Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राष्ट्रपतींनी खडकीची जमीन नाकारावी

0
0
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यातील खडकीमधील वादग्रस्त जमीन व बंगला नाकारावा आणि इतर काही राष्ट्रपतींप्रमाणे आपल्या मालकीच्या वास्तूत राहण्याचा निर्णय घ्यावा, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी बुधवारी व्यक्त केले आहे.

रिक्षाभाड्याबाबत मुंबईत आज बैठक

0
0
रिक्षा संघटनांनी पुन्हा राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने खडबडून जागे झालेल्या परिवहन खात्याने रिक्षा आणि टॅक्सी प्रवास दरासंदर्भात समिती नेमली आहे. या समितीची पहिली उच्चस्तरीय बैठक बुधवारी मुंबईत होणार असून, मुंबई आणि ठाणे वगळता राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास दराचे धोरण ठरण्याची शक्यता आहे.

बैरागी परिषदेचा आंदोलनाचा इशारा

0
0
नाशिक येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध समित्यांवर गृहस्थी वैष्णव बैरागींचे प्रतिनिधी घ्यावेत, पंचवटीतील रामसृष्टीत जगद्गुरू रामानन्दाचार्य मंदिर आणि वीर बंदा बैरागी स्मारक उभारावे आणि व्यापार रजिस्ट्री मुंबई कार्यालयाने दिलेले श्री वैष्णव नावाचे ट्रेडमार्क प्रमाणपत्र रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसह अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

'सोशल मीडियावर निर्बंध हवेच'

0
0
सोशल नेटवर्किंग साइट्सवर निर्बंध आणणे शक्य नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले, तरी त्यासाठीचा उपाय हा शोधावाच लागेल, अशा शब्दांत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजु यांनी सोशल मीडियावरील आपली भूमिका मांडली.

चाकण चौकात 'नो पार्किंग'

0
0
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण चौकात वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन या रस्त्यावर 'नो पार्किंग झोन' जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले. चाकण परिसरात असलेल्या मुंबई चौकापासून पुणे, शिक्रापूर, नाशिककडे जाणा-या रस्त्यावर हे 'नो पार्किंग' असणार आहे.

अनधिकृत बांधकामाबद्दल कोठडी

0
0
हवेली तालुक्यातील मौजे डुडुळगाव येथील राखीव वनक्षेत्रातील बेकायदेशीररित्या झाडे तोडून घराचे बांधकाम करणा-या एकास वनविभागाने अटक केली आहे. अधिक तपासासाठी कोर्टाने आरोपीस २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

व्याघ्रगणनेचा सावळा गोंधळ

0
0
गोव्यातील वनखातेच नव्हे, तर महाराष्ट्रातील सह्यादी व्याघ्र प्रकल्पामध्येही सध्या व्याघ्रगणनेचा सावळा गोंधळच सुरू आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी, अपुरे कॅमेरे, पायाभूत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान वापरता येत नसतानाही वन कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वाघांची गणना करीत आहेत.

दृष्टिहीनांनाही पाहता येणार सिनेमा

0
0
भारतात प्रदर्शित होणा-या चित्रपटांच्या डीव्हीडीमध्ये दृष्टिहीनांसाठी 'ऑडिओ डिस्क्राइब ट्रॅक'चा पर्याय आवर्जून ठेवावा, अशी मागणी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनने चित्रपट निर्मात्यांना केली आहे. सध्या बहुतांश डीव्हीडींमध्ये ही सुविधा नसल्यामुळे दृष्टिहीनांना सिनेमांच्या आनंदाला पारखे व्हावे लागत आहे.

कोयनेत जगातील सर्वात मोठे 'लेक टॅपिंग'

0
0
काऊंटिंग सुरू झाले का... सीएमनी बटण दाबले की नाही... अशा प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पायाखाली थरथरलेली जमीन... आणि क्षणार्धात शिवसागराच्या निळ्याशार जलाशयामध्ये उसळलेल्या पांढऱ्या लाटांचा थरार अनुभवतानाच 'लेक टॅपिंग सक्सेसफुल' म्हणत होणारा शुभेच्छांचा वर्षाव... अशा रोमहर्षक वातावरणात सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दुसऱ्या 'लेक टॅपिंग'चा प्रयोग यशस्वी झाला.

