Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोन नगरसेवकांवरच कारवाई करा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केवळ दोन नगरसेवकांनीच केली असल्याचा दावा करून त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

चाकणचा विमानतळ होणारचः CM

$
0
0
चाकणलगतच्या राजगुरुनगर विमानतळाच्या उभारणीबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. राजगुरुनगरचा विमानतळ होणारच असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

जुलाब, उलट्यांचे पेशंट वाढले

$
0
0
बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्यापेक्षा दूषित पाणी, विषाणू आणि शिळे अन्न खाल्ल्याने जुलाब, उलट्याच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी जाणाऱ्या पेशंटची संख्या वाढली आहे.

तपास यंत्रणांसाठी जुलै धास्तीचाच

$
0
0
घातपाती कारवायांसाठी दहशतवाद्यांकडून जुलै महिन्याला अधिक पसंती मिळत असल्याने पुणे, मुंबईसह विविध शहरांमधील पोलिस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जनजागरण मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.

भावा, गावात पाऊस हाय का?

$
0
0
माउली ज्ञानेश्वरावर विश्वास ठेवून आळंदीपासून पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला. फलटणचे दोन मुक्काम आटोपून बरडकडे मार्गक्रमण करत असताना, गुरुवारी रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली.

थेरगाव येथे अतिक्रमणविरोधी कारवाई

$
0
0
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने थेरगाव येथे शुक्रवारी (१२ जुलै) केलेल्या कारवाईत सुमारे पाच हजार चौरस फुटाच्या बांधकामाची तीन मजली इमारत आणि सहा गाळ्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली.

पुण्यातही जातपंचायतीचे अस्तित्व

$
0
0
आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीकडून वाळीत (ओळबा) टाकल्याचा प्रकार पुण्यातील 'राजस्थान श्री गौड ब्राम्हण' समाजात घडला आहे.

पुनर्परीक्षा ५ सप्टेंबरपासून सुरू

$
0
0
दहावी आणि बारावीच्या पुनर्परीक्षार्थींसाठीची लेखी परीक्षा २५ सप्टेंबरला सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

वाढीव मागणीचा आराखडा जलसंपदाकडे सादर

$
0
0
पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे शहरासाठी ३४१ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) वाढीव पाण्याचा आराखडा जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

मुलींवर अत्याचार करणा-याला ताब्यात घ्या

$
0
0
वडमुखवाडीतील पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून फरार असलेल्या आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या संदर्भात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी निवेदन दिले आहे.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी 'लाडकी लेक'

$
0
0
मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याबरोबरच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत 'लाडकी लेक दत्तक योजना' राबविण्यास महिला बाल कल्याण समितीने शुक्रवारी मान्यता दिली. या योजनेसाठी पालिकेच्या बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मर्जीतील व्यक्तींनी पक्षवाढीसाठी काय केले?

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाच्या राजीनाम्यावरून सुरू झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षात वैयक्तिक स्वार्थासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी खिरापतीसारखी पदे वाटली.

राठोडच्या जमिनीचा १३ ऑगस्टला लिलाव

$
0
0
शिंदेवाडी येथील डोंगर विनापरवानगी फोडल्याप्रकरणी ५६ लाख रुपयांची दंडात्मक रॉयल्टी न भरल्याने किसन राठोड याच्या जमिनीचा १३ ऑगस्ट रोजी लिलाव केला जाणार आहे. राठोडच्या पाच एकर जमिनीची किमान बोली ६१ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

कोथरूडमध्ये तरुणावर कोयत्याने वार

$
0
0
एरंडवणा येथील भुयारी मार्गात गुरुवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा घडला आहे.

प्रा. डॉ. विवेकानंद फडके यांचे निधन

$
0
0
ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ता; तसेच इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. विवेकानंद उर्फ भाई दत्तात्रय फडके (वय ५७) यांचे यकृताच्या आजाराने नुकतेच निधन झाले. डॉ. फडके हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.

गरज असेल तेव्हा नदी रस्त्याची पुर्नआखणी करा

$
0
0
नदीपात्राच्या परिसरात रस्ता करण्यास महापालिकेने परवानगी दिली असली तरी या नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल, अशी भागातील रस्त्यांची पुनर्आखणी करावी, गरज असेल तिथे एलिव्हेटड रस्ता करा, पण नदीला धोका पोहोचेल असे काहीही करू नका, असा आदेश हरित लवादाने पुणे महापालिकेला दिला आहे.

नोकरीच्या अमिषाने फसवणूक

$
0
0
बार्शी येथील नगरपालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने ६४ हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी पिता-पुत्रांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनय लोंढे (२९, सिंहगड रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आषाढी वारीनिमित्त स्पेशल ट्रेन

$
0
0
मध्य रेल्वेच्या वतीने आषाढी वारीसाठी दौंड ते पंढरपूरच्या दरम्यान दोन ट्रेन धावणार आहेत. या वारी स्पेशल ट्रेन १७ जुलै (बुधवार) ते २३ जुलै (मंगळवार) या कालावधीत दौंड-पंढरपूर-दौंड अशा फेऱ्या करणार असल्याची माहिती दौंड रेल्वे स्थानक व्यवस्थापक आर. बी. सिंग यांनी दिली.

'वळवण व्हॅली' : बिल्डरवर गुन्हा दाखल

$
0
0
लोणावळ्यातील २९४ एकर सरकारी जमिनीवर 'वळवण व्हॅली' नावाने प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याप्रकरणी बिल्डर खुर्शीद सैफुद्दीन बोहरीसह ११ जणांवर लोणावळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्वासनानंतर वारक-यांचे आंदोलन मागे

$
0
0
जादूटोणा विधेयक विधीमंडळात मांडण्यापूर्वी वारकऱ्यांना विश्वासात घेण्यात येईल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images