Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पालिकेची माहिती दिशाभूल करणारी’

$
0
0
सासवड नगरपालिकेतर्फे देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट करून माहिती अधिकारांतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागितले आहेत.

त्वरित वीजपुरवठा चालू करा नाहीतर…

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काग्रस्त जनतेला पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर उजनी धरणात सोडलेले पाणी शेतकऱ्यांनी उचलू नये म्हणून वीज मंडळाने नदीकाठचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

टेकडी... शहराचा श्वासोच्छ्वास

$
0
0
प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्यपूर्ण ओळख असते. पुण्याची ओळख शैक्षणिक केंद्र पेन्शनरांचे गाव, ऑटो हब, संगणक उद्योगांचे केंद्र याबरोबरच ‘टेकड्याचे शहर’ म्हणूनही आहे. शहरातील टेकड्यांच्या काही वैशिष्ट्यांबद्दल...

पाषाण तलावातील जैवविविधतेचे ‘डॉक्युमेंटेशन’

$
0
0
भटकंतीला गेल्यावर तेथील निसर्ग सौंदर्याचे फोटो काढण्याचा छंद अनेक जण जोपासात; पण आपल्या छंदातून उत्तम डॉक्युमेंटशनही होऊ शकते, याची जाणीव झाली.

कागद वाचविण्यासाठी गो ग्रीनला प्रतिसाद

$
0
0
विजेचे बिल छापील घेण्याऐवजी ई-बिलाचा मार्ग स्वीकारून पर्यावरणप्रेमी ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. एका महिन्यात ३८२ ग्राहकांनी ईमेलद्वारे बिल घेण्यास सुरूवात केली आहे.

गाथा... गिळंकृत गंगेची

$
0
0
पिण्यासाठी, शेतीसाठी जवळपास पाणी असणे ही माणसाची प्रमुख गरज. वसाहतीच्या आणि परिसराच्या स्वच्छतेच्या दृष्टीनेही वाहती नदी केव्हाही उपयुक्त ठरे.

‘अवयवदाता, पेशंटने राखावे दानाचे पावित्र्य’

$
0
0
अवयव देणारी व्यक्ती आणि पेशंट या दोघांनी दानाचे पावित्र्य कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन कल्पना जावडेकर यांनी केले. ‘रंगत संगत प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा ‘जिंदादिल पुरस्कार’ कल्पना जावडेकर यांना प्रदान करण्यात आला.

उन्हाच्या कडाक्याची भाजीपाल्यालाही झळ

$
0
0
दिवसाग‌णिक वाढणाऱ्या उन्हाची झळ भाजीपाल्याला बसू लागली आहे. दरम्यान, भाज्यांचा तुटवडा भासू लागल्याने भावात वाढ होऊ लागली आहे. आले, भेंडी, घेवडा, कोथींबीर महागली असून, गवार किलोमागे २० रुपयांनी उतरली आहे.

रत्नागिरी, देवगड हापूसची अक्षय्य तृतीयेपूर्वीच 'एंट्री'

$
0
0
अक्षय्यतृतीयेला अद्याप म‌हिनाभराचा अवधी असताना रत्नागिरी आणि देवगड हापूस बाजारात मुबलक उपलब्ध होऊ लागला आहे. त्याचा भावही उतरला असून, यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या हापूसची ‘गोडी’ चाखायला मिळणार आहे.

एरंडवण्यात मंगळसूत्र चोरी

$
0
0
एरंडवणा येथील सत्यवादी सोसायटीजवळ पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.

रिक्षा संघटनांचा नियोजित बंद मागे

$
0
0
कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे परिवहन खात्याने स्पष्ट केल्यानंतर रिक्षा संघटनांनी १५ आणि १६ एप्रिलचा नियोजित बंद स्थागित केला. परंतु, मागण्यांसाठी आज (१५ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

अन्नसुरक्षा विधेयकात बदल करण्याची आवश्यकता

$
0
0
‘अन्नसुरक्षा विधेयकात बदल आवश्यक आहे. भारतात अजूनही उपासमारीमुळे मृत्यू होतात, याची खंत वाटते. तळागाळातील प्रत्येकाला किमान अन्न सुविधा मिळाली पाहिजे.

दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

$
0
0
पौड रोड येथे कृष्णा हॉस्पिटलसमोर दुचाकी धडकल्याने पादचारी ठार झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल राणेंचा खुनी CBIला तरी सापडेल?

$
0
0
जंगली महाराज रोडवर बांधकाम व्यावसायिक निखिल राणे यांचा खून झाल्याच्या घटनेला तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना अपयशी ठरल्या आहेत.

पंधरा दिवस पुरेल एवढा माल शहरात उपलब्ध

$
0
0
स्थानिक संस्था कर अर्थात ‘एलबीटी’विरोधात आजपासून (सोमवार) ‘माल खरेदी बंद’चे आंदोलन पुकारले असले तरी, पुढील पंधरा दिवस पुरेल एवढा माल घाऊक बाजारात उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले. तसेच, पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात माल येण्याची शक्यता आहे.

मतदारांना वाऱ्यावर सोडणार का?

$
0
0
‘पक्षाच्या पाठीशी सातत्याने उभे रहाणाऱ्या एक लाख मतदारांना वाऱ्यावर सोडणार का,’ असा उघड सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केला. जैववैविध्य उद्यानांच्या आरक्षणाच्या (बीडीपी) मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार घमासान झाले.

...तर व्यापारी परवाना रद्द

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांच्या नियोजित बंदमुळे नागरिकांना अडचणी आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सहकारनगर-सिंहगड रोड बोगद्याला ‘सुरूंग’!

$
0
0
सहकारनगर ते सिंहगड रोडला जोडणाऱ्या नियोजित बोगद्याला सहकारनगरमधील स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. या बोगद्यामुळे टेकडीच्या परिसरातील पर्यावरण धोक्यात येणार असून, त्यातून वाहतुकीचाही प्रश्न सुटणार नाही, असा दावा करीत आंदोलनाचा नारा देण्यात आला.

आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाला अटक

$
0
0
बेशिस्त वर्तणुकीमुळे हॉस्टेलमधून काढून टाकलेल्या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली असून, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पुणेकरांनी ‘लुटले’ सोने!

$
0
0
व्यापाऱ्यांच्या बंदची टांगती तलवार, लग्नसराईचा हंगाम आणि सोन्याच्या किमतीत अचानक एक हजार रुपयांहून अधिक झालेली घट, यामुळे रविवारी पुणेकरांनी सोने ‘लुटले.’ सोन्यासाठी अक्षरशः रांगा लावण्यात आल्याने नेहमीच्या तुलनेत विक्रीत तीस टक्के वाढ झाल्याचे सराफांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images