Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जिल्हाधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाईची मागणी

$
0
0
शहरातील रेशन ऑफिसमध्ये नाग‌रिकांची सनद न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

भाज्यांचे भाव आवाक्यात

$
0
0
राज्यभरातील दुष्काळाचा फटका पालेभाज्यांना बसू लागला असून, आता भाज्यांची आवकही रोडावली आहे. उन्हाची तीव्रता जाणवत असतानाच यंदा भाज्यांचे भाव ‌आवाक्यात रा‌हिले आहेत. छोबळी मिरची आणि शेवग्याचा भाव उतरला आहे. तर, कोथिंबिरीच्या जुड‌ीचा भाव ८ ते १० रुपयांपर्यंत आला आहे.

शहरातील नेत्यांना स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची

$
0
0
दहशतवादी हल्ले झाल्यानंतर नेते मंडळींकडून शहराच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याच्या घोषणांसोबतच शहरात सर्वदूर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तसदीही घेतली गेली. मात्र, यातही नेते मंडळींना स्वतःच्या आसनांची सुरक्षितता महत्त्वाची वाटते म्हणून की काय, एकट्या महापालिका भवनाच्या परिसरासाठी ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

होमलोन रिफायनान्स करावे का?

$
0
0
होमलोन हे कर्जफेडीच्या क्रमवारीत गृहकर्जदारासाठी पहिल्या स्थानावर असते. रिझर्व्ह बँकेने डिसेंबरमध्ये प्रमुख व्याजदरात कपात केली. त्यामुळे काही बँका, वित्तीय संस्थांनी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

‘भारतात कंपन्यांच्या संख्येत वेगाने वाढ’

$
0
0
भारतात सध्या १४८ कंपन्या अब्ज डॉलर आकाराच्या आहेत. २०२० पर्यंत यांची संख्या ७५० घरात जाण्याचा अंदाज आहे. यातून देशातील छुप्या कंपन्यांची क्षमता दिसून येईल, अशी अपेक्षा बोस्टन कन्स्टल्टिंग ग्रुपचे आशिया प्रशांत विभागाचे अध्यक्ष जन्मेजया सिन्हा यांनी व्यक्त केली.

लायब्रऱ्या आता होताहेत ‘हायटेक’

$
0
0
लायब्ररीत नवीन आलेली पुस्तके, लायब्ररीचे नियम, अधिक माहितीसाठीच्या लिंक्स अशी सर्व माहिती वाचकांना मोबाइलवर एका कोडच्या माध्यमातून मिळाली तर... किती सोयीचे होईल ना! आतापर्यंत कार, टीव्ही, सिनेमा आदींची माहिती जाहिरातीतला ‘क्यू आर कोड’ स्कॅन करून मिळविणाऱ्या वाचकांना लायब्ररीची माहितीही ‘क्यू आर कोड’च्या माध्यमातून मिळविता येऊ शकते.

‘आधार’चा पुन्हा डबलबार!

$
0
0
एकेका व्यक्तीला पाच- सहा तास रांगेमध्ये उभे राहूनही सहा-सहा महिन्यांनंतर आधार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे सध्या ऐकायला मिळत आहेत. त्याचवेळी प्रशासनाने मात्र एकाच व्यक्तीला अवघ्या दीड तासाच्या रांगेनंतर दोन महिन्यांमध्ये दोन आधार कार्ड उपलब्ध करून दिली आहेत.

सहा संचालकांचे राजीनामे मागे

$
0
0
रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लागू केल्यामुळे अडचणीत आलेल्या रूपी बँकेच्या सहा संचालकांनी रविवारी आपले राजीनामे मागे घेतले आहेत. त्यामुळे संचालक मंडळातील वाद काही काळापुरते थांबल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरोडा पोलिसांसमोर एक आव्हानच...

$
0
0
गेल्या काही दिवसांत पुण्यातील सराफी पेढ्या लुटण्यात परराज्यातील टोळ्या आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. सात महिन्यांपूर्वी गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारूती चौकालगतच्या सराफी पेढीवर पिस्तुलाच्या धाकाने दरोडा घालत ८५ लाख रुपयांचे दानिगे लुटले होते. पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपींची ‘चाहूल’ तर लागली आहे. मात्र, ते नजरेच्या टप्प्याबाहेर आहेत.

