Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साक्षीदार पुन्हा तपासण्याची मागणी

$
0
0
नयना पुजारी खून प्रकरणातील आरोपी योगेश राऊतची ओळख पटविण्यासाठी पुन्हा तीन साक्षीदार तपासण्याची मागणी सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आली आहे. योगेश राऊत हा सुनावणी सुरु असताना ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता.

ऑनलाइन तक्रारींची पालिकेकडून दखल नाही

$
0
0
नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी ऑनलाइन आणि एसएमएस सेवा पालिकेने सुरू केली असली, तरी याद्वारे केलेल्या तक्रारींच्या निराकरणाचा प्रतीक्षा काळ वाढतच चालला आहे.

‘लष्करी अधिका-यांना उत्तम वैद्यकीय सेवा देणार’

$
0
0
‘लष्करी अधिकारी आणि जवानांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी देशभरातील सर्व कमांड हॉस्पिटल्सच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे,’ अशी माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मंगळवारी दिली.

छोट्याशा घरातून झेप ९६ टक्क्यांवर

$
0
0
‘मला खूप शिकायचंय. डॉक्टर व्हायचंय. अभ्यास करताना, परिश्रम घेताना मी कुठंही कमी पडणार नाही; पण पैशाअभावी हे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची चिंता आहे. मी हार मानणाऱ्यांतील नाही. आवडी-निवडींना फाटा देऊन पैसे वाचवीन; पण कोणत्याही स्थितीत शिक्षण पूर्ण करणारच..’

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी ‘अंनिस’चे मेळावे

$
0
0
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा राज्यात प्रसार व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे येत्या जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र मेळावे घेण्यात येणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

‘आम्हाला मदत करा’

$
0
0
निसर्गाचे रौद्ररूप काय असते, याची प्रचिती आम्हाला काशीयात्रेत आली आहे. गेल्या चार दिवसांत खायला मिळणे तर दूरच या संकटातून सुटका होते की नाही, एवढी वाईट परिस्थिती आम्ही अनुभवली आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी रस्ते, घरे अगदी माणसेही वाहून जाताना आम्ही पाहिली आहेत.

पुणे होणार ‘सेफ्टी फूड सिटी’

$
0
0
थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलपासून रस्त्यावरील वडापाव, पाणीपुरीच्या स्टॉलवरही तुम्हाला आता स्वच्छ, चवदार असे अन्नपदार्थ चाखण्याची संधी मिळणार आहे. आता पुणे ही देशातील ‌पहिली ‘सेफ्टी फूड सिटी’ म्हणून नावारूपाला येणार आहे.

शहरात पावसाचे ‘कमबॅक’

$
0
0
पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी पुण्यात पावसाने जोरदार कमबॅक केले. शहर व परिसरात दिवसभर अधूनमधून मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्याबरोबरच राज्यात मुंबई, कोकणात दमदार तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

‘परम युवा टू’ ‘सुपर’ कम्प्युटर

$
0
0
‘सी डॅक’ने विकसित केलेला ‘परम युवा टू’ हा सुपर कम्प्युटर ‘सुपर’ असल्याचे सिद्ध झाले आहे. जगातील पहिल्या पाचशे सुपर कम्प्युटरमध्ये ‘परम युवा टू’ने ६९ वे स्थान पटकावले आहे.

चीनशी संबंध सुधारणार

$
0
0
‘भारत आणि चीन अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याने काम करत आहेत. त्याचसोबत लष्करी क्षेत्रातही भारत आणि चीनमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, यासाठी आगामी चीन दौऱ्यात प्रयत्न करेन,’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मंगळवारी केले.

ट्रॅव्हल्सना सतर्कतेचा इशारा

$
0
0
उत्तर भारतात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यात सहलीसाठी जाण्यापूर्वी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधूनच प्रवास निश्चित करावा, असे आवाहन राज्य सरकारने ट्रॅव्हल कंपन्या व पर्यटकांना केले आहे.

एक्स्टर्नल राहणारच

$
0
0
बहिःस्थ (एक्स्टर्नल) प्रवेश बंद करण्याच्या प्रस्तावावर जोरदार टीका झाल्यानंतर त्याचा फेरविचार करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला असून, प्रवेशाचे सुधारित नियम करण्यासाठी नवीन समिती नेमण्यात आली आहे.

महागाईचा ‘गडगडाट’!

$
0
0
कोथिंबिरीची जुडी चाळीस रुपये, एक किलो टॉमेटोसाठी ऐंशी रुपये, कांदे पंचवीस रुपये, ढोबळी मिरची साठ रुपये...

तालाची 'बेन'गिरी

$
0
0
ऑस्ट्रेलियन पर्कशनिस्ट बेन वॉल्श सध्या भारत दौऱ्यावर आहे. आज (दि. २१) रात्री ९.३० वाजता त्याचा 'लूप झिरो' हा शो पुण्यातील हाय स्पिरिट्स कॅफे इथं होणार आहे. या निमित्तानं त्याच्याशी झालेल्या गप्पा..

'टेक्निकल व्होकेशनल विषयांत आयटीचा समावेश नाही'

$
0
0
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टेक्निकल व्होकेशनल विषयांच्या यादीत माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा समावेश केलेला नसल्याने इंजिनीअरिंग प्रवेशाच्या पात्रतेसाठी केमिस्ट्रीऐवजी आयटी विषय ग्राह्य धरता येणार नाही, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) स्पष्ट केले.

'पीएमपी' कधी सुधारणार?

$
0
0
सुस्थितीतील 'पीएमपी'ची बस रोज अठरा तास धावली पाहिजे. 'पीक' अवर्सला गाडी भरली की सोडायची या तत्त्वावर सकाळ आणि सायंकाळी जास्तीच्या फेऱ्या कराव्यात. गर्दीच्या सर्व्हेक्षणानुसार, बसच्या फेऱ्यांची योजना आखली पाहिजे.

भक्त म्हणे व्हावी सोपी पायवाट

$
0
0
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विठ्ठल भेटीचा अनुपम सोहळा म्हणजे आषाढी वारी होय. ऊन, पावसाची पर्वा न करता असंख्य पावले पंढरपूरच्या दिशेने निघतात. त्यासाठी देहू आणि आळंदीत सध्या जोरदार तयारी चालू आहे.

उत्तराखंडमध्ये अडकलेल्यांसाठी महापालिकेची हेल्पलाइन

$
0
0
उत्तराखंडमध्ये महापुरात अडकलेल्या पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या सुटकेसाठी आणि नातेवाइकांच्या मदतीसाठी महापालिकेने हेल्पलाइन तयार केली आहे. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यासाठी काम करीत आहे.

'सुवर्णानंद दुर्घटने'स बिल्डर, अधिकारी जबाबदार

$
0
0
दांडेकर पुलाजवळील सुवर्णानंद सोसायटीची संरक्षण भिंत पडून झालेल्या दुर्घटनेला या सोसायटीचे बांधकाम करणारे बिल्डर आणि बांधकामाचा प्लॅन मंजूर करणारे पालिकेतील अधिकारीच जबाबदार असल्याचा खुलासा सोसायटीने केला आहे.

... वसा विद्यार्थी घडविण्याचा

$
0
0
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, लेखक डॉ. प्र. ल. गावडे गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत आहेत. अध्यापनासह पत्रकारिता, लेखन, संपादन, व्याख्याने अशा विविध क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटविला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images