Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तुकोबांच्या पालखीचे इंदापुरात स्वागत

$
0
0
जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी पहाटे सहा वाजता निमगाव केतकी येथून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. विठुरायाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. वाटेत तीन विसावे घेऊन दुपारी साडेअकरा वाजता पालखी इंदापूरला पोहोचली.

ना एलबीटी, ना व्हॅट

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) सुधारण्याचे प्रस्तावित मुद्दे सरकारने नियमात समाविष्ट करावेत, या मागणीसाठी 'फॅम'ने (फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) १५ आणि १६ जुलैला पुकारलेल्या बंदला पिंपरी-चिंचवड विभागाने पाठिंबा दर्शविला आहे.

१४ कोटींच्या वर्गीकरण प्रस्तावांना 'स्थायी'त मंजुरी

$
0
0
प्रभागातील प्रलंबित कामे करण्यासाठी सभासदांनी दिलेल्या १४ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. वर्गीकरणासाठी २२ कोटी २७ लाख रुपयांचे तब्बल ५२ प्रस्ताव सभासदांनी जुलै महिन्याच्या कार्यपत्रिकेवर दिले होते.

अशांत पुणे... असुरक्षित पुणे!

$
0
0
पुण्याची सुरक्षितता आणि वाहतुकीचा प्रश्न या प्रमुख समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी आश्वासनांचा पाऊस पडत असला तरी त्यात तसुभरही फरक पडलेला नाही.

आंतरजातीय विवाहामु‍ळे वाळीत टाकल्याची घटना

$
0
0
आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीकडून वाळीत (ओळबा) टाकल्याचा प्रकार पुण्यातील 'राजस्थान श्री गौड ब्राह्मण' समाजात घडला आहे.

पाच पत्नींच्या मदतीने चोऱ्या करणाऱ्याला शिक्षा

$
0
0
रेल्वेतील प्रवाशांना लुटणाऱ्या एका चोरट्याला रेल्वे कोर्टाने पाच महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, तो त्याच्या पाच पत्नींच्या मदतीने रेल्वेत चोऱ्या करत होता.

गणेशोत्सव स्पर्धेच्या निकालाचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत

$
0
0
महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर करावा की नाही, याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात येईल, असे महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले.

राठोडचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

$
0
0
कात्रज डोंगरावर किसन राठोड याने केलेले सुमारे आठ हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम महसूल प्रशासनाने गुरुवारी सकाळी कारवाई करून जमीनदोस्त केले.

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
वडगाव धायरी येथील पुलावर बुधवारी सकाळी कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. दत्तवाडी पोलिसांनी कंटेनर चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तमभारती दीपभारती गोस्वामी (वय ४०, रा. दत्तनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नियोजन समिती येणार ट्रॅकवर

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडा वेळेत व्हावा, यासाठीच सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने, नियोजन समितीमधील सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगितले.

माधवराव चौकशी चौकशी समितीत नको

$
0
0
बेजबाबदार वक्तव्ये करून शेती व शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेणारे माधवराव चितळे यांना सिंचन घोटाळ्याच्या विशेष चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचातर्फे गुरुवारी करण्यात आली.

पानशेतच्या दुर्दैवी घटनेला आज ५२ वर्षे पूर्ण

$
0
0
पानशेतच्या पूरग्रस्तांना मालकीच्या जागा मिळाव्यात, प्रॉपर्टी कार्डवर त्यांचे नाव लावावे, वाढीव बांधकामे नियमित करावीत, आदी मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पूरग्रस्त वसाहतीतील नागरिक लढा देत आहेत.

मिरवणुकीत गर्दी टाळण्यासाठी बदलणार मार्ग

$
0
0
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवर वाजवण्याची संधी मिळवण्यासाठी ढोलपथकांमध्ये दर वर्षीच चढाओढ असते. पुणेकरांची लक्ष्मी रोडवर होणारी गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी आता ढोलपथकांनीच मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

देशमुख कुटूंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0
आमदार विनायक निम्हण यांनी निवृत्त विंग कमांडर अरुण देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस दखल घेत नसल्याची तक्रार कुटूंबीयांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडेच केली.

रविवारी ठरणार साहित्य संमेलनाचे स्थळ

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती शनिवारी (१३ जुलै) सासवड आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही स्थळांना औपचारिकरीत्या भेट देणार आहे.

महिला आरोपी पसार

$
0
0
शिक्षा लागलेल्या महिला आरोपीस पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यासह मुंढवा येथील शासकीय​ निरीक्षण गृहातील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीसाठी गेलेल्या फौजदारास कोंडले

$
0
0
निनावी अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या खडकी पोलिस ठाण्याचे फौजदारास कोंडून ठेवल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी फौजदार एल. के. भुतांबरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रविवारी सुंबरान साहित्य संमेलन

$
0
0
भटक्या विमुक्त समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुंबरान साहित्य परिषदेतर्फे पहिले सुंबरान साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

नदीपात्रातील रस्त्याचा मार्ग मोकळा

$
0
0
नदीपात्रालगत पालिकेतर्फे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठवून, काही अटी-शर्तींवर रस्ता पूर्ण करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरुवारी परवानगी दिली आहे.

पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ

$
0
0
मुस्लिम बांधवांत सर्वांत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानला गुरुवारपासून सुरुवात झाली. रमजान महिन्याचा पहिला उपवास शहारातील सर्व मशिदींमधून गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आला. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी विविध खाद्यपदार्थांचे सेवन केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images