Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अन्यथा शाळांवर कारवाई करू

$
0
0
'शालेय वाहतूक समिती' स्थापन न करणाऱ्या शाळांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्याचा पवित्रा शिक्षण विभागाने घेतला आहे. तर, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन अधिकारी अरुण येवला यांनी दिली.

इमारत दुर्घटनेसाठी आता बिल्डर जबाबदार

$
0
0
एखाद्या इमारतीच्या दुर्घटनेबाबत केवळ आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर यांना दोषी न धरता, बांधकाम व्यावसायिकांवर जबाबदारी निश्चित करता यावी, यासाठी त्यांची नोंदणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

खोपोली-लोणावळा लवकरच भुयारी मार्ग

$
0
0
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय ठरणाऱ्या खोपोली ते लोणावळा दरम्यानचा भुयारी मार्ग लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. या भुयारी मार्गाच्या मान्यतेचा प्रस्ताव येत्या पंधरवड्यात मंत्रिमंडळासमोर सादर होणार आहे.

चार दशकांचा न्यायालयीन लढा यशस्वी

$
0
0
साठेखत करून घेतलेल्या घराचा अधिकृत ताबा मिळण्यासाठी एका महिलेने तब्बल ४० वर्षे दिलेला न्यायालयीन लढा अखेर यशस्वी ठरला. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एम. के. जाधव यांच्या कोर्टाने नुकताच चार दशकांच्या या कायदेशीर लढ्याचा निकाल दिला.

मित्रानेच केला मित्राचा खून

$
0
0
देवदर्शनासाठी केलेला खर्च परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने हल्ला करून खून केल्याचा प्रकार टिंगरेनगर येथे रविवारी सायंकाळी घडला.

पालिका शाळांमधील ४० शिक्षक पदे रिक्तच

$
0
0
शिक्षकांच्या मुलाखतीचे निकाल अद्यापही न लागल्याने शाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांपासून वंचित राहावे लागत आहे. पालिकेच्या माध्यमिक शाळांमधील गणित, इंग्रजी, शास्त्र विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची ४० पदे अद्यापही रिक्त आहेत.

तरुणाच्या खून : महिलेसह तिघांना जन्मठेप

$
0
0
कपड्याचा व्यवसाय करण्यासाठी उधारीने दिलेले पैसे मागितले, म्हणून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

५० टॉवर उभारणारी कंपनी 'जाळ्यात'

$
0
0
शहरातील अनधिकृत टॉवर आणि त्यावरील कारवाईचा प्रश्न सध्या पालिकेत चर्चेचा विषय ठरला असतानाच, कोणत्याही परवानगीविना शहरात सुमारे ५० टॉवर उभारणाऱ्या एका कंपनीला करआकारणी विभागाने कराच्या जाळ्यात ओढले आहे.

कामशेतमध्ये बारवर छापा

$
0
0
पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामशेत जवळील दीपा बार अँड रेस्टॉरंटमध्ये टाकलेल्या छाप्यात अश्लील चाळे, नृत्य करणाऱ्या आठ बारबालांसह साठ ग्राहकांना अटक केली.

शालेय पोषण आहारात अनारोग्याचे धडे

$
0
0
महापालिकेतील शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या १७० बचतगटापैकी केवळ १८ बचत गटांनीच अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवाना घेतला आहे.

पालिकेच्या सभागृहाचा 'मेकओव्हर'

$
0
0
शहराच्या राजकारणाचा मानबिंदू असलेल्या महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचा मेकओव्हर करण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर आता नव्या सभागृहाची रचना करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद भक्कम

$
0
0
प्रभाग क्र. ४० (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान) येथील पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी मनसेच्या इंदुमती फुलावरे यांचा ४४९ मतांनी पराभव केला. या विजयामुळे काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राहणार आहे.

बांठिया यांचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0
एका मराठी अभिनेत्रीला फसवून तिच्याबरोबर लग्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पनवेलच्या माजी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा ​जामीन फेटाळला.

ग्रामस्थच बनले कास पठाराचे 'मॅनेजर्स'

$
0
0
जागतिक वारसा स्थळ आणि महाराष्ट्राचे 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठाराचे व्यवस्थापन गावकऱ्यांच्या हाती सोपविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला असून, गेल्या वर्षी जमा झालेल्या ११ लाख रुपयांच्या शुल्कातून स्थानिक विकास साधला जाणार आहे.

१३ बॉम्बपैकी १० फुटले!

$
0
0
बोधगयातील बॉम्बस्फोटाच्या घटनेत गॅस सिलिंडर आणि नायट्रेटचा वापर झाला असून, तिथे पेरलेल्या १३पैकी दहा बॉम्बचा स्फोट झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले.

'वासुदेवा'च्या साथीने रामप्रहरीची वाटचाल

$
0
0
खड्या आवाजात अभंग गाऊन गाव जागविणारा वासुदेव आता लुप्त झाला आहे, अगदी खेड्यांमध्येही वासुदेवाची स्वारी फारशी येईनाशी झाली आहे.

सुमन करंडक होणार 'सिम्बायोसिस करंडक'

$
0
0
फक्त शब्दांच्या जोरावर केल्या जाणाऱ्या 'वाचिक' अभिनयाची कसोटी पाहणारा 'सुमन करंडक' या वर्षापासून आपले रुपडे बदलतो आहे. तिसाव्या वर्षात पदार्पण करत असलेला हा करंडक यंदापासून 'सिम्बायोसिस' करंडक या नावाने ओळखला जाईल.

सभासद व बिगर सभासद एकसमान

$
0
0
'उसाचा दर देताना सभासद व बिगर सभासद शेतकरी असा भेदभाव न करता दोघांनाही एकसमान दर देण्यात यावा,' असे परिपत्रक साखर आयुक्त विजय सिंघल यांनी काढले आहे.

चौधरी पुन्हा माफीचा साक्षीदार होण्यास तयार

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून प्रकरणातील आरोपी राजेश चौधरीने मुख्य आरोपी योगेश राऊत पकडला गेल्यामुळे पुन्हा माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचा अर्ज मंगळवारी कोर्टात दिला. विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या कोर्टात नयना पुजारी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

मुलीवर बलात्कार करणा-या पित्यास अटक

$
0
0
पोटच्या मुलीवर गेल्या दोन वर्षापासून बलात्कार करणाऱ्या पित्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली. मुलीच्या आईनेच पोलिसांमध्ये तक्रार दिली. चिंचवडमध्ये हा प्रकार घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images