Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेजबाबदार अधिका-यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा

$
0
0
हायकोर्टाच्या आदेशानुसार बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना कामात कुचराई केलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करावी, तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाबरोबरच वकील, आर्किटेक्ट यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘ग्राहक हितवर्धिनी’च्या वतीने करण्यात आली आहे.

इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा १ मार्चपासून उपोषणाचा इशारा

$
0
0
पुणे विद्यापीठातील इंजिनीअरिंगच्या पूनर्मूल्यांकनाच्या रखडलेल्या निकालांमुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी येत्या शुक्रवारपासून (१ मार्च) विद्यापीठासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

‘पीएमपी’खाली सापडून पादचारी ठार

$
0
0
कुंभारवेसकडे निघालेल्या ‘पीएमपी’ बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून एक ३० वर्षांचा पादचारी ठार झाला. हा पादचारी नशेत असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागरिकांनी त्याला रस्त्यातून बाजूला केल्यानंतरही तो पुन्हा रस्त्यावर गेला.

काचेला फिल्म लावणा-या वाहनांचे पासिंग रोखणार

$
0
0
काचेला काळी किंवा अन्य रंगाची फिल्म लावून मिरवणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत ‘आरटीओ’नेही उडी घेतली आहे. अशा वाहनांचे ‘पासिंग’ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो आता अमलात आणला आहे.

पुण्यातील कॉलेजना हल्ल्याचा इशारा

$
0
0
पुणे शहरातील शैक्षणिक संस्था दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची गोपनीय माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांना दिली आहे. विशेषतः परदेशी विद्यार्थी शिकत असलेल्या शैक्षणिक संस्था लक्ष्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बँकांनी पीककर्जाची फेरआखणी करावी

$
0
0
राज्यातील दुष्काळग्रस्त खरीप आणि रब्बी लागवडीखालील गावांची संख्या अनुक्रमे सात हजार आणि चार हजारांवर जाणार आहे. त्यामुळे बँकांनी या पिकांसाठी दिलेल्या कर्जाची फेरआखणी करण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत.

नाटकाच्या लोकप्रियतेचा कालखंड कमी होणार

$
0
0
‘सध्याच्या युगात टिकाऊ गोष्ट कोणतीही नाही. नाटकाचा वेळ आणि त्याच्या लोकप्रियतेचा कालखंड कमीच होत जाणार. त्यामुळे रंगभूमी पूर्वीच्या स्वरूपात राहणार नाही,’ असे स्पष्ट मत नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी सोमवारी व्यक्त केले.

जागा भाड्याने देण्याचा अधिकार ‘पीएमपी’ अध्यक्षांना

$
0
0
बसप्रवाशांना बसेसच्या वेळापत्रकाची माहिती देण्यासाठी शहरात पाच हजार ‘युनिपोल’ उभारण्याचे आणि ‘महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’च्या (पीएमपी) जागा भाड्याने देण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांऐवजी पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना देण्याचे महत्त्वाचे निर्णय सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

प्रदूषणाच्या समस्येवर सक्षम वाहतुकीचा पर्याय

$
0
0
पुण्यातील प्रदूषण आणि वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हा एकमेव पर्याय आहे. सर्वसामान्यांना परवडेल आणि सोयीची ठरेल, अशी मुंबईसारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा पुण्यात कार्यान्वित होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.

अनधिकृत बांधकामांना शासनाचाच ‘आशीर्वाद’

$
0
0
शहर आणि परिसरातील अन‌धिकृत बांधकामांना आळा बसावा, यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे पडून आहे. राज्य सरकारने याला तत्वत: मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने बेकायदा बांधकाम करण्याचे प्रकार वाढत आहेत.

पाइपलाइनमध्ये आढळले दगडगोटे अन् बादल्या

$
0
0
सिंहगड रोड परिसराला पाणीपुरवठा करणा-या तुकाईनगर येथील पाण्याच्या टाकीच्या पाइपलाइनमध्ये दगड आणि बादल्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.

थकबाकीदारांची नावे जाहीर करा

$
0
0
रुपी को-ऑप बँकेवर घातलेले आर्थिक निर्बंध मागे घेण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची आणि सहकार आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहे. ठेवीदार, खातेदारांनी घाबरू नये; बँकेची स्थिती उत्तम आहे, असा दावा बँकेने केला आहे.

जमाबंदी आयुक्त दळवींना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

$
0
0
संपूर्ण राज्यात ‘झिरो पेन्डन्सी’चा पॅटर्न राबविणारे राज्याचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना दळवी यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.

पुणेकरांच्या अपेक्षांना मिळणार ‘ग्रीन सिग्नल’?

$
0
0
केंद्रीय रेल्वेमंत्री या नात्याने पवनकुमार बन्सल हे मंगळवारी (२६ फेब्रुवारी) सादर करणार असलेल्या पहिल्या बजेटमध्ये पुणेकर प्रवाशांच्या अपेक्षांना ‘ग्रीन’ सिग्नल मिळणार का, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

'स्थायी'साठी ५ मार्चला निवडणूक

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याच्या (डीपी) हरकती आणि सूचनांवरील सुनावणीसाठी नेमल्या जाणाऱ्या समितीमध्ये स्थायी समितीतील सदस्यांना ‘महत्त्व’ असल्याने यावेळच्या स्थायीच्या अध्यक्षपदाकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च का?

$
0
0
‘आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांवरील खर्च कमी होत असताना सरकारकडून कुंभमेळ्यावर होणारा कोट्यवधीचा खर्च योग्य आहे का,’ असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सोमवारी मांडला.

गुंड गजा मार्णेची जामिनावर सुटका

$
0
0
वाढदिवसाचा विना परवाना बोर्ड लावल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणेला अटक करून कोर्टात हजर केले होते. कोर्टाने त्याची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन देसरडा यांनी हा आदेश दिला.

पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई

$
0
0
पुणे महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केलेल्यांचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याचे अहवाल मंगळवारी (२६ फेब्रुवारी) क्षेत्रीय कार्यालयांकडून अतिक्रमण विभागाकडे सादर केले जाणार आहेत.

डिग्रीआधीच अब्दुल्ला ‘सीएस’ टॉपर

$
0
0
पदवीचे प्रमाणपत्र हातात पडण्यापूर्वीच पुण्याचा अब्दुल्ला फकी कंपनी सेक्रेटरी अर्थात ‘सीएस’ झाला आहे. इतकेच नाही, तर तो ‘सीएस प्रोफेशनल प्रोग्रॅम’ या सीएस अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला आला आहे.

एमसीए-सीईटी ७ एप्रिलला होणार

$
0
0
‘मास्टर्स ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन’ (एमसीए) या तीन वर्षांच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या ७ एप्रिलला प्रवेश परीक्षा (एमसीए-सीईटी) होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) ही परीक्षा होणार असून, ‘डीटीई’ने या संदर्भातील अधिसूचना नुकतीच आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images