Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मुन्नाभाई अंगठेबहाद्दर!'

$
0
0
‘रील’ लाइफमध्ये डॉक्टर, वकील, पोलीस अशी उच्च विद्याविभूषित पात्रे रंगविणारा, तर कधी महात्मा गांधींचा दूत बनून लोकांना गांधीगिरीचे धडे देणारा अभिनेता संजय दत्त ‘रियल’ लाइफमध्ये मात्र अंगठेबहाद्दर झाला आहे. लिहायचे कसे हेही तो विसरला असल्याचे समजते.

चेहराफेरी

$
0
0
आमच्या कुबड्याचं कधीकधी फार कौतुक वाटतं तात्याला. कुठेकुठे भटकत असतो. जातो तिथून बच्चा काहीतरी काढून आणतोच. परवा कुबड्या खवीस फारच पेटला होता.

भाजप पदाधिकाऱ्यांनीजाणून घेतला 'डीपी'

$
0
0
पुण्यात विकासाचा दृष्टिकोन असलेल्या जाणत्या नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका नगररचनाकार दिनेश चंद्रात्रे यांनी नुकतीच केली. पुण्याच्या विकास आराखड्यात शहराला उध्वस्त करण्याचे नियोजन करण्यात आल्याचीही टीका त्यांनी केली.

उत्पादन खर्च निश्चितीचीपद्धत बदलण्याची मागणी

$
0
0
शेतीमालाचा उत्पादनखर्च निश्चित करण्याच्या पद्धतीत बदल केल्याशिवाय शेतकऱ्यांचे भले होणार नाही, या विषयाचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरू केला आहे, अशी माहिती माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली.

लैंगिक पीडितांना मोफत उपचार द्या

$
0
0
लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित महिला, युवतींसह लहान मुलांना पुणे विभागातील सरकारी हॉस्पिटलमधून मोफत उपचार द्यावेत, असे आदेश आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिले आहेत.

'एक्स्टर्नल'चा पर्याय अबाधित

$
0
0
बारावीनंतर पदवी स्तरावरील बीए-बीकॉमचा अभ्यासक्रम बहिःस्थ (एक्स्टर्नल) पद्धतीने करण्याचा पर्याय पुणे विद्यापीठामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात तरी कायमच राहणार आहे.

पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के

$
0
0
बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींची सरशी आहे. यंदा शहरातील पाच कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.

TDRच्या मलईसाठी धोरणाला कल्हई

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विकास हस्तांतरणीय हक्काच्या (टीडीआर) मलईच्या धोरणाबाबत पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात कल्हई निर्माण झाली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी फेरप्रस्ताव पाठवावा, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

हॉस्पिटलच्या खासगीकरणाविरूद्ध RPIचे आंदोलन

$
0
0
पुणे महानगरपालिकेने बोपोडीतील स्व. दत्तात्रय वळसे-पाटील हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी, आरपीआयच्यावतीने गुरुवारी (३० मे) निदर्शने करण्यात आली.

रात्र शाळेतील तारे चमकले

$
0
0
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी दिवसभर काम करून रात्री तीन तास अभ्यास करणाऱ्या मुलांनीही यंदाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळविले आहे. चिंचवड येथील चिंतामणी रात्र प्रशालेत शिकणाऱ्या अश्रोबा आत्माराम हंकारे याने ६६ टक्के गुण मिळवित शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.

'हॉटेलच्या वेस्ट'वर व्यावसायिकाचे नाव

$
0
0
हॉटेल्सच्या ओल्या कच-यातून काटे-चमचे, काचा, बिल्ले अशा प्रकारच्या वस्तू येत असल्याने यापुढे हॉटेल वेस्टवर संबंधित व्यावसायिकांचे नाव घातले जाणार आहे.पालिकेच्या पेशवेपार्क येथील बायोगॅस प्रकल्पाला विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिका-यांनी नुकतीच भेट दिली.

नालेसफाईसाठी मुदतवाढ

$
0
0
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही तांत्रिक अडचणीमुळे सफाई होऊ शकली नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

'व्यसनविरोधी अभियान सरकारने राबवावे'

$
0
0
'तंबाखूविरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून राज्य आणि केंद्र सरकारने व्यसनविरोधी अभियान राबवावे,' अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.

'एक्सप्रेस- वे'वर दोन अपघात एक ठार

$
0
0
पुणे-मुंबई 'एक्सप्रेस- वे' वर फूडमॉल जवळ गुरुवारी दोन वेगवेगळे अपघात झाले. लग्नाच्या वऱ्हाडाची बस आणि ट्रकच्या अपघातात एक ठार, सात जण जखमी तर ट्रक व कंटेनरच्या अपघातात तिघांपैकी कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

लैंगिक पीडितांना मोफत उपचार द्या

$
0
0
लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित महिला, युवतींसह लहान मुलांना पुणे विभागातील सरकारी हॉस्पिटलमधून मोफत उपचार द्यावेत, असे आदेश आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिले आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांची होळी

$
0
0
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मराठा युवा फाउंडेशनने तंबाखूजन्य पदार्थांची होळी केली. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या हस्ते या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करण्यात आले.

पासपोर्टसाठी विशेष व्यवस्था

$
0
0
पासपोर्ट काढण्यासाठी कागदपत्रे सादर करणाऱ्यांसाठी मुंढवा येथील पासपोर्ट सेवा कार्यालयात शनिवारी (१ जून) विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाजार समिती सरसावली

$
0
0
मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाजारपेठेत एकेरी वाहतुकीची योजना राबवण्याचा निर्णय कृषि उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आला आहे. येत्या एक जूनपासून प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

रविवारीही दस्तनोंदणी शक्य

$
0
0
सुटीच्या दिवशी आणि कामकाजाच्या वेळांच्या व्यतिरिक्त नागरिकांना दस्तनोंदणीचे काम करता यावे, या उद्देशाने एरंडवण्यात मुंबईच्या धर्तीवर रविवारी आणि कामकाजांच्या वेळा सोडून अन्य वेळेत नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

जे. एस. कुमार 'एनडीए'त सर्व शाखांमध्ये प्रथम

$
0
0
लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जे. एस. कुमार आणि अमन ठाकूर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) अव्वल क्रमांकाचे मानकरी ठरले. जे. एस. कुमारने हवाई दलाचे प्रशिक्षण घेताना कम्प्युटरसह सर्व शाखांमध्येही प्रथम क्रमांक पटकावला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images