Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खडकवासलात दीड टीएमसी पाणी

$
0
0
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या ४८ तासांमध्ये दीड टीएमसी पाणीवाढ झाली आहे. पुणे शहराला दीड महिना पुरेल एवढे हे पाणी आहे.

शिक्रापूरजवळ अपघातात ५ ठार

$
0
0
पोलिस उपअधीक्षकाच्या खासगी गाडीने, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव वेगाने जात असलेल्या जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक विद्यार्थीनी, उपअधीक्षकांची पत्नी, सासरे, ट्रेलरचा चालक आणि क्लिनरचा समावेश आहे.

मनस्तापाचे इंजिनीअरिग

$
0
0
इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मनस्तापाची परीक्षा ठरू पाहते आहे. एकीकडे प्रवेशअर्ज भरूनही राज्य गुणवत्ता यादीत नाव नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची विकेट गेली आहे, तर दुसरीकडे ‘मॉक अॅलॉटमेंट’मध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहितीपुस्तिकाच हातात नसल्याने ‘ऑप्शन फॉर्म’ भरताना ‘क्लीन बोल्ड’ व्हायची वेळ आली आहे.

हा तर संपत्तीचा अपव्यय-CM

$
0
0
‘शहरांची नेमकी गरज लक्षात न घेता मोठ्या प्रमाणावर घरबांधणी सुरू आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. त्यावरील कारवाई म्हणजे संपत्तीचा अपव्ययच आहे’, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केले.

२८ चौकातील सिग्नल बिघाडले

$
0
0
बेभरवशाच्या यंत्रणेमुळे वर्दळीच्या रस्त्यांसह २८ चौकातील सिग्नलव्यवस्थेत झालेला बिघाड, रस्त्यातील खड्डे आणि अनेक ठिकाणी साचलेले पाणी अशा स्थितीत प्रत्येक वाहनचालकाने आपले घोडे पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्याने सोमवारी दिवसभर शहराच्या बहुतेक भागातील रस्ते ‘जॅम’ झाले.

अमिषा खलनायिका

$
0
0
अमिषा पटेल सध्या खूप नकारात्मक विचार करू लागली असल्याचं तिच्या मित्र- मैत्रिणींचं म्हणणं आहे. ती पूर्वीसारखं कुणाशीच साधं- सरळ बोलत नाही. तिचं वागणं एखाद्या खलनायिकेसारखं झालंय...

‘मी स्टार नाही’

$
0
0
वरुण धवनला पदार्पणातच करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मिळाल्यानं त्याचं नशीब फळफळलं. त्याचे येते सिनेमे पाहिल्यास प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा अशी ओळख पुसून तो स्वतंत्र ओळख बनवू पाहातोय.

दिग्गजांची आंधळी-कोशिंबीर

$
0
0
धमाल केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध असणारी अशोक सराफ-वंदना गुप्ते ही दिग्गजांची जोडी ‘आंधळी कोशिंबीर या सिनेमात पुन्हा रसिकांसमोर येत आहे. बऱ्याच काळानंतर छान भूमिका वाट्याला आल्याचं या दोघांनी सांगितलं.

बडे मियाँ छोटे मियाँ

$
0
0
हिंदी सिनेमा हा हिरोच्या स्टारडमवर चालत असल्याचा इतिहास असताना येत्या काही काळात नवे चेहरे मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे, बड्या बॅनरनं त्यांना साइन केलंय.

मालिकांचा ‘ऑनलाइन’ टीआरपी

$
0
0
मालिका, रिअॅलिटी शो यांचा प्रेक्षकवर्ग फक्त टीव्हीपुरताच मर्यादित नाही, तर यू- ट्यूबवर न चुकता हे शोज पाहाणारा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे.

‘त्या’ शाळांना मुख्यमंत्र्यांची तंबी

$
0
0
केंद्राने तयार केलेल्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक आहे. ज्या या कायद्याची अमंलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मतदारयादीमधील फोटोंसाठी रविवारी मोहीम

$
0
0
छायाचित्रांसह मतदारयादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत येत्या रविवारी (२३ जून) विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत मतदारयादीसाठी छायाचित्र जमा करण्यात येणार आहेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी ही माहिती दिली.

शिक्षणापासूनच ‘ती’ अद्याप दूरच !

$
0
0
सर्व शिक्षा अभियान, बाल कामगारविरोधी कायदा एवढंच नव्हे तर मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महत्त्वपूर्ण कायदे अस्तित्त्वात असले तरी ऊस कामारांची मुले या मूलभूत हक्कांपासून आजही उपेक्षित आहेत.

रिक्षाचालकांचा संप मागे

$
0
0
ऑटो रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवल्याने राज्य ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने मुंबईत जाहीर केलेला संप मागे घेण्यात आला आहे.

भुशी डॅममध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

$
0
0
लोणावळ्यातील भुशीडॅममध्ये बुडालेल्या पुण्यातील युवकाचा मृतदेह मंगळवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास सापडला. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर यश आले आहे.

मावळात पुन्हा मुसळधार पाऊस

$
0
0
मावळात एका दिवसाच्या अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळ‌ित झाले आहे. लोणावळ्यात मंगळवारी दहा तासात ११८ मिलीमीटर तर पवनाधरण क्षेत्रात १४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, पवनाधरणाच्या जलसाठ्यात ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुबार मतदारांची नावे वगळणार

$
0
0
एकाच विधानसभा मतदारसंघातील दुबार नावे वगळण्याबरोबरच आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असलेली दुबार नावेही वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस मतदारांची संख्या आणखी कमी होणार आहे.जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

एका जागेसाठी आठ उमेदवार

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पूर्वी निवडणूक लढविणाऱ्या इंदुमती फुलावरे यांनी मनसेची मदत घेतल्याने प्रभाग क्रमांक ४० मधील पोटनिवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. महिला ओबीसीसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी आठ उमेदवारांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरले.

अतिक्रमणांचा पुन्हा विळखा

$
0
0
शहरातील १३७ रस्ते आणि १९ चौकांमधील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे दूर केल्यानंतर यापैकी अनेक ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे झाल्याचे आढळून आले आहे. अशा विविध बाबींची झाडाझडती आज (बुधवारी) गृहखात्याचे अतिरिक्त मुख्यसचिव घेणार आहेत.

दुस-या दिवशीही वाहतुकीला ब्रेक

$
0
0
दुरुस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील सिग्नल व्यवस्थेत बिघाड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग चौथ्या दिवशी बहुतेक भागातील सिग्नल बंद होते. त्यामुळे वाहतूक कोंडी कायम राहून ऐन पावसात सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांचे हाल झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images