वराडवाडीत आगीने दोन झोपड्या खाक

0
0
जुन्या वडारवाडीत गोलंदाज चौकाजवळील दोन पत्र्याच्या झोपड्या जळून खाक झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडला. फायर बिग्रेडने आग आटोक्यात आणल्याने शेजारील झोपड्या वाचल्याची माहिती, फायर ब्रिगेडचे स्टेशन ऑफिसर राजेश जगताप यांनी दिली.

'एनडीए'मध्येही ऑनलाइनचे वारे

0
0
लष्करी प्रशिक्षणासाठी विख्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) आता संस्थेतील पदवी अभ्यासक्रमातही अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. 'एनडीए'तील सर्व छात्रांना लॅपटॉप देण्याबरोबरच २८ वर्ग इंटरनेटच्या नेटवर्कने जोडण्यात आले आहेत.

गोव्यातील वाघांचे अस्तित्वच नाकारले

0
0
नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या गोव्यामध्ये वाघांचे अस्तित्व असूनही खाणींच्या प्रेमात पडलेले वन खाते सोयिस्करपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. व्याघ्र प्रकल्प जाहीर झाल्यास खाण प्रकल्पावर निर्बंध येतील म्हणून वनाधिकारी एक-दोन नव्हे, तर दहापेक्षा अधिक वाघांचे अस्तित्व नाकारत आहेत.

'वीर मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा'

0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीता वीर यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एनजीओंच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे केली आहे.

'माणुसकी जपली पाहिजे'

0
0
जीवनात स्वार्थी वृत्ती कमी करून माणुसकी वाढवण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराती यांनी व्यक्त केले.

'पॉलिसी' गळ्यात मारणा-यांविरोधात 'पॉलिसी'

0
0
इन्शुरन्स पॉलिसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्राहकाच्या गरजा लक्षात न घेता पॉलिसी 'गळ्यात' मारण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांच्या होणा-या या फसवणुकीला आळा घालण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (आयआरडीए) आता पावले उचलली असून, त्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे.

यंदा 'नेट' २४ जूनला

0
0
नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेट ही परीक्षा येत्या २४ जूनला होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतीच याबाबत घोषणा केली. भारतातील विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये व्याख्याता म्हणून काम करण्यासाठी आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळवण्यासाठी 'नेट' उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांची बैठक

0
0
पुणे, खडकी आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुकीसंदर्भात लष्कराच्या 'इस्टेट' विभागाचे महासंचालक अशोक कुमार हर्नल यांनी बुधवारी पुण्यात बैठक घेतली. गुरुवारी तिन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाला भेट देण्याची शक्यता असून, प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

चोर अटकेत, बाप्पा ‘गायब’?

0
0
दिवेआगरचा सोन्याचा गणपती चोरणा-या टोळीचा शोध लावण्यात पुणे पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग यशस्वी झाला असला तरी, पाचू आणि माणिकांचा मुकुट असलेल्या या सोन्याच्या गणपतीचे चोरांनी नेमके काय केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाणीटंचाई विरोधात पालिकेसमोर निदर्शने

0
0
शहर व परिसरातील पाणीटंचाईच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने बुधवारी पुणे महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या पाणीटंचाईस महापालिका प्रशासन आणि पालकमंत्री अजित पवार हेच जबाबदार आहेत, असा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला.

आता विद्यार्थ्यांना जीआरईचा सर्वोत्तम स्कोअर पाठविता येणार

0
0
ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन अर्थात जीआरई देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला केवळ सर्वोत्तम स्कोअर पाठवणे शक्य होणार आहे. येत्या जुलैपासून ही सुविधा उपलब्ध होईल. 'जीआरई'चे संयोजन करणाऱ्या एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसेसने (ईटीएस)नुकतीच याबाबत घोषणा केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images