Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वांगणीत आलेल्या चोरगेला अटक

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संदीप बांदल यांच्या खुनातील तसेच शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार प्रकरणी फरारी असलेला वांगणी गावचा माजी सरपंच रोहिदास आनंदा चोरगे याला गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी अटक केली. वांगणीत देवीच्या दर्शनासाठी आलेला चोरगे पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला.

ट्रॅव्हल-टुरिझम : येत्या शनिवारी कार्यशाळा

$
0
0
ग्रॅज्युएशननंतर नेहमीच्या पर्यायांपेक्षा ट्रॅव्हल-टुरिझम या अनोख्या क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे येत्या शनिवारी (२८ एप्रिल) विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

महापौर बनकर यांच्यातर्फे पाषाणकर यांचे वकीलपत्र

$
0
0
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये टॅम्परिंग केल्याप्रकरणी कोर्टात हजर राहण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशानुसार बुधवारी महापौर वैशाली बनकर यांच्यातर्फे अॅड. एस.के. पाषाणकर यांनी वकीलपत्र दाखल केले.

खाजगी शाळांवर कारवाई नको

$
0
0
खासगी शाळांचे आणि सरकारी शाळांच्या तुकड्यांचे, उपस्थितीचे निकष पूर्णत: वेगळे असल्याने राज्यस्तरीय पटपडताळणीच्या अहवालानंतर केवळ खासगी शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येऊ नये, अशी मागणी राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

पालिका दवाखान्यात खासगी स्त्रीरोग तज्ज्ञ

$
0
0
महापालिकेच्या दवाखान्यांतून स्त्रीरोग तज्ज्ञांची कमतरता भासत असून माता मृत्यू टाळण्यासाठी आता खासगी स्त्रीरोग तज्ज्ञच पेशंटच्या उपचारासाठी दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत. यामुळे मातांना जीवदान देणे शक्य होणार आहे.

महावितरणने केले 'एसओपी'चे उल्लंघन

$
0
0
वीज वितरण यंत्रणेतील व्यत्यय आणि या यंत्रणेच्या विश्वासार्हतेबाबतचे निकष जाहीर न करता महावितरणने स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्सचे (एसओपी) उल्लंघन केल्याची तक्रार एनजीओंनी केली आहे.

बरखास्तीच्या कारवाईची सरकारला करणार सूचना

$
0
0
पत्रकारांवरील हल्ले किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात लिहिण्याचे धाडस करणाऱ्या पत्रकारांवर बदली, नोकरी गमावण्याची वेळ महाराष्ट्र, बिहार या राज्यांमध्ये येत असेल, तर माध्यमांच्या स्वातंत्र्याला धक्का पोहोचविणा-या राज्यांवर बरखास्तीच्या कारवाईची सूचनाच केंद्र सरकारला केली जाईल, असा पुनरुच्चार 'प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे अध्यक्ष मार्कंडेय काटजु यांनी बुधवारी केला.

गर्लफ्रेंड असणे हे फॅशन स्टेटमेंट

$
0
0
किशोरवयात गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड असणे हे फॅशन स्टेटमेंट झाले आहे. अन्यथा इतर मुलांना अॅबनॉर्मल असल्यासारखी शाळेतील मित्रांकडून ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे या दिशेने जाणारी संस्कृती वेळीच रोखण्यासाठी शाळेत समुपदेशकांची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

जादूटोणा विरोधी कायदा ९ वर्षांनतरही प्रतीक्षेतच

$
0
0
जादूटोणा विरोधी कायदा लवकरच अस्तित्वात येणार असे जाहीर करून येत्या १५ ऑगस्टला तब्बल नऊ वर्षे पूर्ण होत आहेत, तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. बालकाच्या जन्मासाठी केवळ नऊ महिने वाट पहावी लावगते, पण कायद्याच्या निमिर्तीसाठी नऊ वर्षे अपुरी पडावीत, हा सरकारचा शासनाचा नाकर्तेपणा आहे, अशा शब्दात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला आहे.

