महसूल खात्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीने राज्य सरकारला केली आहे.

औषधविक्रीचे ‘बिल’ बंधनकारक

$
0
0
कोणत्याही औषध दुकानात औषधाची विक्री केल्यानंतर आता फार्मसिस्टने ग्राहक, पेशंटला औषध खरेदीचे बील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दाभोलकर हत्या: संशयितांची चौकशी

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पुणे, मुंबई पोलिसांबरोबरच दहशतवाद विरोधी पथकानेही कसून चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघा संशयितांना शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान घटनास्थळी नेऊन त्यांच्याकडे चौकशी केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

'साधना'च्या संपादकांना धमकीचे पत्र

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांप्रमाणेच आता त्यांच्या उत्तराधिका-यालाही धमकीच्या पत्रांना सामोरे जावे लागत आहे. दाभोलकरांच्या हत्येला आठवडा उलटतो तोच ‘साधना’च्या कार्यालयात धमकीवजा पत्र धडकले आहे.

‘PMPML’चे विभाजन करा

$
0
0
दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी ‘पीएमपीएमएल’ला देऊनही नागरिकांच्या अडचणी सुटण्याऐवजी त्यामध्ये भरच पडली आहे.

हत्येचा तपास न लागणे नामुष्की!

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीच्या तपासात कोणता राजकीय हस्तक्षेप होत नसूनही पुणे पोलिसांना कोणते धागेदोरे न सापडणे हे नामुष्कीजनक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

‘राज’शब्दाचा आवाज पुण्यात क्षीण

$
0
0
राज शब्दाचा दरारा दाखवून उभ्या महाराष्ट्रात जाब विचारणारे राज ठाकरे पुणे महापालिकेच्या कारभाराबाबत मात्र अन्य पक्षांप्रमाणेच ‘अळीमिळी’चा पवित्रा घेत आहेत.

'तुकडेबंदी कायदाही रद्द करा'

$
0
0
'शहरालगतच्या भागांत होणारी बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी तुकडेबंदी कायदा रद्द करावा आणि एक आर क्षेत्राच्या नोंदी प्रमाणभूत कराव्यात,' अशी शिफारसही स्वाधीन क्षत्रिय समितीने केली आहे.

बी. एड. साठी दुसऱ्यांदा सीईटी ?

$
0
0
राज्यभरातील बी.एड. अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी यंदा दुसऱ्यांदा प्रवेश परीक्षा होण्याची शक्यता आहे. रिक्त जागांची समस्या सोडविण्यासाठी बी.एड. कॉलेजांकडून सीईटीसह अन्य पर्याय सूचविणारे प्रस्ताव उच्चशिक्षण संचालनालयाकडे सादर झाले असून त्यामुळे दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचा प्रस्तावावर संचालनालय गांभीर्याने विचार करीत आहे.

‘अण्णा हजारेंना द्या झेड प्लस सुरक्षा’

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, अशी मागणी हजारे यांचे वकील अॅड. ​मिलिंद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

डीपीतील रखडलेले भूसंपादन लवकरच मार्गी

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) रखडलेली पन्नासहून अधिक भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अतिरिक्त चारचाकी वाहने ‘PMP’ला द्या

$
0
0
पुणे महानगरप‌ालिकेकडे अतिरिक्त असलेली चारचाकी वाहने पीएमपीएमएलला वापरण्यासाठी देण्यात यावी, असा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला आहे.

‘बोगस आदिवासींना संरक्षण देणारा कायदा रद्द करा’

$
0
0
बोगस आदिवासींना संरक्षण देणारा १९९५ चा कायदा रद्द करा, आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागण्या करत आदिवासी महासंघ आणि संयुक्त कृती समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

बहिःस्थ अभ्यासक्रम सुरूच, पण...

$
0
0
‘एक्स्टर्नल टू एक्स्टर्नल अॅडमिशन’ म्हणत पुणे विद्यापीठाने बहिःस्थ अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर वर्गांसाठी नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचाच निर्णय शनिवारी अंतिमतः घेतला.

उलगडणार आद्य क्रांतिवीरांची गाथा

$
0
0
आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांच्या पराक्रमाची गाथा हेरिटेज वॉक या उपक्रमात उलगडणार आहे. रविवारी (ता.१) सायंकाळी चार वाजता मामलेदार कचेरी येथे हा वॉक होणार आहे.

राज ठाकरे यांचा तरुणांना 'डोस'

$
0
0
महाराष्ट्राचे ‘डिझाइन’ करण्यासाठी तरुणांनी नुसतेच राज्यकर्त्यांना शिव्या देण्यापेक्षा या कामात स्वतः सहभागी व्हावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली.

नानांच्या नंतर आता मामा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्द पाळला.

उपमहापौर ठरणार १० सप्टेंबरला?

$
0
0
महापौरांपाठोपाठ उपमहापौर दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदाची निवडणूक येत्या १० सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

बिघाडी की ‘अंडरस्टँडिंग’?

$
0
0
महापालिकेतील सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’चा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने ‘राष्ट्रवादी’च्याच विरोधात उमेदवार उभा केल्याने शनिवारी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images