Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याच्या आयुर्वेद क्लस्टरला ९.५ कोटींचा 'बूस्टर'

$
0
0
देशभरात विविध ठिकाणी आयुर्वेद, सिद्ध, युनानी औषधांच्या सामूहिक निमिर्ती आणि चाचण्यांसाठी कें द्र सरकारने ८३ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचा 'बूस्टर' दिला आहे. महाराष्ट्रातील दोन ठिकाणांचा समावेश आहे असून पुण्याच्या आयुर्वेद क्लस्टरसाठी नऊ कोटी ४९ लाख तर रत्नागिरीसाठी आठ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

'नो स्मोकिंग' कारवाईतून सर्वाधिक दंड वसूल

$
0
0
तीसपेक्षा अधिक खुर्च्यांची क्षमता असणा-या हॉटेलमध्ये 'नो स्मोकिंग झोन' स्वतंत्र नसणा-या शहरातील विविध भागातील हॉटेलमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. २४ हॉटेलवर झालेल्या कारवाईतून २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात पालिकेच्या अन्न व औषध विभागाला यश आले आहे.

चोरट्यांकडून अकरा लाखांचा जप्त

$
0
0
डेक्कन जिमखाना येथे बनावट सिडी, डिव्हीडी व एमपी ३ विकणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून सुमारे अकरा लाखांच्या बनावट सिडी व डिव्हिडी जप्त करण्यात आल्या आहेत. नितीन दीपक काची (वय २० रा. गंजपेठ) व सागर मुकुंद सावंत (वय २० रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोकबिरादरी प्रकल्पासाठी रविवारी कार्यक्रम

$
0
0
गडचिरोलीतील आदिवासींचा विकास आणि महारोग्यांच्या प्रकल्पासाठी निधीसंकलन करण्यास लोकबिरादरी मित्र मंडळाच्या वतीने गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांच्या 'मन करा रे प्रसन्न' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आणखी २ दिवस भोसरीत वीज नाही

$
0
0
महावितरण कंपनीच्या भोसरीतील टेल्को उपकेंदातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या परिसरातील परिस्थिती पूर्ववत होण्यास दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

स्वच्छता निकषांत पालिका अद्याप अस्पष्ट!

$
0
0
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या शहर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ येत्या महाराष्ट्रदिनी (एक मे) करण्यात येणार आहे. मात्र, प्रभाग स्तरावर दोन कोटी रुपयांचे प्रथम बक्षीस असलेल्या या योजनेच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी पालिका प्रशासन अद्याप चाचपडते आहे.

राहुल यांच्याकडून दुष्काळग्रस्तांना अपेक्षा

$
0
0
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज, शनिवारी सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यांतील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने दुष्काळग्रस्तांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

पत्रकार हल्ल्यांप्रकरणी सरकारने पावले उचलावीत

$
0
0
'पत्रकार हल्ला विरोधी कायदा' अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने त्वरीत पाऊले उचलावीत, याबाबत होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू यांनी शुक्रवारी दिला.

बंगला सुरुवातीपासूनच वादाच्या भोव-यात

$
0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये पुणे-मुंबई महामार्गावरील अंडीउबवण केंदाशेजारी असलेल्या र्सव्हे क्रमांक २२६ मधील बंगला क्रमांक '२६ ब' ही जागा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निवृत्तीनंतर राहण्यासाठी पसंत केली होती. तेव्हापासून हा बंगला वादग्रस्त ठरला होता.

बारावीचा निकाल यंदा ऑन टाइमच

$
0
0
राज्यातील कायम विनाअनुदानित तत्वाच्या ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर यंदा बहिष्कार टाकला असला, तरी बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम यावर्षीही वेळेत पूर्ण केले आहे. परिणामी बारावीच्या निकालास यंदा उशीर होण्याची शक्यता फेटाळत, दरवषीर्प्रमाणेच मे अखेर निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाने तयारी सुरू केली आहे.