'आय टू आर'ला चेंबरचा विरोध

$
0
0
एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक भूखंडाचे निवासी आणि व्यापारी वर्गात रूपांतर करण्यास पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स, सव्हिर्सेस अॅन्ड अॅगीकल्चरने विरोध दर्शविला आहे. भविष्यात असा प्रकार घडल्यास कोर्टात जाण्याचा इशारा चेंबरने दिला आहे.

वेटिंग रूममध्ये 'डिलिव्हरी'

$
0
0
बाळंतपणाच्या कळा येत असल्याने धनकवडीहून ती गर्भवती हॉस्पिटलमध्ये आली... ओपीडीतील डॉक्टरांनी तिला दाखल होण्याचा सल्ला दिला... मात्र लेबर रूममधील डॉक्टरांनी तिला घरी जाण्याचा सल्ला दिला... त्यामुळे ती संध्याकाळी पुन्हा घरी परतली...

दरोड्याच्या तयारीतील सहा तरुणांना अटक

$
0
0
सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकातील पेट्रोल पंपावर दरोड्या टाकण्याच्या तयारीत असलेल्या बाप्पू नायर टोळीतील सहा तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सर्व जण १९ ते २७ वयोगटातील आहेत.

मारहाण करणा-या दोघांना पोलिस कोठडी

$
0
0
मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मित्रालाच मारहाण करून शिवीगाळ करणा-या दोघांना येत्या २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

होलसेल औषध विक्रेत्यांसह डॉक्टरांची तपासणी

$
0
0
अत्यावश्यक औषधांच्या नावाखाली औषधविक्री करणाऱ्या डॉक्टरांसह त्याची होलसेल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचीही तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने काढले आहेत.

डॉक्टरांसह प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी

$
0
0
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेची डिलिव्हरी पोर्चमध्ये होऊन मृत बाळ जन्माला आल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरांसह आरोग्य विभागाच्या प्रशासनावरही कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुख्याधिका-यांविरुद्ध नगराध्याक्षांची तक्रार

$
0
0
जेजुरीच्या नगराध्यक्षा अमृता घोणे व मुख्याधिकारी ऑलीस पोरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असून मुख्याधिका-यांच्या कारभाराविषयी नगराध्यक्षांनी थेट विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.

उड्डाणपुलासाठी 'बीआरटी'वर 'पोकलान'

$
0
0
सातारा रस्त्यावर 'प्रायोगिक' स्वरूपातील 'बीआरटी'वर पालिकेचे प्रयोग सुरू असून, उड्डाणपुलाच्या कामासाठी 'बीआरटी'चा ट्रॅक उखडण्याच्या कामाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली. गेल्या पाच वर्षांपासून स्वतंत्र मार्गाने धावणा-या बसेस आता अहिल्यादेवी चौक ते भारती विद्यापीठादरम्यान इतर वाहनांसमवेत मुख्य रस्त्यावरून धावणार आहेत.

पुन्हा अनुभवायला मिळणार 'आइस एज'

$
0
0
'आइस एज' अर्थातच हिमयुग आपल्यापैकी कोणीही अनुभवलेले नाही; परंतु तशाच प्रकारचे काहीसे वातावरण नजिकच्याच काळामध्ये अनुभवण्याच्या शक्यता आता निर्माण झाल्या आहेत.

चाकणमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

$
0
0
चाकण शहरात आणि महामार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामे सलग दुस-या दिवशी कारवाई करून काढण्यात आली.

पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

$
0
0
वीजबिल थकविल्यामुळे पुणे परिमंडळातील अठराशे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या बेतात आहे. त्यामुळे आधीच पाणीकपातीचा सामना करीत असलेल्या पुणेकरांसमोर मिळणारे पाणीही सुरळीत मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images