Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संगीत महोत्सवात 'आयपीएल तुकडा'

$
0
0
पंडित अनिंदो आणि अनुब्रतो चटर्जी यांनी सादर केलेल्या तुकडा, कायदा, गत, चक्रधर पढंत आणि तोडा यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. हे वातावरण होते, ते उस्ताद अल्लारखाँ जयंती संगीत समारोहातील.

वॉटरमीटरबाबत कठोर निर्णय घ्या

$
0
0
'अजून किती दिवस अभ्यास करायचा, असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित करीत आयुक्त मीटरबद्दल कठोर निर्णय घ्या,' अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी पाठक यांना दिल्या

खासगी बसची भाडेवाढ

$
0
0
उन्हाळी सुट्यांचा मुहूर्त साधत खासगी ऑपरेटरनी बस भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटामागे २५ ते ३० टक्के जादा रक्कम मोजून प्रवास करावा लागत आहे. या ऑपरेटरनी मनमानी भाडे आकारू नये, असा आदेश मुंबई हायकोर्टाने देऊनही त्याचे पालन होत नसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.

गीतरामायणाची कूळकथा आता पुस्तकरूपात

$
0
0
गेली अनेक वर्षे रसिकमनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गीतरामायणाचे पैलू आता पुस्तकरुपात उलगडणार आहेत. गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'गीतरामायणाचे रामायण' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ७ मे रोजी होणार आहे.

शिक्षण मंडळासाठी रस्सीखेच

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांमुळे चुरस निर्माण झाली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत सदस्यत्वासाठी रस्सीखेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखेर एसटी प्रशासनाचे नमते

$
0
0
नाशिक-पुणे या मार्गावरील एसटी बसच्या चालकांना कराव्या लागणा-या 'रिटर्न ड्युटी' विरोधातील कर्मचा-यांच्या संतापापुढे एसटी प्रशासन झुकले आहे. ही रिटर्न ड्युटी येत्या एक मे पासून बंद होणार आहे.

स्वीकृत सदस्यांची आज निवड होणार

$
0
0
शिक्षण मंडळ आणि महापालिकेच्या अन्य समित्यांवरील निवड पार पडल्यानंतर सोमवारी महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. मागील दाराने महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील बड्या बड्या नेत्यांनी फील्डिंग लावली आहे.

स्वच्छ पुण्यासाठी एकत्र या

$
0
0
'कोणत्याही उपक्रमाची सुरुवात उत्साहात होते, पण त्याचे सातत्य टिकणे आवश्यक असते. 'स्वच्छ आणि सुंदर पुणे' बनवण्यासाठी महापालिकेने सुरू केलेले स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे,' असे विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

'बीएसएनएल'च करते आहे 'रिमाइंडर कॉल'

$
0
0
'तुमचे टेलिफोन बिल तुम्हाला मिळाले का? ते भरण्याची अंतिम तारीख अमुक आहे... लक्षात आहे ना!' तुम्हाला तुमच्या लँडलाइनवर समजा असा ध्वनिमुदित कॉल आला, तर तो तुमच्या मित्र-मैत्रिणीने केलेला 'प्रँक कॉल' नसेल, तर मैत्रीच्या नात्याने बीएसएनएलनेच केलेला बिल भरण्यासाठीचा 'रिमाइंडर कॉल' आहे, हे लक्षात घ्या!

ना दरफलक ना तक्रारीची सोय

$
0
0
एसटी बसने सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी स्टँडवर फिरणाऱ्या विक्रेत्यांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दराने खाद्य पदार्थाची खरेदी करावी लागत असल्याचे समोर आले आहे. खाद्यपदार्थाचे दर काय आहेत, याची माहिती देणारे फलक एसटी प्रशासनाने बसस्थानकावर लावणे अपेक्षित आहे.

कोट्यासाठी हवेत किमान १०० गुण

$
0
0
ऑल इंडिया इंजिनीअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन अर्थात 'एआयईईई'मध्ये किमान ३० टक्के गुण मिळाले, तरच यंदा देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीमधील (एनआयटी) प्रवेश नक्की होईल, असा अंदाज आहे.

शास्त्रज्ञ शोधताहेत पृथ्वीबाहेरील जीवसृष्टी

$
0
0
पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का प्रश्नाभोवतीचे गूढ अद्याप कायम असले, तरी भारतीय शास्त्रज्ञांचे या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू आहेत. 'इस्त्रो'च्या सहकार्याने यापूर्वी झालेल्या प्रयोगांमध्ये सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. त्यांच्या विश्लेषणाचे काम सुरू आहे, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी दिली.

जगन्नाथ रथयात्रेत भाविकांचा मोठा सहभाग

$
0
0
'हरे रामा, हरे कृष्णा'चा गजर करीत 'इस्कॉन'तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बाबा आढाव यांना आधारवड पुरस्कार

$
0
0
प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा आधारवड पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना उद्या, गुरुवारी प्रदान करण्यात येणार आहेत.

'नेट' अर्जांसाठी शुक्रवारपर्यंत मुदत

$
0
0
नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टचा (नेट) अर्ज भरण्याची मुदत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे. 'नेट'चा ऑनलाइन अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कायम असल्याने चार मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विविध क्षेत्रांत इंदापूरचे नाव देशपातळीवर

$
0
0
'दिवंगत शंकरराव पाटील यांनी इंदापूरचे नाव राजकीय क्षेत्राच्या माध्यमांतून देश पातळीवर झळकविले. इंदापूरच्या मातीत जन्माला आलेले अनेक रत्न आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांच्यामुळे इंदापूरच्या लौकिकात भर पडत आहे,' असे गौरवोद्गार सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

बिले न पाठविताच 'लाइन कट'

$
0
0
ग्राहकांना वेळेत बिले न पाठविता उलटपक्षी मुदत उलटून गेल्यानंतर टेलिफोन सेवा खंडित करण्याचा सपाटा बीएसएनएलने सुरू केला आहे. त्यामुळे शहराच्या विविध परिसरातील ग्राहक हैराण झाले आहेत.

शिक्षण दहावी, उद्योग RTGS स्कॅम!

$
0
0
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले आरोपी नेट बँकिंगचा वापर करून लाखो रुपयांना गंडा घालण्याच्या तंत्रात यशस्वी होतात, याचे उदाहरण 'आरटीजीएस'द्वारे झालेल्या फसवणुकीत दिसले आहे. डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी शहरातील चार सोनारांना गंडा घालून त्यांच्याकडील दोन किलो सोने घेऊन पोबारा केला होता.

आयआयटी-जेईईच्या आन्सरशीट आज अपलोड

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी यंदा घेण्यात आलेल्या आयआयटी-जेईई या परीक्षेची 'आन्सर की' गुरुवारी जेईईच्या सर्व वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.

वाळूच्या ट्रकने घेतला रिक्षा प्रवाशाचा बळी

$
0
0
'एनआयबीएम' रोडवरील चढावर वाळूचा ट्रक आणि रिक्षा यांच्यात रविवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात रिक्षामधील प्रवासी ठार झाला, तर त्याच्या पत्नीसह तिघे जखमी झाले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images