Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्यात ६ हजार ९१४ नेत्र संकलित

$
0
0
राज्यातील नेत्रपेढ्यांतून सहा हजार ९१४ एवढे डोळे संकलित करण्यात आल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक डोळे या वर्षी संकलित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संकलित डोळ्यांपैकी राज्यातील सुमारे दोन हजार ७४५ अंधांना 'दृष्टी' प्राप्त करून देण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.

नदीपात्रातील 'स्टे' उठला

$
0
0
पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे गेल्या दीड वर्षांपासून नदीपात्रातील सुधारणांची ठप्प झालेली कामे पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता आहे. शहरातील नाले आणि नदी सुधारणेबाबतची कामे करण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिला.

शिवाजीनगर लोकलला मुहूर्तच नाही

$
0
0
पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोकल सेवेतील दोन ते तीन गाड्या शिवाजीनगर स्टेशनवरून ये-जा करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचे 'वेळापत्रक' तयार करण्यास रेल्वे प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम

$
0
0
राज्यातील प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेल्या दिवसभराच्या चचेर्तूनही शिक्षक संघटनांचे समाधान झाले नाही. परिणामी पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

पुण्यातील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल

$
0
0
महापालिका निवडणुकीत घटलेल्या जागा आणि उफाळून आलेल्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनेत काही फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. याबाबत अधिकृत माहिती देण्यात येत नसली, तरी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.

तीन महिने दहा दिवसांनी आरोपी अल्पवयीन

$
0
0
दिघी येथील शुभम शिर्के या विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीच्या वय निश्चितीसाठी पोलिसांनी कोर्टात दाखल केलेला अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला. संबंधित अल्पवयीन आरोपीचे वय घटनेच्या दिवशी १७ वर्षे, आठ महिने आणि २० दिवस असल्याचे कोर्टाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट झाले आहे.

सांगली जि.प. कर्मचाऱ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत

$
0
0
सांगली जिल्ह्याच्या मोठ्या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन आणि पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन असे एकूण १.२५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

बॉम्ब ठेवल्याचा फोन करणा-याला अटक

$
0
0
हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती फोन करून कळविणाऱ्या तरुणाला हैदाबाद कोर्टातून ट्रान्सफर करून बुधवारी पुणे जिल्हा न्यायालयातील कोर्टात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

'नवोदित' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण माने

$
0
0
एकोणीसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या १८, १९ व २० मे रोजी सोलापूर येथे होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक 'उपरा'कार लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरण जागृतीसाठी नदी स्वच्छता मोहीम

$
0
0
पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वी लव्ह यू फाउंडेशन येत्या रविवारी (२९ एप्रिल) नदी स्वच्छतेचा जागर करणार आहे. जगभरातील विविध नद्यांवर एकाच दिवशी पहिल्यांदा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून पुण्यात कल्याणीनगर येथे सकाळी दहा वाजता या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे.

वनमंत्र्यांचे माध्यमांवर टीकास्त्र

$
0
0
लोहगाव येथील कथित जमीन गैरव्यवहारावरून इलेक्ट्रॉनिक मीडियाने माझ्याविरोधात केलेले वार्तांकन पूर्णत: चुकीचे होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप बांधकामास परवानगीच मिळाली नाही तर संस्था बांधकाम करेलच कसे, असा सवाल उपस्थित करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी माध्यमांवर टीका केली.

मर्चंट चेंबरचा शुक्रवारी लाक्षणिक बाजार बंद

$
0
0
मार्केट यार्डातील गूळ भुसार विभागातील हमाली कामाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि पूना मर्चंट चेंबरच्या वतीने शुक्रवारी (दि. २७) रोजी लाक्षणिक बाजार बंद पाळण्यात येणार आहे. चेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

दृष्टिहीनांना गरज समाजाच्या आधाराची

$
0
0
दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे केवळ सहाशे तीस रुपये महिना खर्च मिळत असल्याने, नव्या कोर्सचे प्रशिक्षण देणे प्रशिक्षण संस्थांसाठी अडचणीचे ठरते आहे. चांगल्या दर्जाच्या सुविधांसह प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक दृष्टिहीन विद्यार्थ्यांमागे दोन हजार रुपये खर्च आहे.

शिक्षण मंडळासाठी कोणता नवा पॅटर्न?

$
0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळावर नेमण्यात येणाऱ्या १३ सदस्यांसाठी शुक्रवारी निवडणूक होत असून, या निवडणुकीत कोणता नवा पॅटर्न होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सांगली बँकेचे संचालक हायकोर्टात

$
0
0
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नियोजित वेळेतच घेण्याच्या मागणीसाठी बँकेच्या विद्यमान संचालकांनी मंगळवारी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

अंकुर विद्या मंदिराचा आगळा वेगळा रिपोर्ट डे

$
0
0
मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव द्या, असा संदेश देत अंकुर विद्या मंदिर शाळेने बुधवारी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्री-स्कूल ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील या शाळेच्या 'रिपोर्ट डे' मध्ये पालकांचा सहभाग लक्षणीय होता.

सर्वाधिक बोगस शाळा धुळ्यात

$
0
0
राज्य सरकारने राबवलेल्या पटपडताळणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक अनुपस्थिती असलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक बोगस शाळा धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रात आढळून आल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील शाळांमध्ये फार गैरप्रकार आढळले नाहीत.

नराधम बापाकडून मुलींवर अत्याचार

$
0
0
नवी सांगवी येथे एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आपल्याच दुसऱ्या पाच वर्षांच्या मुलीशी त्याने अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

बावधनमधील आरक्षण कोणासाठी वगळले?

$
0
0
'बावधन येथील एका भूखंडावरील बीडीपीचे आरक्षण वगळण्यात आले आहे. हा घाट कोणासाठी घातला,' असा प्रश्न माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी उपस्थित केला आहे.

कर्जाच्या आमिषाने फसविणारा भामटा गजाआड

$
0
0
कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि पुण्यात अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणारा शांताराम भिकाजी बेटकर (वय ४७, रा. ठाणे) याला गुन्हे शाखेच्या आथिर्क विभागाने अटक केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images