Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचरा... फॅशन इंडस्ट्रीतला!

$
0
0
ओला-सुका कचरा, मेडिकल वेस्ट, ई कचरा… साधारणतः कचऱ्याचे हे प्रकार सगळ्यांनाच माहीत असतात. पण दररोज वापरत असलेले कपडेदेखील कचरा वाढविण्यास कारणीभूत ठरतात, हे तुम्हाला माहित आहे का? फॅशन इंडस्ट्रीबरोबरच या क्षेत्रातील कचऱ्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे.

पणजी-मुंबई शिवनेरी आजपासून

$
0
0
पुण्याहून पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीतर्फे सुरू करण्यात येणारी पणजी-मुंबई शिवनेरी व्होल्वो बस पुणे मार्गे धावणार आहे. गोव्याहून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस सोयीची ठरणार आहे.

निम्हण बंधू गजाआड

$
0
0
पाषाण येथील प्रतीक निम्हण (वय १९) या तरुणाच्या खूनप्रकरणी त्याच्या दोघा चुलतभावांना चतु:श्रृंगी पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण आठ काडतुसे जप्त केली असून त्यापैकी चार गोळ्या प्रतीकवर झाडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

‘जर्मन बेकरी’चा आज निकाल?

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल आज (सोमवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे. या खटल्यातील आरोपी हिमायत बेग हा दोषी आहे की नाही, याबद्दलचा निकाल तरी किमान अपेक्षित आहे.

वीजबिल दुरुस्ती २४ तासांत

$
0
0
राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणसाठी नवी कृती मानके (स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स) तयार केली आहेत. त्यामध्ये राज्यातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची (वर्ग १ शहरे) नवी वर्गवारी केली असून तेथे अधिक तत्पर सेवा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नव्या वीज कायद्यानुसार वीजवितरण कंपन्यांसाठी एसओपीची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात तयार झालेल्या एसओपीमध्ये बदल करून त्यावर आयोगाने नागरिकांच्या हरकती-सूचना मागविल्या आहेत.

जर्मन बेकरी स्फोट: बेग दोषी

$
0
0
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी हिमायत बेग याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पुणे सत्र न्यायालयाने आज हा निकाल दिला. दोषी बेगला १८ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

तमाशा पंढरीत झाली २ कोटींची उलाढाल

$
0
0
तमाशा पंढरी समजल्या जाणाऱ्या नारायणगावात यात्रोत्सवांच्या शुभारंभाच्या सुपाऱ्यांची जवळपास दोन कोटींची उलाढाल झाली. दुष्काळामुळे यंदा तमाशांची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

‘लिव्हिग विल’चा करा आदर

$
0
0
आपल्या प्रकृती संदर्भात कोणते उपचार केले जावेत किंवा केले जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ होय. आपल्याकडे ही संकल्पना नवीन असली तरीही भारताबाहेर ही संकल्पना मान्य आहे. ‘लिव्हिंग विल’विषयी...

पेन्शनरांचे शहर ते दहशतवादाचे ‘टार्गेट’

$
0
0
जर्मन बेकरीतील स्फोटानंतर घटनास्थळी मानवी अवयवांचा, तसेच रक्ताचा सडा पडला होता. नेमका त्याच दिवशी ‘माय नेम इज खान’ या चित्रपटामुळेही वादंग माजला होता. कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोषी धरताच 'तो' हादरला!

$
0
0
‘आप को जर्मन बेकरीमें बॉम्बब्लास्ट करने के तहत दोषी करार दिया जाता है...’ असे न्यायाधीशांनी सांगताच कोर्टातील पिंजऱ्यात उभा राहिलेला मिर्झा हिमायत इनायत बेग चांगलाच हादरला.

खाद्यपदार्थांच्या दरावर एसटी स्थानकांवर ‘वॉच’

$
0
0
जुन्या रिक्षांना लागू केलेली इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती रद्द करावी आणि ‘सीएनजी’चा पुरवठा नियमित करा, या प्रमुख मागण्यांसाठी शहरातील रिक्षा संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि ‘आरटीओ’समोर निदर्शने केली.

पत्नी-मुलाच्या मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू

$
0
0
कोंढवा येथे मुलगा आणि पत्नीने माजी सैनिकाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. कोंढवा पोलिसांनी आई आणि मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

इनोव्हेशनसाठी ‘भारतओव्हेशन’

$
0
0
विद्यार्थीदशेपासून ‘इनोव्हेशन’ प्रवृत्ती रुजावी या हेतूने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बामू) आणि पर्सिस्टंट सिस्टीम्सने पुढाकार घेतला आहे.

पहिली अॅम्ब्युलन्स पोहोचली अन्...

$
0
0
संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान अॅम्ब्युलन्ससाठी पोलिसांचा पहिला कॉल आला..चौकशीनंतर जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाल्याचे कळाले. ससूनची पहिली अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचेपर्यंत बेकरी छिन्नविछिन्न होऊन सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता आणि उरले होते केवळ अवशेष...

पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी इनोव्हेशन कौन्सिल

$
0
0
इनोव्हेशन हा स्पर्धेत कायम पुढे राहण्याचा मंत्र आहे. त्यामुळे याला प्रोत्साहन मिळावे यासाठी पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी इनोव्हेशन कौन्सिल सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे.

सिलिंडर २४ तासांत पुरवा; अन्यथा ग्राहकांना भरपाई द्या

$
0
0
पुणे शहरात गॅस सिलिंडरचा मुबलक साठा असून, कुठेही सिलिंडरची टंचाई नसल्याचा दावा गॅस कंपन्यांचे अधिकारी करत आहेत. नोंदणी केल्यानंतर चोवीस तासात संबधित ग्राहकाला घरपोच सिलिंडर देण्याची जबाबदारी गॅस एजन्सीची आहे. दिलेल्या मुदतीत घरपोच सिलिंडर न देणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून ग्राहकांना भरपाई द्यावी, अशी मागणी ‘सजग नागरिक मंच’ने केली आहे.

‘कलावंतासाठी पुरस्कार वाटेवरील सावलीसारखे’

$
0
0
‘कलावंताचा कलाप्रवास हा एकाकी असतो. त्याच्या वाट्याला येणारे पुरस्कार हे वाटेवरच्या सावलीप्रमाणे असतात. या सावलीत दोन मिनिटे विसावून कलाकाराने पुढच्या प्रवासाला लागले पाहिजे,’ अशी भावना कवी संदीप खरे यांनी व्यक्त केली.

आग विझली; कचरा मार्गी

$
0
0
उरुळी देवाची कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यात आल्यानंतर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टाईमुळे मंगळवारपासून डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

स्वारगेट उड्डाणपूल उभारणीआधीच ‘कोसळला’

$
0
0
स्वारगेट येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने सादर केलेल्या महागड्या प्रस्तावास काँग्रेसने जाहीरपणे विरोध केला आहे.

विरोधी पक्षनेतेपदी शिंदेंची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र

$
0
0
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, असे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी महापौर वैशाली बनकर यांना सोमवारी पाठविले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images