ट्रक, कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

$
0
0
जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला येथील एमटीडीसीच्या प्रवेश द्वारासमोर झालेल्या कंटेनर आणि ट्रकच्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

कॅनॉलमध्ये तरुण बुडाला

$
0
0
जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये पोहण्यास गेलेला २१ वर्षीय तरुण पाण्यात बुडाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी रविवारी सायंकाळी या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा शोध लागला नाही.

‘फास्टर फेणे’ आता इंग्रजीतून

$
0
0
प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी लोकप्रिय केलेला ‘फास्टर फेणे’ इंग्रजीतून मुलांच्या भेटीस येणार आहे. मूळच्या ‘प्रतापगडावर फास्टर फेणे’ या पुस्तकावरून भाषांतरित केलेले ‘फास्टर फेणे अॅट फोर्ट प्रतापगड’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

मग लातूरची ही अवस्था का?:पवार

$
0
0
‘राज्यातील दुष्काळ आमच्यामुळेच असल्याची काही जण उगीच ओरड करत आहेत. त्यामागील कारण मला कळले नाही,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

दहशतवाद्यांची नवी मॉड्युल्स सक्रीय

$
0
0
हैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असून, त्याबाबतचा कोणताही निष्कर्ष ताबडतोब काढणे योग्य नाही, असे पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अध्यक्ष शिवशंकर मेनन यांनी सांगितले.

गोळीबार प्रकरणी महिलेला कोठडी

$
0
0
मालक-भाडेकरू वादातून सिंहगड रोडवर वडगाव येथे फ्लॅटमध्ये दाम्पत्यावर गोळीबार करणा-या ३८ वर्षीय महिलेला हवेली पोलिसांनी अटक केली. संध्या अनिल कुसुंबकर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

धोक्याचा इशारा रुपीने दुर्लक्षिला

$
0
0
‘पुण्यातील रुपी बँकेच्या थकीत कर्जाचे प्रमाण हे १४ ते १५ टक्क्यांवर गेल्याने त्याकडे लक्ष देण्याची वेळ आल्याचे काही दिवसांपूर्वीच सूचित केले होते. मात्र, त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने आजची ही स्थिती आली,’ असा गौप्यस्फोट केंद्रीय कृषिमंत्री तथा सहकारमंत्री शरद पवार यांनी रविवारी केला.

बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये जबरी चोरी

$
0
0
बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील लेडीज होस्टेलमध्ये महिलेला आणि तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवत मोबाइल, घड्याळ असा ३३ हजारांचा ऐवज दोघा आरोपींनी लुटला. दरम्यान, चोरी करून पळून चाललेल्या आरोपींना कॉम्प्लेक्समधील ४०-५० नागरिकांनी पकडून बेदम चोपही दिला.

‘गरीब’ पीएमपीची कंत्राटदारांवर खैरात

$
0
0
एकीकडे खर्च परवडत नसल्याने पीएमपीच्या संचालक मंडळाने दरवाढीचा ठराव मान्य केला आहे, तर दुसरीकडे पीएमपीच्या दोनशे बसेसद्वारे कंत्राटदारास कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता येत्या १० वर्षांत तब्बल ५६२ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत.

‘एमफुक्टो’चा ‘जेल भरो’चा इशारा

$
0
0
राज्यातील सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी येत्या आठ मार्चला ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकल्यानंतरही राज्यशासन प्राध्यापकांच्या मागण्यांचा सकारात्मकतेने विचार करत नसल्याचे कारण सांगत महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो) या संघटनेने सोमवारी हा निर्णय घेतला.

फिजिक्सने आणले डोळ्यात पाणी!

$
0
0
बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा फिजिक्सचा पेपर आतापर्यंत त्यांनी दिलेल्या सर्वात कठीण पेपरपैकी एक असल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्यामुळेच की काय, पेपर सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांचे पडलेले चेहरे, निदान पास होण्याइतपत तरी मार्क्स मिळतील की नाही, या विषयीची भीती व्यक्त करीतच परीक्षाकेंद्रांमधून बाहेर पडणारे विद्यार्थ्यांचे गट दिसत होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images