Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बानगुडे-पाटलांना शिंदेवाडीत लुटले

$
0
0
प्रसिद्ध वक्ते प्रा. नितिन बानगुडे - पाटील यांची मोटार अडवून त्यांचे अपहरण करून त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम आणि तीन मोबाइल असे मिळून एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी येथे हा प्रकार घडला.

विद्यापीठाकडून गुणीजनांचा गौरव

$
0
0
सर्व क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि शिक्षणसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणाऱ्या भारती विद्यापीठ या अग्रगण्य आणि स्वायत्त शिक्षण संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम नुकताच भारती विद्यापीठाच्या पुण्यातील एरंडवणे येथील शिक्षण संकुलात साजरा झाला.

केबलचालकांवर आता गुन्हे

$
0
0
'सेट टॉप बॉक्स'शिवाय अजूनही केबलचे प्रसारण करणाऱ्या केबलचालकांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. 'ऑल इंडिया रेडिओ'तील तज्ज्ञांच्या साह्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व प्रमुख कंट्रोल रूम्सची तपासणी पूर्ण केली आहे.

पुण्यात उद्या पाणी बंद

$
0
0
पुण्यात गुरुवारी (३० मे) पाणीपुरवठा बंद असणार आहे.

देहूचे एसटी स्थानक शहराबाहेर

$
0
0
देहूतील एसटी स्थानक शहराबाहेर मोठ्या जागेत हलविण्याच्या प्रस्तावाला एसटी महामंडळाने मंगळवारी तत्वतः मान्यता दिली. जुन्या स्थानकाची जागा परिसर विकास आराखड्यातील कामांसाठी सरकारच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

हवामान अंदाजाची ‘दिशा’

$
0
0
देशांतर्गत प्रवासादरम्यान धो-धो पावसाला सामोरे जावे लागेल, की लख्ख उन्हामुळे चटका सहन करावा लागेल, याची माहिती देण्यासाठी हवामान विभागातर्फे राष्ट्रीय महामार्गांवरील अंदाजाची सेवा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.

समुजतदारपणाच्या धाग्यांनी नाते झाले घट्ट

$
0
0
पती अर्थार्जनासाठी काम करीत नाही अशी तक्रार करीत पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. विचार करण्यास बराच वेळ मिळाल्यानंतर अखेर दोघांनी वकिलांना पिटिशन तयार करण्यास सांगितले आणि दाखल करण्याचा दिवस उजाडण्यापूर्वीच दाम्पत्याला उलगडा झाला आणि अखेर तुटणार्‍या नात्याला सामोपचारातून समजुतदारपणाच्या धाग्यांनी पुन्हा एकत्र आणले.

फुगेवाडीत अतिक्रमणविरोधी कारवाई

$
0
0
फुगेवाडी येथील बस टर्मिनलसाठी आरक्षित जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. दापोडी येथील एक दुमजली अनधिकृत इमारतदेखील निष्कासित करण्यात आली.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राला विरोध

$
0
0
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी जागेचा वापर मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी केला जाणे, ही नागरिकांची फसवणूक आहे, असे सांगत शिवसेनेने हे केंद्र उभारण्यासाठी विरोध दर्शविला आहे.

लिंगनिदान करणा-यांना द्यावी कठोर शिक्षा

$
0
0
'मुलींचे राज्यभरात प्रमाण वाढत असले, तरी अद्याप लिंगनिदान बंद झालेले नाही. त्यामुळे चोरीछुपे सुरू असलेले लिंगनिदान बंद झाले पाहिजे. या प्रकरणी खटले दाखल झालेल्या डॉक्टरांना कोर्टाकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे,' अशी अपेक्षा विविध महिला संघटनांसह समाजसेविकांनी केली आहे.

पत्नीला वाचविताना पतीचाही भाजून मृत्यू

$
0
0
रागाच्या भरात स्वतःला पेटवून घेतलेल्या पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचाही मृत्यू झाल्याची घटना, मोशीमध्ये सोमवारी घडली. सुजाता (वय २२) आणि नितेश विश्वनाथ चांभारे (वय २५ रा. गणेश बोराटे चाळ, मोशी) असे मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

महापालिकेचीही ८० टक्के कामे पूर्ण

$
0
0
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, जलवाहिन्या आणि पावसाळी चेंबर्सच्या स्वच्छतेची सत्तर ते ऐंशी टक्के कामे पूर्ण करण्यात आल्याचे महापालिकेने बुधवारी म्हटले आहे.

मनीष आनंद यांचा जामीन फेटाळला

$
0
0
खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या आवारात टेंडरच्या वादातून झालेल्या खुनी हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

पोस्टाने पाठवा ५० हजारांपर्यंतच्या वस्तू

$
0
0
पोस्ट म्हणजे केवळ पत्रांचा ढिगारा हे चित्र आता बदलणार असून, पोस्टाच्या माध्यमातून तब्बल ५० हजार रुपये किमतीपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक साधने, ​पुस्तके, कपडे आदी वस्तू पाठवता येणार आहेत. त्यासाठी पोस्टाने ‘स्पीड पोस्ट-सीओडी (कॅश ऑन डिलि​व्हरी)’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

...तर यादीतून नाव वगळणार?

$
0
0
मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक फोटो देण्यासाठी टाळाटाळ केली, तर मतदारयादीतून नावच डिलीट होण्याची भीती आहे. निवडणूक यंत्रणेने तसा इशारा दिला आहे.

'चार एफएसआय नको'

$
0
0
नियोजित मेट्रोमार्गांच्या परिसरात चार एफएसआय लागू करण्याच्या तरतुदीस पुणे जनहित आघाडीने बुधवारी विरोध केला आहे. या तरतुदींमुळे नागरिकांवर अन्याय होईल, अशी भीती आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केली आहे.

दूधाची शुभ्र गोष्ट!

$
0
0
दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची बेरी... एका दुधापासून कोणकोणते पदार्थ बनतात हे हसतखेळत सांगणारं गाणं प्रत्येकानंच लहानपणी शिकलेलं असतं.

यंदा पीकपाणी उत्तम

$
0
0
राज्याच्या विविध भागांत पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, यंदा मान्सून हात देण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सुगीचे ठरण्याची चिन्हे आहेत. पावसाच्या प्रमाणाबरोबरच यंदा चारही महिन्यात मान्सूनचे वितरणही सम प्रमाणात राहण्याची शक्यता वेगवेगळ्या संस्थांनी वर्तविली आहे.

शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी मुदतवाढ

$
0
0
दुष्काळाचे चटके बसल्याने पीककर्जाचे हप्ते भरणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात देऊ केला आहे. दुष्काळी गावांमधील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या परतफेडीसाठी एका वर्षाच्या मुदतवाढीचा पर्याय देण्यात येत आहे.

अनुदानांसाठी चढा पोस्टाची पायरी

$
0
0
सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती तसेच गॅस अथवा रॉकेलवर मिळणारे अनुदान आणि त्यांच्या नोंदी करण्यासाठी नागरिकांना आता पोस्टामध्ये खाते उघडावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोस्टाने 'इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम' (इएफएमएस) ही प्रणाली विकसित केली असून, नागरिकांनी घेतलेल्या सरकारी अनुदानाची माहिती एकाच ठिकाणी संकलित करणे शक्य होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images