नगरसेवकांवर शिव्यांची लाखोली

$
0
0
अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणा-या आणि आश्वासनांची खैरात करणा-या लोकप्रतिनिधींवर शिव्यांची लाखोली वहात कृष्णानगर परिसरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून होत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला शुक्रवारी (२७ एप्रिल) जोरदार विरोध केला.

प्लॅटफॉर्म तिकिट १ मेपासून पाच रुपये

$
0
0
प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात येत्या एक मे पासून दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत तीन रुपये आहे.

नगरच्या हरणांचे वेस्ट इंडिजमध्ये स्थलांतर

$
0
0
जंगलाचा राजा असलेला सिंह, वाघ, चित्ता, बिबट्या अगदी सुसरीलाही आकार दिल्यानंतर प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या अजेंड्यावर आता अॅनाकोंडा आणि तब्बल पंधरा फुटाच्या हत्तीने स्थान मिळविले आहे.

पं. वसंत गाडगीळ यांची उचलबांगडी

$
0
0
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि व्यवस्थापनातील अंतर्गत वादांची परंपरा अद्यापही कायम असून, संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून पं. वसंत गाडगीळ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांचा कार्यभार डॉ. पी. व्ही. अंतूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कोयनंतर आता मलावी

$
0
0
कोयनेत लेक टॅपिंगचा दुसरा प्रयोग यशस्वी केलेल्या कोयना संकल्पचित्र मंडळाच्या कामगिरीला अफ्रिकेतील मलावी देशाने पावती दिली आहे. त्या देशातील एका वीजनिर्मिती प्रकल्पाचा सविस्तर 'प्रोजेक्ट रिपोर्ट' करण्याची जबाबदारी संकल्पचित्र मंडळावर सोपविली आहे.

'टीव्ही संस्कृतीमुळे विचारशक्ती नष्ट'

$
0
0
'टेलिव्हिजनने घराघरातील प्रत्येकाला वेड लावले असून, त्यामुळे आपली विचारशक्तीच नष्ट झाली आहे. विचारासाठी, साहित्यनिमिर्तीसाठी आवश्यक असलेला एकांतच आपण घालवून बसलो आहोत. वाढत्या टीव्ही संस्कृतीमुळे आपण चिंतनशिलतेला मुकलो आहोत,' अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी गुरुवारी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील मराठी माणूसही परप्रांतीयच!

$
0
0
स्थानिक आदिवासींना हटवून देशातील ९० टक्क्यांहून अधिक नागरिक वायव्य सरहद्दीपलीकडून स्थलांतरित झालेत. मराठी माणूसही बाहेरूनच आला आहे. भूमीपुत्राच्या ख-या निकषानुसार भिल्ल हेच महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत, असे ठणकावत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू बाळासाहेब, राज यांना फटकारले.

'नेट'चे विद्यार्थी समस्यांच्या जाळ्यात

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) घेतल्या जाणा-या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात 'नेट'साठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अर्ज भरायची मुदत ३० एप्रिलला संपत असल्याने आपला अर्ज वेळेत त्यापूर्वी भरून होणार का, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे.

फिश अँड बर्ड एक्स्पोला सुरूवात

$
0
0
माणसाच्या बोलण्याची नक्कल करणारा हँन्डबर्ड पक्षी, फुटबॉल र्वल्डकपमुळे फेमस झालेला ऑक्टोपस, झाडावरील भक्ष्य मिळविण्यासाठी पाण्यातून तब्बल दहा फूट उंच उडी मारणारा अरोवाना मासा एवढंच नव्हे तर फ्रिंचेस या छोट्या पक्ष्यापासून मकाऊपर्यंतचे विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे.

पाणीस्त्रोत व बचतीसाठी स्वतंत्र तरतूद

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी सुमारे एक हजार आठशे कोटी रुपये खर्चाचे बजेट तयार केले आहे. जेएनएनयूआरएमच्या खर्चासह हे बजेट सुमारे दोन हजार आठशे कोटी रुपयांचे आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images