Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'नागरवस्ती'च्या योजना ठेकेदारांना पोसण्यासाठी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांसाठी नसून केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (नऊ जुलै) करण्यात आला.

विवाहितेच्या आत्महत्येबद्दल सासू व नणंदेस सक्तमजुरी

$
0
0
विवाहितेचा शारिरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू आणि नणंदेला एक वर्षे सक्तमजुरी आणि २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

'टाइप प्लॅन' घरांना मिळणार तुकडाबंदी कायद्यातून सवलत

$
0
0
ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिबांना स्वप्नातील घर बांधता यावे, यासाठी तयार केलेल्या 'टाइप प्लॅन' घरांना तुकडाबंदी कायद्यातून सूट देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला पाठविला आहे.

आगामी निवडणुकीत ग्राहक पंचायतीचा दबाव गट

$
0
0
राज्यातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दबाव गट म्हणून काम करण्याचा निर्णय ग्राहक पंचायतीने घेतला आहे. तसेच, दबाव गटाचे स्वरूपही ठरविण्यात आले आहे. पंचायतीच्या पुणे महानगर प्रतिनिधींच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.

उपलब्ध सामग्रीतच पोलिसांना शहर सुरक्षित ठेवणे शक्य

$
0
0
'पुणे शहर असुरक्षित झाले आहे, पोलिसांनी आहे त्या साधनसामग्रीचा योग्य पद्धतीने वापर केल्यास शहर सुरक्षित ठेवता येणे शक्य आहे,' असे मत माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्यातर्फे खोपडे यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते.

'माजी नगरसेविकेचे पती दीपा बारमध्ये'

$
0
0
कामशेतमधील दीपा बारमध्ये टाकलेल्या छाप्यात माजी नगरसेविकेचे पती दत्तात्रय टिंगरे (वय ४२, रा. धानोरी) यांना अटक करण्यात आली आहे.

हडपसर येथे खून ; तणावाचे वातावरण

$
0
0
हडपसर येथे पूर्ववैमनस्यातून गोंधळेनगर येथे एका स्थानिक कार्यकर्त्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला. या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. खुनाच्या घटनेनंतर गोंधळेनगर परिसरात तणावाचे वातावरण होते.

तुळापूर, वढू बुद्रुकला कचरा डेपो

$
0
0
तुळापूर व वढू बुद्रुक येथील प्रत्येकी २५ हेक्टर जागा पुण्याच्या कचरा डेपोसाठी अंतिम झाली असून, या जागेचा ताबा महापालिकेला देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी प्रशासनाने सुरू केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी करून कब्जा घेण्याची तयारी दर्शविली आहे.

...तर बचत गटांवर कडक कारवाई

$
0
0
'पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांनी अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) परवाना न घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी,' अशा सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी शिक्षण विभागाला दिल्या.

येत्या तीन-चार दिवसांत पुण्यात जोरदार पाऊस

$
0
0
मागील दोन-तीन दिवसांत पुण्यात पावसाने जोर धरला नसला, तरी येत्या तीन-चार दिवसांत शहरात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील.

अवघ्या १५ रुपयात दाखलपूर्व केस निकाली

$
0
0
कोर्टकचेरीसाठी वारंवार करावे लागणारे अर्ज... तारीख पे तारीख आणि निकालासाठी अनेक वर्षे वाट पाहणे अशा चक्रात न अडकता एका महिला पक्षकाराची दाखलपूर्व केस विमा कंपनीच्या सहकार्याने अवघ्या १५ रुपयांच्या खर्चात निकाली निघाली.

अन्नसुरक्षा विधेयक निवडणुकीमुळेच!

$
0
0
'गेली नऊ वर्षे सत्तेवर असूनही अन्नसुरक्षा विधेयकासाठी टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारने केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच हे विधेयक आणले आहे,' असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रुडी यांनी मंगळवारी केला.

रामदेवबाबांचे 'नमो' नमः

$
0
0
'कॉँग्रेसने केलेली देशाची लूट आणि त्यांच्या खोटारडेपणाचा आगामी लोकसभा निवडणुकीत पर्दाफाश केला जाईल,' असा इशारा देऊन रामदेवबाबांनी भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला.

'दादा' बोला... जबाबदार कोण?

$
0
0
कात्रज येथील शिंदेवाडीसह भोवतालच्या परिसरात झालेल्या बेकायदा बांधकामांना तत्कालीन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा फतवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढला असला, तरी ही जबाबदारी निश्चित करणार तरी कोणत्या निकषांवर?

आयटीआय विद्यार्थ्यांच्या दारी

$
0
0
अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेता यावा, यासाठी आता आयटीआयची यंत्रणाच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

डॉक्टरांनो, अक्षर सुधारा!

$
0
0
डॉक्टरांकडून दुर्बोध अक्षरात लिहिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची दखल 'महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल'ने (एमएमसी) घेतली आहे. स्वच्छ अक्षरात आणि फार्मासिस्टला कळेल अशा प्रकारेच प्रिस्क्रिप्शन लिहून द्यावे, असा आदेशच 'एमएमसी'ने डॉक्टरांना जारी केला आहे.

सकस साहित्याचा श्राव्य आविष्कार

$
0
0
स्नॉवेलतर्फे कथामोकाशी आणि रारंग ढांग या गाजलेल्या साहित्यावर आधारित ऑडिओ शोचं १३ आणि १४ जुलैला आयोजन केलं आहे. प्रायोगिक उपक्रम म्हणून हा कार्यक्रम होणार आहे.

४ पिस्तुलांसह १० काडतुसे जप्त

$
0
0
चंदननगर येथील हॉटेल नवमी येथे पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चार पिस्तुलांसह दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

‘ऑनर किलिंग’ प्रकरणी पित्याला जन्मठेप

$
0
0
‘ऑनर किलिंग’प्रकरणी १७ वर्षीय मुलीचा खून केल्याप्रकरणी वडिलांना जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा शिवाजीनगर जिल्हा कोर्टात बुधवारी सुनावण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अनंत बदर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

अधिका-यांना बदल्यांची प्रतीक्षा

$
0
0
पुण्यातील महसूल खात्याच्या महत्त्वाच्या बदल्या गेल्या काही दिवसांपासून वेटिंगवर ठेवण्यात आल्या असून, मुख्यमंत्री कार्यालयातून बदल्यांच्या फायली हलत नसल्याची चर्चा आहे. कोणत्या पदावर ‘कोणाचा’ अधिकारी नेमायचा यावरून मंत्रालयात जोरदार राजकारण रंगल्याचेही बोलले जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images