Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांनाही देणार 'स्मार्ट कार्ड'

$
0
0
कार आणि टू-व्हीलरपाठोपाठ प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) आता 'स्मार्ट कार्ड' स्वरूपात मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव 'आरटीओ'ने केंद सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून, पुढील सहा महिन्यांत पुण्यात ही योजना अमलात येण्याची शक्यता आहे.

फाळके नव्हे, तोरणे भारतीय सिनेमाचे 'दादा'

$
0
0
'भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे जनक दादासाहेब फाळके नसून, रामचंद गोपाळ उर्फ दादासाहेब तोरणे आहेत. याबाबत गेली अनेक वर्ष पाठपुरावा करूनही सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. कोर्टाच्या माध्यमातूनच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आता जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे,' असा इशारा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे (इम्पा) संचालक विकास पाटील यांनी दिला.

खुनातील आरोपीचा चॉपरने वार करून खून

$
0
0
खूनप्रकरणी जामिनावर सुटलेल्या एका आरोपीचा कोंढवा परिसरात चॉपरने वार करून खून करण्यात आला. इस्माईल शरीफ शेख उर्फ भैया (वय २८) असे खून झालेल्याचे नाव आहे. हल्लेखोरांच्या हल्ल्यात एका महिलेसह दोन जण जखमी झाले आहेत.

आज संध्याकाळी शहरात पाणी नाही

$
0
0
जलशुद्धिकरण केंद आणि रावेत पंप हाऊसमधील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (तीन मे) सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, शुक्रवारी (चार मे) शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

'एमपीएससी' वेळेतच होणार

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे (एमपीएससी) वर्ष २०१२ मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

...अन् हाती घ्या अभ्यासाचे दप्तर

$
0
0
घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्यांनी स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या लढ्याचे क्षितिज आता आणखी रुंदावणार आहे. 'खांद्यावरील प्लॅस्टिकचे पोते बाजूला सारा अन् अभ्यासाचे दप्तर हाती घ्या', हा संदेश देत बालकामगारांना या अस्वच्छ कामापासून दूर ठेवण्याचा निर्धार रविवारी करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी

$
0
0
विदर्भ, मराठवाडा उन्हाच्या चटक्याने भाजून निघत असताना, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सध्या उन्हाची तीव्रता कमी आहे. येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागांत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

'एनडीए'त फडकला तिरंगा

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) कॅडेट मेसच्या आवारात १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आहे. संस्थेतील छात्रांना देशप्रेम, बलिदान आणि पराक्रमाची ग्वाही देणा-या तिरंग्याची संस्थेत शनिवारी कायमस्वरूपी स्थापना करण्यात आली.

'शिका-कमवा' ही काळाची गरज

$
0
0
'यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारी 'शिका व कमवा योजना' ही प्रभावी उपक्रम असून, ती आजच्या काळाची गरज आहे,' असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

अर्भक, माता मृत्यू रोखण्यासाठी 'पारु'

$
0
0
नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन, मातेचे आरोग्य अधिक सुरक्षित रहावे, यासाठी जिल्हा परिषदेने 'पाहुणी रुग्णालय' (पारु) योजना सुरू केली आहे. या योजनेत नवजात बालकांच्या आणि मातेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रशिक्षण एका महिलेला देण्यात येत आहे. ही महिला व्यावसायिक किंवा त्या महिलेच्या नातेवाईकांपैकीही असू शकते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वेडसर व्यक्ती ठार

$
0
0
वाकड जकात नाक्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वेडसर व्यक्ती ठार झाली. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...अन् मिळाली भरारी घेण्याची प्रेरणा

$
0
0
आपल्या सभोवतालचे जग विरोधाभासांनी भरले आहे. हाता-पायांनी धडधाकट असूनही चुकीच्या मार्गाने जाणारी मुले एका बाजूला... अन् विधात्याने केवळ एकच पाय देऊनही त्याच पायाच्या बोटांनी त्याचेच रूप साकारणारा दुस-या बाजूला.

कारचे यांची एक तासात पुन्हा बदली

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर विशेष मर्जी दाखवून त्यांना हव्या त्या ठिकाणी चार्ज देण्याचा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. सहायक आयुक्त अजिज कारचे यांच्याबाबतीत हा प्रकार घडल्याने स्थानिक अधिकारी वर्गात नाराजी पसरली आहे.

वसंत व्याख्यानमालेत उद्या पवार

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अनेक वर्षांनंतर यांचे पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान होणार आहे. या व्यासपीठावरील पवार यांचे व्याख्यान झाले की काही तरी राजकीय उलथापालथ होते, असा इतिहास आहे. त्या इतिहासाची यंदा पुनरावृत्ती होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तीन मुलींसह आईची आत्महत्या

$
0
0
सोलापुरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील कोनापुरे चाळीत राहणाऱ्या सुहासिनी अंजन जगले (२२) या महिलेने तिच्या लहानग्या तीन मुलींसह बुधवारी पहाटे आत्महत्या केली. या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

अजूनही बेजबाबदार आणि बेदरकार....

$
0
0
भीषण अपघातानंतरही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील बेजबाबदार आणि बेदरकार वृत्तीच्या वाहनचालकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. या परिसरातील ३५ ते ४८ किलोमीटरच्या अंतरावर सरासरी प्रत्येक किलोमीटरवर एक वाहन महामार्गावर दुरुस्तीच्या कारणास्तव उभे असल्याचे आढळून आले.

सीना- कोळेगावमधून सोलापूरला सोडलेले पाणी बंद

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव धरणातून सीना नदीत सोडलेले पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्याच्या आदेशाचा भंग करत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे पाणी वीजपंप लावून शेतीसाठी वापरल्याचे उघडकीस आल्याने हे पाणी बंद करण्याचा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिला.

एक्स्प्रेस वे देखभालीबाबत काहीही उपाययोजना नाहीत

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर देखभाल आणि सुरक्षतेच्या दृष्टीने संबधित ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळ कोणतीही उपाययोजन करत नाही. राज्य सरकारने या प्रश्नामध्ये लक्ष घालून तत्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार विनायक निम्हण यांनी दिला आहे.

कर्वेनगरात घरफोडी

$
0
0
घरात कोणी नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करूत ८० हजांरांचा ऐवज लुटल्याची घटना कवेर्नगरमध्ये रविवारी रात्री घडली. या प्रकरणी मोहन रानडे (रा. शनिवार पेठ) यांनी वारजे पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'एक्स्प्रेस वे'वर पेट्रोलिंग वाढवणार

$
0
0
एक्स्प्रेस वेवरील वाहनांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यावरील पेट्रोलिंग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील सूचना संबधितांना लवकरच देण्यात येणार असल्याचे पुणे विभागाचे महामार्ग पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>